श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 2 September, 2008 - 18:11

ganesh_big-01.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंगलमूर्ती मोरया!

ganesha_stotra.jpg

गणपती बाप्पा मोरया... ! मंगलमूर्ती मोरया.... !

ॐ नमस्ते गणपतये
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि
त्वमेव केवलं कर्तासी
त्वमेव केवलं धर्तासी
त्वमेव केवलं हर्तासी
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम्

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा
माता जाकी पार्वती पिता महादेवा ||
diya.jpg

आजचा प्रसाद,

समस्त मायबोलिकरान्साठि :).
laddu.jpg

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा||

गणपती बाप्पा मोरया!! मंगलमुर्ती मोरया!!
पुढच्या वर्षी लवकर या||

ओम गं गणपतये नम:

परं धाम परं ब्रह्म परेशं परमेश्वरम |
विघ्ननिघ्नकरं शांतं पुष्टं कांन्तमनन्तकम ||

सुरासुरेन्द्रै: सिद्धैन्द्रै: स्तुतं स्तौमी परात्परम |
सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनम ||

इदं स्तोत्रं महापुण्यं विघ्नशोकहरं परं |
य: पठेत प्रातरुथाय सर्वविघ्नात प्रमुच्यते ||

गणपती बाप्पा... मोरया !

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानु कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..
-----------------------
नेत्री दोन हिरे प्रकश पसरे
अत्यंत ते साजिरे
माथा शेंदूर पाझरे
वरिवरे दुर्वांकूरांचे तुरे
माझे चित्त विरे
मनोरथ पुरे
देखोनि चिंता हरे
गोसावीसुत वासुदेव कवी रे
त्या मोरयाला स्मरे!!
-----------------------

नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमिपत्रे
लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे
ऐंसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे
अष्टहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रे

जय देव जय देव जय मंगलमूर्ती
तूझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती !!

गणपती बाप्पा मोरया !!
DSC01419.jpg

किती वेळा शांगितलं हो बप्पा तुम्हाला
इतकं गोड खाउ नका जपा जीवाला

दहा दिवसांसाठी येता
रोज रोज मोदक खाता
हवा वरून दुधाच हो घोट कशाला ?
इतकं गोड खाउ नका जपा जीवाला... ...

गोड गोड खाउन तुमचा किडेल हो दात
का नाही खात तुम्ही शाधा वलन भात ?
शाध्या वलन भाताची हो भीती कशाला ?
इतकं गोड खाउ नका जपा जीवाला... ...

गणपती बाप्पा मोरया!! मंगलमुर्ती मोरया!! खूपच छान सजावट....!

गणाधीश जो इश सर्वा गुणांचा |
मूळारंभ आनंद तो निर्गुणांचा ||

ओम गं गणपतये नम: |

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या !!!!!

॥ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ॥

जय देव जय देव जय गणपती देवा
हर्षे स्विकारावी भक्तांची सेवा ||धृ||

लंबोदर सुंदर पाषंकुशधारी
वरदहस्ते मुर्ती मुषकाची स्वारी
नागेन्द्राचा विळखा धारूनिया उदरी
रत्नजडीत मुकुट शोभतो शिरी ||१||

सर्वांग सुंदर देवा गणराया
आदिशक्तीशाली गौरीच्या तनया
भक्तांची दु:खे नेशी तु विलया
तारिशी सारी विघ्ने करूनी तू किमया ||२||

कार्यारंभी पूजन तुझे करावे
निर्विध्न तू कार्य सिद्धीस न्यावे
संकट येता देवा मज तू तारावे
अनंतरूपे दर्शन आम्हा तू द्यावे ||३||

त्रैलोक्याचा देव देवांचा त्राता
दीनांचा उद्धार, ज्ञानाचा दाता
बुद्धीचा तू देव विद्यागणनाथा
सद्भावे ठेवितो तव चरणी माथा ||४||

तू कोटी सूर्य तेज निर्गुण आकार
ज्ञानियांचा राजा सद्गुण साकार
जय जय श्री गणराज मज तू पावावे
मानून घे ही सेवा केली मनोभावे ||५||

जय देव जय देव जय गणपती देवा
हर्षे स्विकारावी भक्तांची सेवा ||धृ||

~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~
हे अजून एक कडवं .. बप्पांच्या निरोपाचं

आनंदे उत्सवे राहिलासी देवा
पुढच्यावर्षी लवकर येशील ना देवा
काही झाले अनुचित देवा क्षमा असावी
तुझी सतकृपा सदैव आम्हावरी व्हावी || ६||

श्री गणेशाय नम:

नारद उवाच

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं |
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ||

प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकं |
त्रुतीयं क्रुष्णपिंगाक्षं गजवक्रं चतुर्थकं ||

लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च |
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्णं तथाष्टमम ||

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं |
एकादशं गणापतिं द्वादशं तु गजाननं ||

द्वादशैतानी नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: |
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ||

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनमं |
पुत्रार्थी लभते पुत्रान मोक्षार्थी लभते गतिम ||

जपेद्गणपतिस्तोत्रं षड् भिर्मासै: फलं लभेत |
संवस्त्ररेण सिद्धैं च लभते नात्र संशय: ||

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत |
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ||

इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं महागणपतिस्तोत्रं संपूर्णम ||

!!! पुनरागमनायच !!!

visarjan.jpg

पायी हळू हळू चाला |
मुखाने मोरया बोला ||

आता जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा,
देवा नमितो तव चरणा
वारुनीया विघ्ने, वारुनीया विघ्ने, देवा रक्षावे दिना !!

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी देवा आज्ञा असावी
चुकले आमुचे काहि, चुकले आमुचे काहि, त्याची क्षमा असावी

गणपति बाप्पा, मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!

Pages