'कोकणमय'

Submitted by जिप्सी on 16 February, 2012 - 13:20

सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन

अशा या तळकोकणाची/नंदनवनाची आठवण होण्याचे कारण कि नुकताच करून आलेलो कोकणचा दौरा. तसा मूळचा मी देशावरचा त्यामुळे कोकणात जाण्याचा योग फारच कमी आला. अगदी ७-८ वर्षापूर्वी माझ्यासाठी कोकण म्हणजे अलिबागच. साधारण ८ वर्षापूर्वी एका मित्रासोबत रत्नागिरी-कुणकेश्वर-निवती भटकंती करण्याचा योग आला आणि त्या दिवसापासुन कोकणाच्या प्रेमात पडलो ते आजतागायत. त्यानंतर कोकणात भटकण्याचा योग बर्‍याचदा आला (किंबहुना जुळवुनच आणला). रत्नागिरी, चिपळुण, दापोली, हरीहरेश्वर, श्रीवर्धन, गुहागर, मालवण आणि आताच्या भेटीत वेंगुर्ला असा बराचसा प्रांत भटकुन झालाय. प्रत्येक वेळेस त्याचे रूप निरनिराळे भासले.

आताच्या कोकण दौर्‍यात कुडाळ, धामापूर, वालावल, नेरूरपार, निवती, भोगवे, मालवण, आंगणेवाडी, सिंधूदुर्ग किल्ला, तारकर्ली, देवबाग, रेडी, अरवली, कुणकेश्वर, विजयदुर्ग किल्ला असा भरगच्च कार्यक्रम पार पाडला. मी आधीही म्हटल्याप्रमाणे माझी पहिली आवड म्हणजे भटकंती आणि दुसरी फोटोग्राफी. या कोकण दौर्‍याच्या वेळेस मी "कोकण पाहण्यापेक्षा अनुभवणार जास्त होतो". काहि काही गोष्टी कॅमेर्‍यात बंद नाही करता येत. त्या अनुभवायलाच पाहिजे. कोकणी माणसांचा आदरतिथ्य, वडेसागोतीचा स्वाद, बांगड्याचे तिखले, निसर्गाची साद, सागराची गाज, काजू/आंबा मोहराचा सुवास या गोष्टी कॅमेर्‍यात नाही बंद करू शकत. या भटकंतीत अस्मादिकांनी कोकण फक्त पाहिला नाही तर तो अनुभवला.

तरीही माझ्या नजरेने टिपलेला कोकण तुमच्या समोर मालिकेच्या स्वरूपात आणत आहे. याच मालिकेचा पहिला भाग हि "प्रस्तावना". प्रकाशचित्रे तुम्हाला आवडली तर ती कोकणच्या सौंदर्याची किमया आणि नाही आवडली तर तो माझ्या फोटोग्राफीचा दोष. Happy

कोकणाबद्दल मी एकच बोलु इच्छितो — "तेरा मुझसे है पहले का नाता कोई, युंही नही दिल लुभाता कोई..."

अशा या कोकण दौर्‍याने भारावून मी चार-पाच ओळी खरडण्याचा (पहिल्यांदाच) प्रयत्न केला आहे. प्रकाशचित्रांप्रमाणे याही तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.

