'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर
=======================================================================
=======================================================================
वालावलच्या श्रीलक्ष्मीनारायणाचे, नेरूरच्या कलेश्वराचे आणि श्री भगवती देवीचे दर्शन घेतल्यावर आम्ही पाट मार्गे "निवतीला" मुक्कामासाठी निघालो. वेंगुर्ल्याजवळ निवती नावाची दोन गावं आहेत एक किल्ले निवती आणि दुसरे मेढा निवती. मेढा निवती माझा कॉलेजमित्र विवेक याचे आजोळ. मी पूर्वीही येथे एकदा जाऊन जाऊन पहिला पाऊस कोकणातला अनुभवला होता.
पाट-परूळे मार्गे म्हापण तिठ्यावरून वेंगुर्ल्याला जाणार्या रस्त्यावर काहि वेळातच म्हापण, कोचरे करत आपण निवती या गावी पोहचतो. या गावाचे वैशिष्ट्यं असं कि अगदी गाव जवळ येईपर्यंत समुद्राचे दर्शन होत नाही. एका वळणावर गाडी आत शिरताच रस्त्याच्या दोन्ही बाजुला घरं आणि डाव्याबाजुच्या घरापासुन अगदी हाकेच्या अंतरावर समुद्र. शे-दोनशे उंबर्याच्या या गावाला अप्रतिम निसर्गसौंदर्याची झालर आहे. येथील प्रमुख व्यवसाय हा मासेमारी. सध्या निवती गावही पर्यटनाच्या नकाशात झळकु लागल्याने तो व्यवसायही भरभराटीस येऊ लागला आहे. काहि वर्षापूर्वी एकही हॉटेल नसलेल्या या गावात आता रीसॉर्ट दिसू लागलेत.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
विवेक स्वतः आमच्याबरोबर नाही आला, पण त्याने आमच्या राहण्याची, जेवणखाणाची व्यवस्थित सोय त्याच्या घरी करून दिली होती. संध्याकाळी ४ वाजता घरी पोहचताच मामी आमची वाट पहातच उभ्या होत्या. त्यांनी लगबगीने आम्ही राहणार असलेली रूम उघडुन दिली. बॅगा टाकल्या, फ्रेश होऊन तयार होईपर्यंत वैनींनी मस्तपैकी चहा-नाश्ता तयार केला होता त्यावर ताव मारून समुद्राकडे निघालो. मी निवतीला जेंव्हा पहिल्यांदा आलो तेंव्हा पावसाळा सुरू झाल्याने जास्त फिरता आले नाही, सूर्यास्ताचा आनंद लुटता आला नाही, साधा कॅमेरा असल्याने मनासारखे फोटो टिपता आले नाही कि समुद्रात भिजता आले नाही ती सारी कसर या भटकंतीत भरून काढायची होती. एका हातात कॅमेरा आणि दुसर्या हातात चपला सांभाळत मऊशार वाळुतुन चालत चालत निघालो. बीचवर पुढे क्रिकेटचे सामने रंगात आले होते. थोडावेळ तेथे रेंगाळलो.
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
एव्हाना सूर्य अस्ताला जाण्याच्या मार्गावर होता आणि मला सूर्यास्ताचा नजारा चुकवायचा नव्हता.
निसर्गसृष्टीचा आनंद मनमुराद लुटायचा असेल तर घराबाहेर पडाव लागत आणि एकदा घराबाहेर फिरायचे म्हटलं कि नवीन स्थळ शोधाव. एकदा का त्या इच्छित स्थळी पोहचलो कि तेथे काय पहाव हे स्वता:च्या आवडीनुसार ज्याने त्याने ठरवावे. मला समुद्रकिनारी गेल्यावर जास्त काय पहायला आवडतं तर सूर्यास्त आणि त्यानंतर क्षितिजावर होणारी रंगांची उधळण. प्रत्येक ठिकाणच्या सूर्यास्तात वेगळेपणा असतो. फक्त नजर पाहिजे तो पाहण्याची, अनुभवण्याची. याही वेळेस असंच झालं. सायंकाळची विलोभनीय वेळ, रूपेरी वाळुचा मऊशार समुद्रकिनारा, आकाशात बदलत जाणारे रंग, विविध छटा, पाण्यावर उमटणारे प्रतिबिंब, माझी पावलं नकळत त्या ओल्या मऊशार वाळुत खेचली जाऊ लागली. एरव्ही स्वत:कडे कुणाला पाहुही न देणारा हा तेजाचा गोळा हळुहळु आपलं रूप बदलु लागला. आता त्याचा लालबुंद आणि भव्य आकार सहज स्पष्ट दिसू लागला. सूर्य हळुहळु खाली येऊ लागला. माझी पर्यायाने कॅमेर्याची नजर फक्त आणि फक्त त्याच्याकडेच. भव्य व लोभस सूर्याचा लालबुंद गोळा पाण्याजवळ आला. त्याचं पाण्यातलं प्रतिबिंबही तेव्हढंच लोभस. पाहता पाहता सूर्याचा अस्त झाला. जाता जाताही तो आकाशावर विविध रंगाच्या छटा , वेगवेगळ्या आकाराच्या रंगीबेरंगी रांगोळ्या काढुन गेला. निसर्गाचा हा अविष्कार डोळ्यात साठवू कि कॅमेर्यात अशी संभ्रमावस्था माझी झाली. अगदी काळोख होईपर्यंत निसर्गाचा हा खेळ पाहत होतो.
