'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर
=======================================================================
=======================================================================
वालावलच्या श्रीलक्ष्मीनारायणाचे, नेरूरच्या कलेश्वराचे आणि श्री भगवती देवीचे दर्शन घेतल्यावर आम्ही पाट मार्गे "निवतीला" मुक्कामासाठी निघालो. वेंगुर्ल्याजवळ निवती नावाची दोन गावं आहेत एक किल्ले निवती आणि दुसरे मेढा निवती. मेढा निवती माझा कॉलेजमित्र विवेक याचे आजोळ. मी पूर्वीही येथे एकदा जाऊन जाऊन पहिला पाऊस कोकणातला अनुभवला होता.
पाट-परूळे मार्गे म्हापण तिठ्यावरून वेंगुर्ल्याला जाणार्या रस्त्यावर काहि वेळातच म्हापण, कोचरे करत आपण निवती या गावी पोहचतो. या गावाचे वैशिष्ट्यं असं कि अगदी गाव जवळ येईपर्यंत समुद्राचे दर्शन होत नाही. एका वळणावर गाडी आत शिरताच रस्त्याच्या दोन्ही बाजुला घरं आणि डाव्याबाजुच्या घरापासुन अगदी हाकेच्या अंतरावर समुद्र. शे-दोनशे उंबर्याच्या या गावाला अप्रतिम निसर्गसौंदर्याची झालर आहे. येथील प्रमुख व्यवसाय हा मासेमारी. सध्या निवती गावही पर्यटनाच्या नकाशात झळकु लागल्याने तो व्यवसायही भरभराटीस येऊ लागला आहे. काहि वर्षापूर्वी एकही हॉटेल नसलेल्या या गावात आता रीसॉर्ट दिसू लागलेत.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
विवेक स्वतः आमच्याबरोबर नाही आला, पण त्याने आमच्या राहण्याची, जेवणखाणाची व्यवस्थित सोय त्याच्या घरी करून दिली होती. संध्याकाळी ४ वाजता घरी पोहचताच मामी आमची वाट पहातच उभ्या होत्या. त्यांनी लगबगीने आम्ही राहणार असलेली रूम उघडुन दिली. बॅगा टाकल्या, फ्रेश होऊन तयार होईपर्यंत वैनींनी मस्तपैकी चहा-नाश्ता तयार केला होता त्यावर ताव मारून समुद्राकडे निघालो. मी निवतीला जेंव्हा पहिल्यांदा आलो तेंव्हा पावसाळा सुरू झाल्याने जास्त फिरता आले नाही, सूर्यास्ताचा आनंद लुटता आला नाही, साधा कॅमेरा असल्याने मनासारखे फोटो टिपता आले नाही कि समुद्रात भिजता आले नाही ती सारी कसर या भटकंतीत भरून काढायची होती. एका हातात कॅमेरा आणि दुसर्या हातात चपला सांभाळत मऊशार वाळुतुन चालत चालत निघालो. बीचवर पुढे क्रिकेटचे सामने रंगात आले होते. थोडावेळ तेथे रेंगाळलो.
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
एव्हाना सूर्य अस्ताला जाण्याच्या मार्गावर होता आणि मला सूर्यास्ताचा नजारा चुकवायचा नव्हता.