"कोकणमय"
कोकण म्हणजे लाल मातीतली वाट, कोकण म्हणजे निसर्गाचा थाट
कोकण म्हणजे भरलेला पापलेट, कोकण म्हणजे वडे सागोतीच ताट
कोकण म्हणजे बांगड्याचे तिखले, कोकण म्हणजे जीभेचे चोचले
कोकण म्हणजे अबोलीचं फुल, कोकण म्हणजे जीवाला भूल
कोकण म्हणजे देव रवळनाथ, कोकण म्हणजे देवापुढे जोडलेले हात
कोकण म्हणजे सारवलेलं अंगण, कोकण म्हणजे तुळशी वृंदावन
कोकण म्हणजे मालवणचा खाजा, कोकण म्हणजे फळांचा राजा
कोकण म्हणजे चहा आंबोळ्या, कोकण म्हणजे दारावरच्या रांगोळ्या
कोकण म्हणजे निळी खाडी, कोकण म्हणजे माडाची झाडी
कोकण म्हणजे सागराची गाज, कोकण म्हणजे रूपेरी वाळुचा साज
कोकण म्हणजे दशावतारी खेळ, कोकण म्हणजे भावभक्तीचा मेळ
कोकण म्हणजे वाळुची पुळण, कोकण म्हणजे घाटाचे वळण
कोकण म्हणजे फणस काजू आंबा, कोकण म्हणजे आंबटगोड रातांबा
कोकण म्हणजे मामाचं कौलारू घर, कोकण म्हणजे आजीच्या मायेचा पदर
कोकणातली माणसं वाटतात आपली, मैत्रीची हि नाती कायम मनात जपली
कोकण म्हणजे लोकसंगीतातली लय, झालो मी पुरता "कोकणमय"
कोकण म्हणजे तांदळाची पेज आणि चुलीत भाजलेला मासा
म्हणुनच तर म्हणतंय "येवा कोकण आपलोच आसा"

प्रचि ०१
( गिर्ये येथील रामेश्वर मंदिरातील श्री मूर्ती,रेडीचा गणपती, जयगणेश मंदिर (मालवण), लक्ष्मीनारायण (वालावल), सातेरी देवी (सरंबळ-कुडाळ), मानसीश्वर (वेंगुर्ला), वेतोबा (आरवली), श्री देवी भगवती (धामापूर) )

प्रचि ०२
सरंबळ (कुडाळ)

प्रचि ०३
कांदळगाव (मालवण)

प्रचि ०४
नेरूरपार

प्रचि ०५
श्री कलेश्वर मंदिर (नेरूरपार)

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
नेरूरपार

प्रचि १०
नेरूरपार

प्रचि ११
निवतीचा समुद्रकिनारा

प्रचि १२
निवतीचा समुद्रकिनारा

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
निवती बॅकवॉटर

प्रचि १६
निवती

प्रचि १७
भोगवे

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
निवती

प्रचि २१
देवबाग बॅकवॉटर

प्रचि २२
किल्ले सिंधुदुर्ग

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
मालवण

प्रचि २६
किल्ले विजयदुर्ग

प्रचि २७
वाडातर

प्रचि २८

प्रचि २९
वाडातर पूल

प्रचि ३०
वाडातर

प्रचि ३१
नेरूरपार

प्रचि ३२
नेरूरपार

प्रचि ३३
देवबाग समुद्रकिनारा

प्रचि ३४
(क्रमशः)

गुलमोहर: 

अतिशय सुंदर मित्रा...
काही काही फोटोज् तर अफाट आहेत.. जसे प्रचि ३३...
पुढचे पण लवकर येऊदेत.

जिप्सी हा भाग मी आणि आणखीन दोन जालीय मित्रांनी गेल्या महिन्यातच मस्तपैकी एन्जॉय केला आणि आता तुम्ही दिलेली ही प्रकाशचित्रे पाहाताना त्या सार्‍या 'धूम' आठवणी कंठी दाटून आल्या आहेत. विशेषतः "देवबाग" मस्तच. ज्या रीसॉर्टमध्ये [मालकाचे नावही अफलातून ~ देवानंद चिंदरकर] आम्ही राहिलो त्याच्या अगदी समोरच तुमच्या फोटोतील समुद्रकिनारा, म्हणजे रूमच्या दारातूनही तो फेस दिसत असे. झकासच.

शिवाय त्या अगोदर मालवणच्या 'चैतन्य' मधील विविध माशांना न थकता पोटात जागा देऊ केल्याने उभे कोकण आमच्यावर प्रसन्न होते असे म्हटले तरी वावगे नाही.

तुम्ही दिलेले फोटो इतके जातिवंत की आताही गाडी काढावी आणि परत ती सफर करावी. गोव्यानंतर लागणार्‍या कारवार किनार्‍यावरही एक 'देवबाग' आहे. तुम्ही जरूर तिथेही तुमचा जादुभरा कॅमेरा घेऊन एकदा जावे अशी मुद्दाम शिफारस करीत आहे.