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
थोड्यावेळाने, घरी परतलो. संकष्टी असल्याने "शुक्रवारी(ही)" रात्री शाकाहारी जेवणाचा बेत होता. वाटाण्याचा सांबर, भात, चवळीच्या शेंगाची भरपूर खोबरं घालुन केलेली भाजी, बटाट्याची भाजी, चपाती आणि उकडीचे मोदक असा फर्मास बेत वैनींनी केला होता. त्यामुळे "कोकणात" असुनही "शाकाहारी शुक्रवार" सत्कारणी लागला (रच्याकने उकडीचे मोदक किती फस्त केले ते विचारू नका
).
जेवणानंतर समुद्रकिनारी पुन्हा गेलो आणि बराच वेळ मित्रांसोबत गप्पा मारत बसलो. आमच्या गप्पांबरोबर समुद्रालाही उधाण येत होते. सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा समुद्राला साक्षी ठेवून पाहिल्यानंतर आता वेध होते "चांदाची किरण दर्यावरी" पाहण्याचे. अगदी पौर्णिमेचा नाही पण पौर्णिमेच्या नंतरच्या चतुर्थीचा चंद्र आणि चंद्रकिरण सागरावर बघायचे होते. काहिवेळाने चंद्र उगवला आणि "बघुनी नभीची चंद्रकोर ती सागर हृदयी उर्मी उठती" अशी अवस्था त्या रत्नाकराची झाली होती. चंद्र समुद्राच्या मध्यावर येण्यास बराच अवधी होता. दिवसभराच्या थकव्याने आणि दुसर्या दिवशी लवकर उठायचे असल्याने नाईलाजाने आम्ही घराकडे परत निघालो आणि निद्रेच्या स्वाधीन झालो. दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठुन शुचिर्भुत होऊन चहा पोह्याचा नाश्ता करून मी पुन्हा समुद्राकडे फिरायला गेलो.
समुद्राचा खारावारा आणि अंगावर उडणार्या लाटेंचे तुषार झेलत पाण्यात उभे राहुन कालचा निसर्गोत्सव आठवताना दवणेसरांच्या गीताचे काही बोल ओठांवर आले.
नव्हता पाऊस झरला तरी हा गंधित वारा
थेंबाथेंबामधुनी उजळे सोनपिसारा
भरतीच्या त्या लाटे तरीगे आलो भरूनी
बोलल्याविना हृदयामधले गेले निघुनी...........
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
अर्थात आम्हाला जाग येण्याआधीच निवती गाव जागे झाले होते. मुख्य व्यवसाय मासेमारी असल्याने रात्रभर दर्याचं धन लुटुन सागरपुत्र घरी परतत होते आणि आपल्या धनाच्या राशी बंदरावर टाकत होत्या.
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
थोड्या वेळाने तेथे माशांचा लिलाव सुरू झाला. आम्ही सगळेच पहिल्यांदाच ते पाहत होतो. ४००, ४१०, ५००, १२०० अशी बोली वाढत मासे हातोहात खपले जात होते. कोळंबी, बांगडे, सवंदाळे असे आणि इतर बरेच मासे लिलावात होते.
घेऊनशी जा रं ताजा ताजा दादा ताजा ताजा
चिकना चिकना म्हावरा माझा
प्रचि २३
बोलु नको नै बरफाचा ह्यो
नीट बघं नै कालपरवाचा ह्यो
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
हा मासा मासेमारीच्या जाळ्या खातो/तोडतो तसंच याला कुणी खातही असं आम्हाला सांगितलं.
आणि त्याला समुद्रात परत टाकुही शकत नाही म्हणुन त्याची अवस्था अशी.
प्रचि ३२
एव्हाना सुधीरने (विवेकचा भाऊ) आम्हाला निवतीच्या समुद्रात नेण्यासाठी बोट तयार असल्याचे सांगितले आणि आम्ही "निवतीच्या समुद्रात"सफर करण्यास निघालो".(क्रमशः)
माझ्या मूर्खपणामुळे निवती
माझ्या मूर्खपणामुळे निवती बीचवर काढलेले संध्याकाळचे/सकाळचे बहुतेक फोटो गंडले. जे चांगले वाटले ते इथे प्रदर्शित केले. (प्रचि १३ वरून अंदाज येईल).
प्रचि १३..पाहतानाच खास वाटत
प्रचि १३..पाहतानाच खास वाटत होता..तेव्हढ्यात तू लिहिलेही ..

सर्व फोटो खूप सुंदर आलेत (नेहमीप्रमाणे)
सूर्यास्ताच्या वेळी आकाशात जे रंग उधळलेत ते तर अप्रतिम टिपलेत
आता पुन्हा एकदा जा ,बीच चे फोटो नीट काढायला.. हाकानाका
परत एकदा झक्कास!!!
परत एकदा झक्कास!!!
मस्त रे जिप्स्या ... तुझी
मस्त रे जिप्स्या ... तुझी लेखनशैली सुद्धा हळुहळु बहरु लागलेय.
मस्तच रे.. १ ला तर खूप
मस्तच रे.. १ ला तर खूप आवडला.. माश्यांचे फोटो एकदम सॉल्लिड !! १० पैंकी १०० मार्क्स तुला...
प्रचि २६,२९,३०,३१ तर एका पेक्षा एक !
लेखनशैली सुद्धा हळुहळु बहरु लागलेय. >> अरे आधीपासूनच आहे.. कोकणात गेल्यावर मात्र काय पाहिले कुणास ठाउक.. त्याला आठवण झाली स्वत:च्या लेखनशैलीची !
वॉव, तोंपासू फोटो टाकलेत रे
वॉव, तोंपासू फोटो टाकलेत रे जिप्सी! तो निळा खेकडा काय मस्त आहे. आणि बाकीचे मासे, स्क्वीड, रे, कोळंब्या .... आहा!
प्रचि १ आणि ८ फारच आवडले.
मस्तच. पहिला फोटो पाहूनच
मस्तच.
पहिला फोटो पाहूनच तोंडातून 'वा!' बाहेर पडलं.
माझ्या मूर्खपणामुळे निवती
माझ्या मूर्खपणामुळे निवती बीचवर काढलेले संध्याकाळचे/सकाळचे बहुतेक फोटो गंडले >>> असं करू नै
निवती गावाचे सुंदर दर्शन
निवती गावाचे सुंदर दर्शन घडवलेत. प्रचि ५ मधला समुद्रफेस खासच!
एक से बढकर एक!!!! अप्रतिम
एक से बढकर एक!!!!
अप्रतिम फोटो
१ आणि ११ आवडले 
काय फोटोज् आहे
काय फोटोज् आहे मित्रा...
लिखाणही मस्त...
आता हळूहळू तु फोटोग्राफर कम लेखक होतोयस की काय?
सर्वच काही झकास जमुन आलयं...
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
काय फोटोज् आहे
काय फोटोज् आहे मित्रा...
लिखाणही मस्त...
आता हळूहळू तु फोटोग्राफर कम लेखक होतोयस की काय?+१११११११११११११११
कवी झालायच आता लेखकही.
फुटलेल्या लाटेचा फोटो खुपच आवडला.
फोटो चांगले आलेत. किनारा
फोटो चांगले आलेत.
किनारा क्लीन नाही असं वाटलं प्रचि पाहतांना ( हर्णे बंदरासारखा आहे का ? ) . कोकणाला निसर्गाचा लाभलेला वरदहस्त कॅमे-याने चांगलाच टिपलाय. मागे डोंगररांगा आहेत का ?
पुण्यावरून कसं जावं ?
भारी रे! निवती बीचवरच्या फेमस
भारी रे! निवती बीचवरच्या फेमस 'यो ROCK' चे फोटो दाखव.. वेंगुर्ले rocks ला जाऊन आलास कांय?
छान फोटो
छान फोटो
एरव्ही स्वत:कडे कुणाला पाहुही
एरव्ही स्वत:कडे कुणाला पाहुही न देणारा हा तेजाचा गोळा हळुहळु आपलं रूप बदलु लागला. आता त्याचा लालबुंद आणि भव्य आकार सहज स्पष्ट दिसू लागला. >>>>
काय सुंदर लिहिलंय!! आणि निवतीचं सौंदर्य पाहून डोळे निवले! धन्यवाद जिप्स्या.:स्मित:
जिप्स्या ते मासे मला पाहीजेत.
