काल टीव्ही वर ऑस्कर सोहोळ्याचे प्रक्षेपण पहिले. आणि अनपेक्षितपणे मेरील स्ट्रीप ला " द आयर्न लेडी " करता सर्वोत्तम अभिनेत्रीचे ऑस्कर मिळाले. मेरील स्ट्रीप पुन्हा जिंकली . क्रेमर वर्सेस क्रेमर मध्ये डस्टीन होफ्फ्मान समोर तिने उभी केलेली भूमिका तिला हॉलीवूड च्या समर्थ अभिनेत्रीन मध्ये स्थान देवून गेली. त्या नंतर तिचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास जोमाने सुरु राहिला . तिचे गेल्या काही वर्षात आलेले सिनेमे असेच लक्षवेधी होते डेथ बिकेम हर , मामामिया , ड डेव्हिल वेअर्स प्रादा असे एका पेक्षा एक सरस चित्रपट तिने दिले. आणि आज द आयर्न लेडी मध्ये माजी इंग्लिश पंतप्रधान श्रीमती मार्गारेट थाचर यांची भूमिका तिने रंगवली . मनातल्या मनात स्व. इंदिरा गांधींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण मार्गारेट थाचर यांच्या पेक्षा द आयर्न लेडी हे विशेषण इंदिरा गांधीना अधिक शोभले असते. असो त्या निमित्ताने मला आज माझ्या आवडत्या हॉलीवूड च्या ताऱ्यांची आठवण काढण्याचा योग आला.
१. अभिनेत्यांमध्ये सर्वात प्रथम ...अगदी प्रथम तुला वंदितो च्या चालीवर क्रमांकावर आहे तो म्हणजे हॉलीवूड चा सर्वात मोठा आणि सर्वात क्रिएंटिव स्टार एकमेवाद्वितीय स्वर्गीय चार्ली चाप्लीन. विशेष ऑस्कर देवून याचा सन्मान करण्यात आला होता . कमालीची गरिबी आणि कमालीची श्रीमंती आणि मानसन्मान भोगणारा हा स्टार शेवटपणे जमिनीवर घट्ट पाया रोवून उभा होता . हसरे दुक्खं असेच याच्या सिनेमांचे वर्णन करत येईल . मोडर्न टाइम्स , द सर्कस , सिटी लाइट्स , ग्रेट डिकटेटर , गोल्ड रश , द कीड , लाईम लाईट , द ट्रम्प सर्वच सिनेमे अप्रतिम.
२. दुसऱ्या क्रमांकावर आहे तो अल पचिनो ...गोडफादर सिरीज मधील सिनेमातील थंड रक्ताच्या डॉन मायकेल ची भूमिका करणारा नट. याच्या स्कारफेस वरून अमिताभचा अग्निपथ बेतला होता असे म्हणतात. सेंट ऑफ अ वूमन , डिपारटेड असे अनेक सुंदर सिनेमे याच्या नावावर आहेत . मेथड अक्टिंग करिता हॉलीवूड मध्ये याला आदर्श मानतात.
३. तिसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे batman मधला जोकर जाक निकोल्सन . वन फ्लू ओव्हर द काकुज नेस्ट , वोल्फ , समथिंग गोत्ता गिव्ह , आज गुड आज इट गेट्स , फ़ेऊ गुड मेन याच्या सिनेमांची यादी संपता संपत नाही .
४. चवथ्या क्रमांकावर विराजमान आहे तो म्हणजे टोम हन्क्स ...फोरेस्ट गंप , फिल्देल्फिया , काच मी इफ यु कान , लेडी किलर , यु गॉट मेल , द ग्रीन माईल , कास्ट अवे , एंजल अंड डेमन , द विन्ची कोड , सेव्हिंग प्रायव्हेट रायन , यादी संपत नाही आणि मन भरत नाही ..
५. जॉनी डेप हा पाचव्या क्रमांकाचा मानकरी आहे ...चारली अंड चोकलेट फेकटरी , पायरेट्स ऑफ करेबियन सिरीज , द नाईन्थ गेट , ब्लो , एडवर्ड सीझरहान्ड , फायडिंग नेव्हर लांड , सिक्रेट विंडो ,फ्रोम हेल ... या माणसाने इतके सिनेमे केले की लिस्ट करताच येत नाही.
६. मायकेल डग्लस शिवाय ही यादी संपणार नाही वौल स्ट्रीट सिरीज , बासिक इंस्तीक्ट , फेटल अट्रक्षन , जुईल ऑफ नाईल , द ट्राफिक, द गेम , द दिस्क्लोजार , द फालिंग डाउन , द सन्तिनेल , याने मनाला भुरळ घातली नाही असा सिनेरसिक नसेल..