निसर्गसृष्टीचा आनंद मनमुराद लुटायचा असेल तर घराबाहेर पडाव लागत आणि एकदा घराबाहेर फिरायचे म्हटलं कि नवीन स्थळ शोधाव. एकदा का त्या इच्छित स्थळी पोहचलो कि तेथे काय पहाव हे स्वता:च्या आवडीनुसार ज्याने त्याने ठरवावे. मला समुद्रकिनारी गेल्यावर जास्त काय पहायला आवडतं तर सूर्यास्त आणि त्यानंतर क्षितिजावर होणारी रंगांची उधळण. प्रत्येक ठिकाणच्या सूर्यास्तात वेगळेपणा असतो. फक्त नजर पाहिजे तो पाहण्याची, अनुभवण्याची. याही वेळेस असंच झालं. सायंकाळची विलोभनीय वेळ, रूपेरी वाळुचा मऊशार समुद्रकिनारा, आकाशात बदलत जाणारे रंग, विविध छटा, पाण्यावर उमटणारे प्रतिबिंब, माझी पावलं नकळत त्या ओल्या मऊशार वाळुत खेचली जाऊ लागली. एरव्ही स्वत:कडे कुणाला पाहुही न देणारा हा तेजाचा गोळा हळुहळु आपलं रूप बदलु लागला. आता त्याचा लालबुंद आणि भव्य आकार सहज स्पष्ट दिसू लागला. सूर्य हळुहळु खाली येऊ लागला. माझी पर्यायाने कॅमेर्याची नजर फक्त आणि फक्त त्याच्याकडेच. भव्य व लोभस सूर्याचा लालबुंद गोळा पाण्याजवळ आला. त्याचं पाण्यातलं प्रतिबिंबही तेव्हढंच लोभस. पाहता पाहता सूर्याचा अस्त झाला. जाता जाताही तो आकाशावर विविध रंगाच्या छटा , वेगवेगळ्या आकाराच्या रंगीबेरंगी रांगोळ्या काढुन गेला. निसर्गाचा हा अविष्कार डोळ्यात साठवू कि कॅमेर्यात अशी संभ्रमावस्था माझी झाली. अगदी काळोख होईपर्यंत निसर्गाचा हा खेळ पाहत होतो.
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
थोड्यावेळाने, घरी परतलो. संकष्टी असल्याने "शुक्रवारी(ही)" रात्री शाकाहारी जेवणाचा बेत होता. वाटाण्याचा सांबर, भात, चवळीच्या शेंगाची भरपूर खोबरं घालुन केलेली भाजी, बटाट्याची भाजी, चपाती आणि उकडीचे मोदक असा फर्मास बेत वैनींनी केला होता. त्यामुळे "कोकणात" असुनही "शाकाहारी शुक्रवार" सत्कारणी लागला (रच्याकने उकडीचे मोदक किती फस्त केले ते विचारू नका
).
जेवणानंतर समुद्रकिनारी पुन्हा गेलो आणि बराच वेळ मित्रांसोबत गप्पा मारत बसलो. आमच्या गप्पांबरोबर समुद्रालाही उधाण येत होते. सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा समुद्राला साक्षी ठेवून पाहिल्यानंतर आता वेध होते "चांदाची किरण दर्यावरी" पाहण्याचे. अगदी पौर्णिमेचा नाही पण पौर्णिमेच्या नंतरच्या चतुर्थीचा चंद्र आणि चंद्रकिरण सागरावर बघायचे होते. काहिवेळाने चंद्र उगवला आणि "बघुनी नभीची चंद्रकोर ती सागर हृदयी उर्मी उठती" अशी अवस्था त्या रत्नाकराची झाली होती. चंद्र समुद्राच्या मध्यावर येण्यास बराच अवधी होता. दिवसभराच्या थकव्याने आणि दुसर्या दिवशी लवकर उठायचे असल्याने नाईलाजाने आम्ही घराकडे परत निघालो आणि निद्रेच्या स्वाधीन झालो. दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठुन शुचिर्भुत होऊन चहा पोह्याचा नाश्ता करून मी पुन्हा समुद्राकडे फिरायला गेलो.
समुद्राचा खारावारा आणि अंगावर उडणार्या लाटेंचे तुषार झेलत पाण्यात उभे राहुन कालचा निसर्गोत्सव आठवताना दवणेसरांच्या गीताचे काही बोल ओठांवर आले.
नव्हता पाऊस झरला तरी हा गंधित वारा
थेंबाथेंबामधुनी उजळे सोनपिसारा
भरतीच्या त्या लाटे तरीगे आलो भरूनी
बोलल्याविना हृदयामधले गेले निघुनी...........
