केक :-
मैदा - १ कप
मीठ - १/२ टीस्पुन
बेकिंग पावडर - ११/२ टीस्पुन
साखर - ३/४ कप
कनोला ऑईल - १/४ कप
दुध - १/४ कप
ऑरेंज ज्युस - १/४ कप
अंडे - १ आणि १/२ ( फक्त पांढरे)
ऑरेंज झेस्ट - १ टीस्पुन
वॅनिला एक्स्ट्रॅक्ट - १/२ टीस्पुन
क्रीम चीज फ्रॉस्टिंग
क्रीम चीज - ४ Oz
बटर - ३ टीस्पुन
साखर - १ कप
ऑरेंज झेस्ट - ११/२ टीस्पुन
वॅनिला एक्स्ट्रॅक्ट - १/२ टीस्पुन
ओव्हन ३५० F किंवा १७५ c ला तापत ठेवा. केक टीन बटर लावुन आणि मैदा भुरभुरुन तयार करुन ठेवा. एका भांडयात दुध, तेल, ऑरेंज ज्युस , ऑरेंज झेस्ट, वॅनिला आणि हलकी फेटुन घेतलेली अंडी एकत्र करुन घ्या. वेगळ्या बोल मधे मैदा , मीठ, बे. पा. चाळुन घ्या. त्यात साखर मिसळा.
आता मैद्याच्या मिश्रणात दुधाचे मिश्रण ओतुन सगळे एकजीव करुन घ्या. जास्त फेटायची गरज नाही. आता हे मिश्रण केक टीन मधे ओतुन २५ मिनिटे बेक करा. टुथ पिक केकच्या सेंटर ला टोचुन केक शिजला आहे की नाही हे तपासुन घ्या.
क्रीम चीज फ्रॉस्टिंग
रुम टेम्परेचर चे बटर आणि क्रीम चीज हॅन्ड मिक्सर ने फेटुन घ्या. त्यात वॅनिला, ऑरेंज झेस्ट आणि साखर घालुन २ मिनिटे फेटुन घ्या.
केक गार झाला की मग त्यावर फ्रॉस्टिंग पसरावे. केक सर्व्ह करण्याआधी किमान दोन तास फ्रिज मधे सेट करण्यास ठेवावे.
हा केक नुसता सुद्धा छान लागतो. अगदीच झट्पट होणारा आहे.
फोटोमधे मी क्रीम चीज वर skittles लावले आहेत, त्या गोळ्यांचा फ्रुटी फ्लेवर पर्फेक्ट मॅच होतो.
मस्तच ....... पण फोटो कुठायत.
मस्तच ....... पण फोटो कुठायत. इथेही टाक फोटोज....... !!!
(No subject)
chanchal, फ्रॉस्टिंगने तों.
chanchal, फ्रॉस्टिंगने तों. पा.सु. आहे.
chanchal,, हा तुकडा
chanchal,, हा तुकडा माझ्यासाठि आहे का??
आर, घे की पटकन .
आर, घे की पटकन .
भरवा की पटकन.
भरवा की पटकन.
मला भूक लागली आहे!! आणी
मला भूक लागली आहे!!
आणी ,......हा PHOTO...........ंम र् गये.........
वा ! कृती आणि फोटो, दोन्ही
वा ! कृती आणि फोटो, दोन्ही मस्त.
आई गं.........जीव अगदी
आई गं.........जीव अगदी व्याकुळ झाला फोटो बघून !!
कसला स्पॉजी झालाय
यम्मी छान दिसतोय केक
यम्मी छान दिसतोय केक
सुरेख झालाय केक
सुरेख झालाय केक
आभार्स मंडळी.
आभार्स मंडळी.
वॉव्..चंचल..यम्मी दिस्तोय केक
वॉव्..चंचल..यम्मी दिस्तोय केक