मसालेदार दुधी.

Submitted by सुलेखा on 3 March, 2012 - 02:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुधीची भाजी जवळ जवळ सगळ्यांचीच नावडती भाजी आहे.दुधीला मुगडाळ्-चणाडाळ्,बेसन्.तांदुळ पिठी,भाजणी असे काही वापरुन नटवली आणि भाजी/कोफ्त्याच्या रुपात वाढली तर च खाल्ली जाते.
एकदा एका प्रवासात ढाब्यावर ही भाजी ,ढाबा स्पेशल दाल ,सलाद व मक्केकी रोटी हा मेनु खाल्ला..आमच्यासमोरच भाजी "बनवली"अर्थात त्यांचा मसाला तयार होता.पण झट्पट होणारी ही भाजी आता मी बदल म्हणुन करते..
दुधी मध्यम आकाराची घ्यावी .दुधीचे साल सोलुन मोठ्या मोठ्या फोडी करुन पाण्यात टाकुन ठेवायच्या.
१/२ वाटी दाण्याचे कुट.
१/२ वाटी किसलेले खोबरे.
२ लाल सुक्या मिरच्या.
१ ईंच आले.
हे जिन्नस थोडे पाणी घालुन मिक्सर मधे वाटुन घ्यावे.
१ चमचा धणे-जिरे पुड.
१ चमचा गरम मसाला.
फोडणी साठी--
तेल्,जिरे,मोहोरी,हिंग व हळद
थोडेसे दुध भाजी च्या रसासाठी अंदाजाने घ्यायचे आहे,
मीठ चवीनुसार.

क्रमवार पाककृती: 

ही भाजी कुकर मधे करायची आहे.
तेव्हा कुकर मधे तेलाची फोडणी करुन त्यात जिरे,मोहोरी तडतडले कि हिंग व हळद घालुन वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत मंद आचेवर परतुन घ्यायचा.
आता यात दुधीच्या फोडी घालुन परतुन घ्यावे.
धणे-जिरे पुड व गरम मसाला ,मिठ आणि रसासाठी भाजी पळी -वाढ होईल इतपतच अगदी थोडेसे दुध घालुन पुन्हा एकदा भाजी ढवळुन घ्यावी ..
कुकरचे झाकण लावुन एक शीटी झाली कि लगेच गॅस बंद करावा.
वाफ जिरली कि झाकण काढावे चिरलेली कोथिंबीर घालुन गरम भाकरी/पोळी बरोबर वाढावी.dudhee.JPG

अधिक टिपा: 

कधी कधी दुधी शिजतच नाही तर कधी तयार भाजीतल्या दुधीची चव च आवडत नाही.पण या भाजीत हे दोन्ही प्रश्न नाहीत .कांदा-लसुण नाही त्यामुळे उग्र ही नाही.

माहितीचा स्रोत: 
ढाबा..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा ढाब्यावर सुके खोबरेच वापरले होते .आज केलेल्या या फोटोतील भाजीत सुके खोबरेच वापरले आहे.फक्त दुधीच्या फोडी खुप मोठ्या नाही पण बेताच्या केल्या .

सुलेखा , छान आहे भाजी करतेच संध्याकाळी. आहे घरात दुधि ( साबा आत्त्ताच ओरडत होत्या , दुधि रविवारी घरात ठेवायचा नसतो म्हणे).

सुलेखाकाकू, रेसिपी मस्तच आहे. फोटोतली भाजी एकदम चटपटीत वाटतेय Happy
पण ... दुधीच्या फोडींचेच टेक्श्चर अज्जिबात आवडत नाही Sad पीठ पेरुन केलेली कोरडी भाजी त्यातल्यात्यात आवडते नाहीतर मग दुधी किसून पराठे, कोफ्ते, दुधीहलवा हे सगळे प्रकार आवडतात.

दुधीची भाजी प्रचंड आवडते. नेहमीच्याच भाजी प्रेमातून बाहेर पडले की ह्या पद्धतीने नक्की करुन पाहीन.

वेगळी आहे, करुन बघायला पाहिजेच,
दुधी मुगडाळ किंवा डाळीच पीठ वापरून करण्याशिवाय पर्याय नसतो. कशीही केली तरी नावडतीच Sad

ही रेसिपी छान वाटतेय आणि मुख्य म्हणजे सोपी आहे. मला दुधी अतिशय आवडतो. साधी धण्या-जिर्‍याची पूड घालून केलेली भाजीही मला आवडते.

सुकं खोबरं कच्चं घ्यायचं की भाजलेलं? तसंच घेतलं तर नीट वाटलं जाईल का?

पीठ पेरून दुधीची भाजी कधी खाल्ली नाही. पण बाकीचे प्रकार फार आवडतात.
या नवीन प्रकारेही करून पाहीन.

मी सुद्धा कुकर मध्ये दुधी कधी शिजवला नाही. कढईमध्ये वाफेवर शिजतो लवकर. फक्त त्याच्या छोट्या फोडी कराव्या लागतात.

हा पण प्रकार वेगळा आहे. ढाब्यावरची दुधीची भाजी एक-दोनदा खाल्ली आहे. आता मी खाल्लेल्या त्या भाजीची चव व ह्या भाजीची चव तीच येते का ते पाहायला हवे!! Happy

छान आहे रेसिपी. मी पण कधीच कुकर मध्ये नाही शिजवत. गिचका नाही होत का फोडी? मी कधी केली नाही म्हणून विचारतेय.
दुधीच्या भाजीला मी पाणी पण नाही घालत कधी. थोडं जास्त तेल घेते फोडणीत आणि झाकणावर पाणी घालून शिजवते.