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
अर्थात आम्हाला जाग येण्याआधीच निवती गाव जागे झाले होते. मुख्य व्यवसाय मासेमारी असल्याने रात्रभर दर्याचं धन लुटुन सागरपुत्र घरी परतत होते आणि आपल्या धनाच्या राशी बंदरावर टाकत होत्या.
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
थोड्या वेळाने तेथे माशांचा लिलाव सुरू झाला. आम्ही सगळेच पहिल्यांदाच ते पाहत होतो. ४००, ४१०, ५००, १२०० अशी बोली वाढत मासे हातोहात खपले जात होते. कोळंबी, बांगडे, सवंदाळे असे आणि इतर बरेच मासे लिलावात होते.
घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा
चिकना चिकना म्हावरा माझा
प्रचि २३
बोलु नको नै बरफाचा ह्यो
नीट बघं नै कालपरवाचा ह्यो
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
हा मासा मासेमारीच्या जाळ्या खातो/तोडतो तसंच याला कुणी खातही असं आम्हाला सांगितलं.
आणि त्याला समुद्रात परत टाकुही शकत नाही म्हणुन त्याची अवस्था अशी.
प्रचि ३२
एव्हाना सुधीरने (विवेकचा भाऊ) आम्हाला निवतीच्या समुद्रात नेण्यासाठी बोट तयार असल्याचे सांगितले आणि आम्ही "निवतीच्या समुद्रात"सफर करण्यास निघालो".(क्रमशः)
>>>तुझी लेखनशैली सुद्धा
>>>तुझी लेखनशैली सुद्धा हळुहळु बहरु लागलेय..> अनुमोदन
पण जिप्स्या फकत वाचलं रे. माझ्याकडे एकही फोटो दिसत नाहीय
नेट स्लो आहे की काय कळत नाहीय.
कालपासून प्रयत्न करतेय. तु चेपुवर कधी टाकतोयस म्हणजे लवकर टाकच
तु चेपुवर कधी टाकतोयस म्हणजे
तु चेपुवर कधी टाकतोयस म्हणजे लवकर टाकच>>>>नीलु, चेपुवर टाकलेत बघ सगळे फोटो.
अरे टाकलेयस का!! बरं झालं
अरे टाकलेयस का!! बरं झालं बघते तिथेच आता
आहाहा ! .................
आहाहा ! ................. अप्रतिम सुंदर ! अप्रतिम सुंदर ! ! अप्रतिम सुंदर ! ! !
मासे बघून जीव विव्हळला....
मासे बघून जीव विव्हळला.... सौंदाळे बघून वर्षे झाली......
मला एक पण फोटो दिसत नाहिये
मला एक पण फोटो दिसत नाहिये
प्रचि ०८ लाटेच फुलपाखरु झालय
प्रचि ०८ लाटेच फुलपाखरु झालय मस्त टिपलयस जिप्स्या.
१०,१२ सुंदर आहे,
तुला आता प्रर्यंत भेट्लेले सर्व सुर्योदय आणि सुर्यास्तांचे प्रचि एकत्रित पहायला आवड्तील
जिप्स्या खत्री फोटो आहेत.
जिप्स्या खत्री फोटो आहेत. त्यात करुन माश्याचे तर जास्तच..
नववा मस्त आलाय. तो फक्त
नववा मस्त आलाय. तो फक्त वाळूवरचाच प्रकाश क्रॉप करून टाक, प्रकाश आणि पोत यांचा अनोखा संगम आहे.
"चांदाची किरण दर्यावरी" याचा एक तरी फोटो हवा होता. आता पुढच्या वेळेस न गंडता काढ
काय फोटोज् आहे
काय फोटोज् आहे मित्रा...
लिखाणही मस्त...
झक्कास!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
tune khup chan photo kadles
tune khup chan photo kadles maze dole deepale tuze photographi pahun ,mala hi kokan far aavadate
जिप्स्या, मस्त फ़ोटो. (नक्की
जिप्स्या, मस्त फ़ोटो. (नक्की फोटोच गंडले ना? :डोमा:)
प्रची. ५ तर अप्रतिम. मला प्रची १ ते १९ आवडले. सुर्यास्त मस्तच.
