मसालेदार दुधी.

Submitted by सुलेखा on 3 March, 2012 - 02:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुधीची भाजी जवळ जवळ सगळ्यांचीच नावडती भाजी आहे.दुधीला मुगडाळ्-चणाडाळ्,बेसन्.तांदुळ पिठी,भाजणी असे काही वापरुन नटवली आणि भाजी/कोफ्त्याच्या रुपात वाढली तर च खाल्ली जाते.
एकदा एका प्रवासात ढाब्यावर ही भाजी ,ढाबा स्पेशल दाल ,सलाद व मक्केकी रोटी हा मेनु खाल्ला..आमच्यासमोरच भाजी "बनवली"अर्थात त्यांचा मसाला तयार होता.पण झट्पट होणारी ही भाजी आता मी बदल म्हणुन करते..
दुधी मध्यम आकाराची घ्यावी .दुधीचे साल सोलुन मोठ्या मोठ्या फोडी करुन पाण्यात टाकुन ठेवायच्या.
१/२ वाटी दाण्याचे कुट.
१/२ वाटी किसलेले खोबरे.
२ लाल सुक्या मिरच्या.
१ ईंच आले.
हे जिन्नस थोडे पाणी घालुन मिक्सर मधे वाटुन घ्यावे.
१ चमचा धणे-जिरे पुड.
१ चमचा गरम मसाला.
फोडणी साठी--
तेल्,जिरे,मोहोरी,हिंग व हळद
थोडेसे दुध भाजी च्या रसासाठी अंदाजाने घ्यायचे आहे,
मीठ चवीनुसार.

क्रमवार पाककृती: 

ही भाजी कुकर मधे करायची आहे.
तेव्हा कुकर मधे तेलाची फोडणी करुन त्यात जिरे,मोहोरी तडतडले कि हिंग व हळद घालुन वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर परतुन घ्यायचा.
आता यात दुधीच्या फोडी घालुन परतुन घ्यावे.
धणे-जिरे पुड व गरम मसाला ,मिठ आणि रसासाठी भाजी पळी -वाढ होईल इतपतच अगदी थोडेसे दुध घालुन पुन्हा एकदा भाजी ढवळुन घ्यावी ..
कुकरचे झाकण लावुन एक शीटी झाली कि लगेच गॅस बंद करावा.
वाफ जिरली कि झाकण काढावे चिरलेली कोथिंबीर घालुन गरम भाकरी/पोळी बरोबर वाढावी.dudhee.JPG

अधिक टिपा: 

कधी कधी दुधी शिजतच नाही तर कधी तयार भाजीतल्या दुधीची चव च आवडत नाही.पण या भाजीत हे दोन्ही प्रश्न नाहीत .कांदा-लसुण नाही त्यामुळे उग्र ही नाही.

माहितीचा स्रोत: 
ढाबा..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज केली ह्या पद्धतीने भाजी. माझ्याकडून दूध थोडे जास्त पडल्याने आणि कूकरमध्ये न शिजवल्याने दिसायला तुमच्या भाजीसारखी छान नाही झाली. पण चव मात्र खूप छान आली आहे.

मी मसाला मात्र मृणच्या बाकरभाजीचा वापरला.

अजून एका मस्त कृतीसाठी तुम्हाला धन्यवाद Happy

मी केली ही भाजी ,तुझ्या रेसिपी प्रमाणे ..फार टॉप लागली.. आणी मुख्य म्हंजे कोणीही खळखळ न करता आवडीने खाल्ली.. दूध मी अगदी जर्रास घातलं होतं.
थांकु गं Happy

माझी एक मैत्रीण "आचार्य रजनीश्"यांची शिष्या होती.त्यांच्या कोरेगाव पार्क च्या आश्रमात ही दुधीची भाजी करायचे.दुधीच्या फोडी साजुक तुपात परतुन दुधात शिजवायच्या .फोडींच्या बरोबरीने काजु घालायचे.ओला नारळ+मिरची[नावापुरती] चे वाटण असायचे.ही "खरी सात्विक भाजी"आहे ना?

काकू काल हि भाजी केली होती.. कुकरला दोन शिट्ट्या घाय्व्या लागल्या .. इंडियन ग्रोसरीतून आणला होता तरी हि.. रेसिपी आठवत नव्हती अंदाजाने केली..
ऊर्ध्व म्हणतो आता मला २ भाज्या आवडतात.. गोबीची आणि हि भोपळ्याची.. तुसी ग्रेट हो Happy ..

प्रित,बर्‍याच वेळा दुधी शिजत नाही.तशी नरम असली तरी.त्यामुळे कधी फक्त कुकरला प्रेशर येईपर्यंत तर कधी २ शिट्या द्याव्या लागतात ..उर्ध्व ही भाजी खाऊ लागला त्याबद्दल त्याचे अभिनंदन..

फ़ॉर चेंज मला दुधी आवडतो...किंवा अ‍ॅसिडिटीच्या वेळी वैद्याने खास खायला सांगितली तेव्हापासून आवडायला सुरूवात झाली असं म्हणुया....ही पद्धत सोपी वाटतेय....
एक माहिती... कुकरच्या वापराबद्द्ल मागे वर्तमानपत्रात आलेल्या एका लेखात असं म्हटलं होतं की कुकरला शिटी करून आपण त्यातल्या अन्नघटकांचा नाश करतो त्याऐवजी कुकरला प्रेशर आलं की गॅस लहान करून ते प्रेशर पाच-सात मिनिटं तसंच मेंटेन करून आच बंद करून कुकर थंड करत ठेवायचा..प्रेशर काढायचे नाही,,पदार्थ व्यवस्थित शिजतो....माझं वरण भातासाठी तरी हे काम करतं..दुधीपण होऊ शकेल....

वेळकाढू,
तुझे मत काही अंशी बरोबर आहे.तुम्ही कूकरच्या तिसर्‍या डब्यात ही किंवा कोणतीही भाजी शिजण्यासाठी ठेवु शकता.भाजीला कढईत नेहमीप्रमाणे फोडणी घालुन,मसाला घालुन परता व कुकरच्या डब्यात ठेवुन कूकर मधे वरण्-भाता बरोबर शिजव.या डब्यावर ताटली ठेव्.म्हणजे वाफेचे जास्तीचे पाणी जाणार नाही.

छान आहे कृती. Happy दुधीच्या मोठ्या फोडी कुकरमधे उकडून कान्दाटोमॅतोच्या ग्रेव्हीत सोडूनही बरे लागते. Happy अशीही करून पाहिन. माझी दुधी आवडावा म्हणून नेहेमीची कृती म्हणजे, काचर्‍या करून मिरची, कढीपत्ता फोडणी करून मस्त परतायची. पाणी न घालता झाकण ठेवून म.न्दाग्नीवर करायची. मस्त लागते. Happy

Pages