३ मार्च २०१२ - मुंबई गटग - विनय देसाई

Submitted by नीलू on 24 February, 2012 - 06:56
ठिकाण/पत्ता: 
गणेश उद्यान, शिवाजी पार्क, दादर

.
.
मंडळीनू,

आपले हे मा अर्थात विनय देसाई हे भारत दौर्‍यार ईलेत.
सध्या कुडाळाक आसत पण १ तारखेपर्यंत मुंबैत येतले. आणि पुन्हा चार तारखेक माघारा जातले तेव्हा ३ तारीख शनिवारचो मुहूर्त साधून त्येंच्या भेटीचो गटग संपन्न करुया. Happy

एक तर विनयदादांची रविवारी जावची लगबग आसतली आणि काही लोकांका रविवार असो 'फुकट' घालवूक आवाडणा नाय. Wink शिवाय रेल्वेचे मेगाब्लॉक वगैरे यामुळे येवचे वगीच वांदे नको म्हणून शनिवार मुद्दाम धरलो हा.

तेव्हा येवक लागा.
वायच तेव्हढी नोंदणी करा पयली Happy

त.टि. : क्षुधाशांतीसाठी पार्कातलो वड्याचो कट्टो फेमस आसाच पण याव्यतिरिक्त कोणाक काय सगळ्यांसाठी हाडुचा आसात तर सहर्ष स्वागत आसा Proud
________________________________________________________________________
स्थळः गणेश उद्यान, शिवाजी पार्क, दादर
वेळ : संध्याकाळी ४.३०

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, March 3, 2012 - 06:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

आसो एकूण धयकालो नी शिमग्याशिवाय गजाली गटगक मजा कसली ? <<<
रोंबाट रवला Happy

Majaa kelaas tar .. Mii misalay.

Nee, maalavaNi mastach livatas go.

सौ. जाजूदेवी ह्येंचो बहु-चर्चीत आणी प्रतिक्षीत कार्यक्रम 'मालवणी ठुमरी गायन' (जेच्यासाठी 'ग-ट-ग' निमित्तान 'शिवाजी पार्क' मुद्दाम आरक्षीत करुन घेतलेलां...), काही अपरीहार्य (हे.मा. हसा नकात, माका म्हायत आसा, तुमका कॉलेजच्या ग्यादरिंगातली अनावन्समेन्ट आठावतली...) तांत्रीक कारणांमुळे अनपेक्षीतपणे रद्द झालो. परीणामी ग-ट-गक हजर र्‍हवणार्‍यांची उपस्थिती रोडावली. ग-ट-ग आयोजक (आडमिन्-बाई) ह्येणी ही बातमी गुलदस्तात ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केलेल्यांनी, पण सौ. जाजूदेवी ह्येंच्या सोबतच्या अपेक्षीत साथीदारांनीच (मु.पो. ठाणे आणी गोरेगाव-पूर्व) ही बातमी 'लिक' केली, असो दाट संशय आसा...:डोमा: ...
सदर कार्यक्रमाच्या अपेक्षेन चित्रपट जगतातली काही मान्यवर व्यक्तीमत्वां देखिल या ग-ट-ग साठी उपस्थीत होती, पण ऐन वेळी गायन रद्द झाल्यामुळे, त्येणी थंयच्या-थंय निषेध नोंदवन ग-ट-ग मधून काढतो पाय घेतलो, अशी कानावर ईलेली बातमी... Proud ... स्वतः उत्सवमूर्ती देखिल या कार्यक्रमाच्या अपेक्षेन ईलेले, जेणे करून परदेशात होणारी विविध ग-ट-ग, स्नेहसंमेलनां, विविध सांस्कृतीक कार्यक्रमातसून या 'ठुमरी-गायन' कार्यक्रमाक विशेष प्रसिद्धी देवचो तेंचो विचार होतो... पण, ऐन्वेळी कार्यक्रम रद्द झालो, साथीदारांनी कार्यक्रम स्थळाकडे अक्षरशः पाठ फिरवली (आताच हाती ईलेल्या बातमीनुसार एक महत्वाचो साथीदार अपघात्ग्रस्त झालो, असा समाजता...), उपस्थीतांचो हीरमोड झालो... वगैरे, मुळे उत्सवमुर्तीनी 'ग-ट-ग' मधेच 'उभ्या-उभ्या निषेध' नोंदवलो... Proud ... आणी 'परदेशात अश्या प्रकारचे कार्यक्रम आयोजीत करताना, खूपच सावधान र्‍हवाक होयां' असो महत्वाचो निर्णय घेतलो, अशी खात्रीलायक बातमी कानावर ईली...
Proud

>> स्वतः उत्सवमूर्ती देखिल या कार्यक्रमाच्या अपेक्षेन ईलेले,>> अगदी अगदी त्येंनी माका खूप कुतूहलाने ईचारल्यानी सुद्धा जाजू खराच ठुमरी गाता काय? ह्यावर मी ता कायतरी(च) गाता अशी माहिती पुरवलय तर चतुर हे. मा. नी त्यातल्या 'तर' चो आणि कंसातल्या 'च'चोव भाव अचूक ओळखल्यानी Wink

>> 'उभ्या-उभ्या निषेध' >> Lol

जाजूची ठुमरी असतली म्हणान खरां तर मी इलेलय... मगे वड्यार भागवचां लागलां...

खूप वर्षानी थोडे जुने, थोडे नवे भेटले .. बरां वाटला..

पु. ल. आणि मी हेंच्यात एका चष्म्याचा साम्य आसा.. Happy

Pages