जॉर्ज क्लुनी , हंफ्रे बोगार्त , देन्झ्यल वाशिंग्टन ,गोड फादर मार्लिन ब्रान्डो , आद्य बॉंड सीन कोनेरी , नखशिखांत सैनिक दिसणारा आर्नोल्ड श्वारझानेगर , रेन मान दस्तीन हॉफमन , हे ही माझे आवडते नट आहेत परंतु वर उल्लेखलेले सहा जण जास्त आवडतात.
अभिनेत्रींमध्ये मेरील स्ट्रीप सर्वोत्तम पण इतर काही जणी ही आहेत.
१. सर्वात आवडती नटी म्हणजे जुलिया रोबर्ट्स प्रीटी वूमन , नोटिंग हिल , रन अवे ब्राईड , एरीन ब्रान्कोविच , द मोनालिसा स्माईल , अमेरिकाज स्वीटहार्ट्स , माया बेस्ट फ्रेंड्स वेडिंग ......हिचा न आवडलेला सिनेमाच आठवत नाही.
२. दुसऱ्या क्रमांकावर आहे हॉलीवूडची सौंदर्य देवता आणि साम्राद्नी अगदी मरेपर्यंत राहिलेली ..साक्षात एलिझाबेथ टेलर ....क्लिओपात्रा , हुज आफ्रेस उफ वर्जिनिया वोल्फ सर्वांग सुंदर अभिनय आणि एखाद्या ग्रीक देवते प्रमाणे चेहेरा . हिला दुसरा पर्याय निर्माण झाला नाही.
३. द घोस्त मधील अभिनयाने वूपी गोल्डबर्ग ने मला असेच आकर्षित केले होते. त्याकरिता तिला ऑस्कर ही मिळाले होते . द कलर पर्पल , द असोसिएत , सिस्टर एंक्ट सिरीज बोगस ,बॉयस ऑन द साईड ती नेहमीच अप्रतिम अभिनय करत राहिली
नट्या तशा खूप आहेत बऱ्याच जणींनी लक्षवेधी अभिनयही केला आहे " ब्लाक स्वान " मधील नटली पोर्टमन ..या आधी स्टारवोर्स मध्ये बघितलेली आठवत होती , " लेगली ब्लोंड " रीस विदरस्पून , " वूमन ऑन टोप " मधील पिनोलोप क्रुझ. पीस मेकर मधील निकोल किडमन किती तरी ...
या सर्व अभिनेते अभिनेत्रीन च्या अभिनयाने खूप आनंद दिला आहे . ऑस्कर सोहोळ्याच्या निमित्ताने त्यांची आठवण एवढेच.
तुमच सिनेमा शौकीन मित्र
यशोधन
लेख छान आहे, फक्त थोडं
लेख छान आहे, फक्त थोडं शुद्धलेखनाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
पुलेशु!
काहीच्या काही कविता मध्ये का
काहीच्या काही कविता मध्ये का लिहिले आहे?
प्रसाद ओकला काय मिळाले ?
प्रसाद ओकला काय मिळाले ?
जागो बरोब्बर नेमकी चूक शोधता
जागो
बरोब्बर नेमकी चूक शोधता बुवा तुम्ही..
प्रसाद ओकला काय मिळाले ?>>
प्रसाद ओकला काय मिळाले ?>> त्याचा कय संबंध?
लेख छान आहे, फक्त थोडं
लेख छान आहे, फक्त थोडं शुद्धलेखनाकडे लक्ष देण्याची गरज आहे >> अनुमोदन
मायकेल डग्लस आणि जॅ़क
मायकेल डग्लस आणि जॅ़क निकोल्सन बद्दल १००% सहमत !
यांच्या बरोबरीने मला अंथनी हॉपकिन्ससुद्धा प्रचंड आवडतो
<<हॉलीवूडची सौंदर्य देवता आणि साम्राद्नी अगदी मरेपर्यंत राहिलेली>>> हा मान मला वाटते मेरिलीन मन्रोचा आहे
विशाल सर मेरेलिन मान्रो
विशाल सर
मेरेलिन मान्रो हि सौंदर्य देवता नव्हती तर हॉलीवूड ची मादक सौंदर्याची आतां बॉम्ब होती. तिचा नायगारा , सेव्हन इयर्स ईच पहिला . अन्थानी हॉपकिन्स चा सायलेन्स ऑफ द लाम्ब , हनीबल , मास्क ऑफ द झोरो , रेड ड्रागन , मिट जो ब्लाक , द एज , लेजंड ऑफ द फौल . हे सिनेमे पहिले आहेत .