जिप्स्या ते मासे मला पाहीजेत.
मस्तच. तु किल्याचे फोटो का नाही काढलेस ?
धन्यवाद लोक्स आता पुन्हा
धन्यवाद लोक्स
आता पुन्हा एकदा जा ,बीच चे फोटो नीट काढायला

असं करू नै>>>>>>>>>
तुझी लेखनशैली सुद्धा हळुहळु बहरु लागलेय.
फोटो काढताना, बघताना जे मनात आलं ते टाईप केलं
अरे आधीपासूनच आहे.. कोकणात गेल्यावर मात्र काय पाहिले कुणास ठाउक.. त्याला आठवण झाली स्वत:च्या लेखनशैलीची !
आता हळूहळू तु फोटोग्राफर कम लेखक होतोयस की काय?
कवी झालायच आता लेखकही.>>>> तसंल काहि एक नाही.
( हर्णे बंदरासारखा आहे का ? ) .>>>>निवती एक छोटंस गाव आहे. हर्णे बंदराइतका माशांचा लिलाव इथे नाही होत.
याबाबतील मायबोलीकर अतुलनीय हे जास्त मदत करू शकतील. त्यांनीसुद्धा नुकतीच पुण्याहुन या भागाची भटकंती केली होती.
कोकणाला निसर्गाचा लाभलेला वरदहस्त कॅमे-याने चांगलाच टिपलाय. मागे डोंगररांगा आहेत का ?>>>>>येस्स
पुण्यावरून कसं जावं ?>>>>युगा
निवती बीचवरच्या फेमस 'यो ROCK' चे फोटो दाखव.. वेंगुर्ले rocks ला जाऊन आलास कांय?>>>>वेंगुर्ला रॉक्स नाही पाहिले पण निवती रॉक्सचे फोटो पुढच्या भागात.
तु किल्याचे फोटो का नाही काढलेस ?>>>>निवती किल्ला बोटीतुन लांबुनच पाहिला
मस्त फोटोज!!
मस्त फोटोज!!
प्र.ची. १, ६, ७, ९, १०, १५
प्र.ची. १, ६, ७, ९, १०, १५ तसेच १८ खूपच आवडले.
निवती किल्ला बोटीतुन लांबुनच
निवती किल्ला बोटीतुन लांबुनच पाहिला हात्ती sss च्या मारी!! भोगवे बीचचा फेमस फोटो तिथून भारी येतो..
वा मस्तच जिप्सी, निवती च्या
वा मस्तच जिप्सी, निवती च्या किल्ल्यावर नाही गेलास का ??
मस्त रे, एकदम झकास
मस्त रे, एकदम झकास
भोगवे बीचचा फेमस फोटो तिथून
भोगवे बीचचा फेमस फोटो तिथून भारी येतो..
निवती च्या किल्ल्यावर नाही गेलास का ??>>>>>खरे तर निवतीहुन पुढे निवतीचा किल्ला चढुन मग भोगवेला जायचा प्लान होता, पण समुद्रातच फिरण्यास जवळपास दोन तास लागले. म्हणुन प्लान रद्द केला.
<< निवती च्या किल्ल्यावर नाही
<< निवती च्या किल्ल्यावर नाही गेलास का ??>>>>> जिप्सीजी, तुमचे बोटीतून काढलेले फोटो पाहून उद्यां लोक <<हात्ती sss च्या मारी!! निवतीच्या किल्ल्याचा फेमस फोटो बोटीतूनच भारी येतो..>> असंही म्हणतीलच ना !
पण, निवतीच्या किल्ल्यावर थंड ,खारं वारं अंगावर घेत उभं राहून अथांग सागर व खूप खालीं दिसणारी भोगव्याची किनारपट्टी पहाणं ही एक अनुभूतिच आहे, हेंही तितकंच खरं !!
अरे वा काय मस्त ताजे ताजे
अरे वा काय मस्त ताजे ताजे माशे
समुद्र किनारे, सुर्यास्त सारं फारच सुरेख! 
मस्त फोटो. पहिला फोटोच इतका
मस्त फोटो. पहिला फोटोच इतका आवडला. आता बाकीचे पण मन लावून पाहिन.
आपलेच गाव, दुसर्याच्या
आपलेच गाव, दुसर्याच्या नजरेतून बघताना आणखीन छान दिसते !!
मस्त..
मस्त..:)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स

भाऊकाका
Pages