Submitted by अनिल तापकीर on 18 February, 2012 - 08:04
असा कसा रे वेड्या,वेडा विचार तू करतो |
मोठा झाल्यावरी मायबापा विसरतो |
उन्हा पावसात त्यांनी झिजवली काया |
स्वतः उपाशी राहून, तुज घातले रे खाया |
झालास आज, तू कितीजरी मोठा |
मायबापापुढे तू,आहेस अजून छोटा |
आजवरी त्यांनी पाहिलं, एकच सपान |
म्हातारपणी तरी आम्हा, जपावं मुलानं |
काहीही झाले तरी, सेवा त्यांची सोडू नको |
कोणाच्याही नादानं, वेडा विचार करू नको |
आतातरी सेवा करण्याचा, संकल्प तू सोड |
सेवा करून त्यांची,कर शेवट तू गोड |
गुलमोहर:
शेअर करा
गोड शेवट
गोड शेवट
छान मात्र जुना विचार,
छान मात्र जुना विचार, शुभेच्छा