Submitted by केतन पटवर्धन on 6 March, 2012 - 01:23
टाकले पाऊल पहिले, थांबणे आता कुठे !
शब्द माझे गीत व्हावे सहज गुणगुणता कुठे !
आरसा हसतो मला अन् प्रश्न एकच टाकतो
दावितो जैसे जगा तैसे तुम्हि असता कुठे !
काम त्याचे तेच आहे, तेच तो करणार आहे
दोष का काट्यास द्यावा तो असा रुतता कुठे !
जन्म घेतो, श्वास घेतो, वयपरत्वे वाढतो
पांढरे होतात केसहि, खाउनी खस्ता कुठे !
रंग माझा, पाट माझा, चित्रकारही मीच व्हावे
आणि अलगद तुज टिपावे तु अशी दिसता कुठे !
लपविण्या मी दुखः माझे मार्ग सोपा काढला
हासले खोटेच तेहि, मी असे हसता कुठे !
फासुनी शेंदूर कोणा येतसे दैवत्व का?
झुकविता डोके समोरी दगड तो नुसता कुठे !
मैफली माझ्या सुखांच्या रंगल्या या जीवनी
अंतरीच्या वेदनेचा सूर मज गवसता कुठे !
काय तु आलास घेउन काय तु नेणार 'केतन'
दशदिशांना तळपुनी जाशील तु अस्ता कुठे !
- केतन पटवर्धन
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सप्रेम नमस्कार! सदर गझल हा
सप्रेम नमस्कार!
सदर गझल हा माझा पहिलाच प्रयत्न असून नुकताच पार पडलेला "गझलोत्सव २०१२" ही या लिखाणा मागची खूप मोठी प्रेरणा आहे. चूक-भूल द्यावी घ्यावी !
A journey begins here...... !!!!!
कळावे..... लोभ असावा
धन्यवाद!
केतन पटवर्धन
पहिले पाऊल छान आहे.
पहिले पाऊल छान आहे.
पहिलीच गझल चान आहे
पहिलीच गझल चान आहे केतन.......... गझल प्रवासाला शुभेच्छा........
"गझलोत्सव २०१२" ही या लिखाणा
"गझलोत्सव २०१२" ही या लिखाणा मागची खूप मोठी प्रेरणा आहे. >>> क्या ब्बात है!!!
हेच या उत्सवांच खरं यश असतं.. की लिहणारे , वाचणारे , ऐकणारे तयार व्हावेत..
खूप खूप सदिच्छा!!
गझल बाबत...
आशय छान आहे,,, आणि ही अत्यांत महत्वाची लिंक
पु.ले.शु
...................शाम
स्वागत आणि शुभेच्छा!!
स्वागत आणि शुभेच्छा!!
सर्वांचे मनापासून आभार!
सर्वांचे मनापासून आभार!
शामजी... Link बद्दल विशेष आभार !
केतन
कवी केतन, गझलेच्या रसरशीत
कवी केतन, गझलेच्या रसरशीत दालनात आपले स्वागत
अलामत, वृत्त यांची ओळख तुम्ही करून घ्यालच
या रचनेत काही तांत्रिक त्रुटी आढळल्या
पहिला प्रयत्न कौतुस्कापद वाटला
आमचा कावळा आपल्याला प्रामाणिक शुभेच्छा देत आहे
कळावे
गंभीर समीक्षक
नक्किच ! पुनश्च धन्यवाद!
नक्किच ! पुनश्च धन्यवाद!
केतन....
शुभेच्छा ....
शुभेच्छा ....
आपले पहिले पाऊल फारच आश्वासक
आपले पहिले पाऊल फारच आश्वासक आहे. शुभेच्छा.
मनापासून शुभेच्छा ....
मनापासून शुभेच्छा ....
खूप खूप धन्यवाद !!
खूप खूप धन्यवाद !!