मस्त फोटो. पाचवा फोटो खुपच
मस्त फोटो. पाचवा फोटो खुपच आवडला>>>>बाकि सर्वच झकास आहेत.....
जिप्सी, कसले भारी फोटो काढलेस
जिप्सी, कसले भारी फोटो काढलेस ? अप्रतिम !!
जगाच्या पाठीवर कुठेही गेलात
जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी निसर्ग हा सुंदर असतोच. पण ते सौंदर्य जपायचे आणि जोपासायचे असते तिथल्या माणसांनी.
दुर्दैवानी आपण काढलेले फोटो पाहून असे वाटत नाही कि इथे काही सुंदर आहे. मी फ्लोरिडा, बहामा ह्या किनारपट्टीवर जाऊन आलो आहे.
आपण सुध्धा टि एल सी हे च्यानेल पाहू शकता, तिथे फ्लोरिडा, बहामा, हवाई ह्या ठिकाणचे समुद्र किनारे दाखवतात.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. @
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
@ ek_marathi_manus
जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी निसर्ग हा सुंदर असतोच. पण ते सौंदर्य जपायचे आणि जोपासायचे असते तिथल्या माणसांनी.>>>>अगदी अगदी. पूर्णपणे सहमत.
पण ते सौंदर्य जपायचे आणि जोपासायचे असते तिथल्या माणसांनी आणि "पर्यटकांनीही".
दुर्दैवानी आपण काढलेले फोटो पाहून असे वाटत नाही कि इथे काही सुंदर आहे. मी फ्लोरिडा, बहामा ह्या किनारपट्टीवर जाऊन आलो आहे. >>>>>>फ्लोरीडा, बहामा मी पाहिलं नाही, पण कोकणाबद्दल मी निश्चित सांगु शकतो कि कोकण सुंदर आहे"च" (कदाचित इथे ते दाखवण्यात मी आणि माझा कॅमेरा कमी पडला असाव). जसं तुम्ही म्हणतात कि जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी निसर्ग हा सुंदर असतोच अगदी तसंच पण तो पहाणार्याच्या नजरेतसुद्धा असायला हवा ना?
मी म्हणतो फ्लोरीडा, बहामा आणि कोकण comparison कशाला? आणि जर comparisonच करायचे असेल तर सगळ्याच बाबतीत का नाही (पर्यटनाच्या दृष्टीने).
तिथे प्रेमाने,आपुलकीने विचारपूस करणारी माणसे आहेत का? इथल्यासारख्या जेवणाची चव आहे का? आणि बरचं काही. अजुनही लिहायचे मनात आहे पण सध्या इतकेच
छान बिच ! घरगुति राहन्याचि
छान बिच ! घरगुति राहन्याचि सोय होऊ शक्ते का ? निवतिचा पत्ता मिलेल का?
सुंदर...
सुंदर...
i wish i could express myself
i wish i could express myself ,but it is not possible to type in marathi.
when i see all the comments i am wondering how you people type marathi with finace.
can anyone guide how do i type marathi on english keypad please.
thanks
vsthakar या लिंकवर देवनागरीत
vsthakar या लिंकवर देवनागरीत कसे लिहावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे.
http://www.maayboli.com/node/1554
जिप्सीभाऊ सौन्दर्याची तुलना
जिप्सीभाऊ सौन्दर्याची तुलना करणार्यांकडे पाहू नका आपले चालू द्या. सर्व फोटो फारच छान कॅमेरा कोणता माहीत नाही पण कदाचित अॅपर्चर सेटिंग मुळे काही फोटो नीट आले नसावेत दिलेले सारेच फार छान आहेत.
वाह सुंदर प्रकाशचित्रे आणि
वाह सुंदर प्रकाशचित्रे आणि सुंदर वर्णन सुद्धा.....
Pages