अशोक पाटील

जिप्सी, वर सगळ्यांनी तुमच्या फोटोग्राफीबद्द्ल लिहिलंच आहे . त्याशिवाय माझ्याकडे वेगळे शब्दच नाहीत. फोटो क्रमांक १८ (काजूंचा) पाहून लहानपणचे दिवस अगदि डोळ्यासमोर उभे राहिले.

जिप्सी. वा वा वा.. अजून फोटो येऊ देत.

सर्वच फोटो उत्तम. मला ते मासा घेऊन जाणारे आजोबांचा फोटो आवडला.

शेवटचा फोटो तर तोंपासू आहे.

सुंदर प्रचि Happy
माझ्या कोकणप्रेमात भर घातल्याबद्दल धन्यवाद Happy
आता मात्र माका एक्दा तरी कोकणात जावाक पायजेल. Happy

अजून आसत कांय!.. निवतीचो किल्लो नाय बगलास? ..नि इक्त्या जवल जावन परुळ्याक कित्या नांय गेल्लंस? Happy
एक्क्क्क्क्क्दम जब्ब्ब्ब्र्र्र्र्राट फोट्ट्ट्ट्टो!!!

kyaa baat hai ! Happy

भारी फोटो रे जिप्स्या.. Happy
तुला आमच्या युनिटबरोबर स्टिल फोटोग्राफर म्हणून घेऊन गेलं पाहिजे. कमाल करशील Happy

बाकी
आधीच्या जन्मातले नाते आठवायची आवश्यकता नाहीय, तुला या जन्मातही नाते जोडायचा एक चान्स आहे अजुन... त्याचा योग्य तो वापर करावा <<<
साधनेस अनुचमोदन! Happy

आता ही काडी!
तो दगडू बघ... स्वतःचे झाले आता तुला अडकवण्याच्या मागे लागलाय लगेच Wink

धन्स नी Happy

तो दगडू बघ... स्वतःचे झाले आता तुला अडकवण्याच्या मागे लागलाय लगेच>>>>>>:फिदी:

जिप्सी ,

अचाट, अफाट फोटो, खरोखर गावाची आठवण आली, आता कितीत्येक वर्ष झाली

गावी जाउन अस वाटत.

ध न्य वा द ,

@ जिप्सी <<<आताच्या कोकण दौर्‍यात कुडाळ, धामापूर, वालावल, नेरूरपार, निवती, भोगवे, मालवण, आंगणेवाडी, सिंधूदुर्ग किल्ला, तारकर्ली, देवबाग, रेडी, अरवली, कुणकेश्वर, विजयदुर्ग किल्ला असा भरगच्च कार्यक्रम पार पाडला>>>ह्या दौर्‍याला किती दिवस लागले ते लिहाल का?

मला हे कोकन मय लिखान खुप आवडले आहे..........आनि माझी आता कोकन फिरायचि खुप इछा झालि आहे.................

ह्या दौर्‍याला किती दिवस लागले ते लिहाल का?>>>>हा दौरा आम्ही तीन रात्र आणि चार दिवसात पूर्ण केला. Happy

धन्स जिप्सी. Happy इतक्या कमी दिवसांत एवढी ठिकाणे व एवढ्या अभ्यासपुर्ण माहितीसकट!कमाल आहे तुमची!

आहा...कोकण. माझ्या ड्रीम डेस्टिनेशन ची अप्रतिम चित्रसफर. तुम्ही केलेली कविता कोकणाचं काही ओळीतच फार सुंदर चित्र डोळ्यासमोर उभं करते.
हे फोटो पाहून सारखं वाटतय की कोकणाला केरळ प्रमाणे एक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय टूरिस्ट डेस्टिनेशन म्हणून जो मान, जे ग्लॅमर मिळायला हवंय ते मिळालं नाहीये. इतकं अप्रतिम निसर्ग-सौंदर्य असून इंटरनॅशनल टूरिस्ट मॅप वर अजूनही कोकण नाही आहे, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र टूरिसम ने हा भाग जरा डेवेलप केला आणि पब्लिसिटी केली तर किती छान होईल.

Pages