दुधिचे भरीत पन चान होते.सोलुन, वाफ्वुन दहि, ओलि मिर्चि, कोथिम्बिर, मीथ, साखर घालाय्चि. ओइल नाहि.
तुम्चि भाजि पन चान दिस्ते. तोपासु.

आज केली मी ही भाजी,खूप छान झाली होती,घरात आवडली सगळ्यांना.धन्यवाद सुलेखाताई.
कूकर मधेच १ शिट्टी देऊन काढली,पण अजिबात गाळ झाली नाही,दुधी व्यवस्थित शिजला अगदी.

भाजी सही दिस्तेय. दूध घालून कधी शिजवली नाही. नक्की करणार.

यात वाटलेली भरपूर खसखस, आणि भरभक्कम तेल घातलं की नागपुरकरांची बाकरभाजी होते. Happy

दुधीची भाजी मला खुप आवडते. मी नेहमी चणा डाळ किंवा मूग डाळ आणि कांदा लसूण मसाला घालून करते. आता या पद्धतीने करुन पाहीन.

माझी आई दुधी कोलंबी घालून बनवते....फारच मस्त लागते ती भाजी. मी अगदी एका आड एक आठवडयात ती बनवतेच. आता ही एकदा करून बघेन!

माझ्याकडे एक पंजाबी कुक होता, तो दुधीची भाजी अगदी अश्शीच आणि कुकरमधेच करायचा आणि गरम गरम पराठ्यांबरोबर सर्व करायचा. आम्हाला कोणालाही न आवडणारी दुधीची भाजी तेव्हापासुन आवडायला लागली. एकच अ‍ॅडिशन म्हणजे तो फोडणीत बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोही घालायचा आणि किंचीत रस ठेवुन वरुन मस्त कोथिंबीर घालायचा.

सुलेखा, थँक्स ! बरं झालं या रेसिपीची आठवण करुन दिलीस. माझ्या नव्या स्वयंपाकाच्या मावशींना शिकवुन टाकते आता ही भाजी. Happy

सुरेख लागेल चवीला.

मी बर्‍यापैकी अशीच करते. फक्त कुकरला न लावता मावे च्या भांड्यात घेवुन १ चमचा पाणी घालुन मावे मध्ये हाय पॉवर वर ६ मिनीटे ठेवते. एकच अ‍ॅडीशन मावे मध्ये झाकण ठेवावे. मी पेपर डीश ठेवते झाकण म्हणुन. मावे मध्ये रंग, चव सगळ मेन्टेन रहात. जास्त शीजत ही नाही आणि कमी वाटलं तर १-२ मिनीटे जास्त ठेवायचे.

बी....

चणा डाळ घालुन रेसेपी...
चणा डाळ १/२ वाटी नीदान ५ तास भिजलेली., दुधी मध्यम फोडी, फोडणी साहित्य, कढीपत्ता, गरम मसाला+मीठ्+लाल तिखट (सगळे चवी पुरते) आवडत असल्यास गुळ, वरुन कोथींबीर
नेहेमी प्रमाणे फोडणी करुन त्यात कढीपत्ता घालुन आधी डाळ परतावी. थोडे पाणी घालावे. मग झाकण ठेवुन २-३ मिनीटे शीजवावी. नंतर त्यात दुधी फोडी घालाव्या. परत झाकण ठेवावे. वर थोडे पाणी घालावे. कोवळ्या दुधी ला पाणी खुप कमी घालावे, नाहीतर गीचका होइल. आता झाकण काढुन मसाला, तिखट, गुळ, मीठ घालावे. भाजी झाली. वरुन कोथींबीर घाला. आणि आता चापा.

पीठ पेरुन रेसीपी .....

दुधी बारीक फोडी, फोडणी साहित्य, कढीपत्ता, गरम मसाला+मीठ्+लाल तिखट (सगळे चवी पुरते), बेसन ३ चमचे, किंचीत साखर, वरुन कोथींबीर
नेहेमी प्रमाणे फोडणी करुन त्यात कढीपत्ता घालुन आधी दुधी च्या फोडी परताव्यात. किंचीत पाणी घालावे. मग झाकण ठेवुन २-३ मिनीटे शीजवावी. कोवळ्या दुधी ला पाणी खुप कमी घालावे, नाहीतर गीचका होइल. आता झाकण काढुन मसाला, तिखट, साखर, मीठ घालावे. चांगली शीजु द्यावी. आता वरुन बेसन भुरभुरावे. थोडे ओलसर राहिले पाहिजे. परत झाकण ठेवा. मधुन मधुन परतत राहावे. वरुन कोथींबीर घाला. आणि आता चापा. जीरेपुड घातली तरी चालेल. खमंग होते. ह्यासाठी गॅस मात्र जरा बारीक ठेवावा. पीठ करपायची भीती असते.

मी मावे मध्ये करताना. मावे च्या भांड्यात भीजलेली चणा डाळ घालते. थोडे पाणी घालुन. पेपरडीशचं झाकण ठेवुन ५ मिनीटे कुक करते. बाहेर काढुन दुधी घालुन पाणी नसल्यास थोडे पाणी घालुन परत पेपरडीश झाकण ठेवुन, मावे मध्ये ५ मिनीटे ठेवते. बाहेर काढुन त्यावर फोडणी घालते, मग इतर साहित्य जसे गुळ, मीठ, मसाला... वगैरे घालुन झाकण न ठेवता परत मावे मध्ये ३ मिनीटे ठेवते. झाली भाजी. मावे मधला वेळ भाजीच्या क्वांटीटीवर अवलंबुन आहे.

Pages