लग्न लग्न म्हणजे काय असतं?
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं
तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं
तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी समझोता तर कधी भांडण असतं
तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं
सुंदर कविता
सुंदर कविता
विस्कळीतपना असलातरी भावना
विस्कळीतपना असलातरी भावना चांगल्या म्हणून आवडली.
किती सुंदर कविता आहे. आवडली.
किती सुंदर कविता आहे. आवडली.
>>>>>>>तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.
वाह!!!
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं >>> अस्सल कल्पना
लग्ना बद्दलचा कल्पना विलास
अपेक्षा आणि वास्तव धाग्यावर
अपेक्षा आणि वास्तव धाग्यावर हवी ही कविता :दिवे: