'कोकणमय'

Submitted by जिप्सी on 16 February, 2012 - 13:20

सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन

अशा या तळकोकणाची/नंदनवनाची आठवण होण्याचे कारण कि नुकताच करून आलेलो कोकणचा दौरा. तसा मूळचा मी देशावरचा त्यामुळे कोकणात जाण्याचा योग फारच कमी आला. अगदी ७-८ वर्षापूर्वी माझ्यासाठी कोकण म्हणजे अलिबागच. साधारण ८ वर्षापूर्वी एका मित्रासोबत रत्नागिरी-कुणकेश्वर-निवती भटकंती करण्याचा योग आला आणि त्या दिवसापासुन कोकणाच्या प्रेमात पडलो ते आजतागायत. त्यानंतर कोकणात भटकण्याचा योग बर्‍याचदा आला (किंबहुना जुळवुनच आणला). रत्नागिरी, चिपळुण, दापोली, हरीहरेश्वर, श्रीवर्धन, गुहागर, मालवण आणि आताच्या भेटीत वेंगुर्ला असा बराचसा प्रांत भटकुन झालाय. प्रत्येक वेळेस त्याचे रूप निरनिराळे भासले.

आताच्या कोकण दौर्‍यात कुडाळ, धामापूर, वालावल, नेरूरपार, निवती, भोगवे, मालवण, आंगणेवाडी, सिंधूदुर्ग किल्ला, तारकर्ली, देवबाग, रेडी, अरवली, कुणकेश्वर, विजयदुर्ग किल्ला असा भरगच्च कार्यक्रम पार पाडला. मी आधीही म्हटल्याप्रमाणे माझी पहिली आवड म्हणजे भटकंती आणि दुसरी फोटोग्राफी. या कोकण दौर्‍याच्या वेळेस मी "कोकण पाहण्यापेक्षा अनुभवणार जास्त होतो". काहि काही गोष्टी कॅमेर्‍यात बंद नाही करता येत. त्या अनुभवायलाच पाहिजे. कोकणी माणसांचा आदरतिथ्य, वडेसागोतीचा स्वाद, बांगड्याचे तिखले, निसर्गाची साद, सागराची गाज, काजू/आंबा मोहराचा सुवास या गोष्टी कॅमेर्‍यात नाही बंद करू शकत. या भटकंतीत अस्मादिकांनी कोकण फक्त पाहिला नाही तर तो अनुभवला.

तरीही माझ्या नजरेने टिपलेला कोकण तुमच्या समोर मालिकेच्या स्वरूपात आणत आहे. याच मालिकेचा पहिला भाग हि "प्रस्तावना". प्रकाशचित्रे तुम्हाला आवडली तर ती कोकणच्या सौंदर्याची किमया आणि नाही आवडली तर तो माझ्या फोटोग्राफीचा दोष. Happy

कोकणाबद्दल मी एकच बोलु इच्छितो — "तेरा मुझसे है पहले का नाता कोई, युंही नही दिल लुभाता कोई..."

अशा या कोकण दौर्‍याने भारावून मी चार-पाच ओळी खरडण्याचा (पहिल्यांदाच) प्रयत्न केला आहे. प्रकाशचित्रांप्रमाणे याही तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.

"कोकणमय"
कोकण म्हणजे लाल मातीतली वाट, कोकण म्हणजे निसर्गाचा थाट
कोकण म्हणजे भरलेला पापलेट, कोकण म्हणजे वडे सागोतीच ताट
कोकण म्हणजे बांगड्याचे तिखले, कोकण म्हणजे जीभेचे चोचले
कोकण म्हणजे अबोलीचं फुल, कोकण म्हणजे जीवाला भूल
कोकण म्हणजे देव रवळनाथ, कोकण म्हणजे देवापुढे जोडलेले हात
कोकण म्हणजे सारवलेलं अंगण, कोकण म्हणजे तुळशी वृंदावन
कोकण म्हणजे मालवणचा खाजा, कोकण म्हणजे फळांचा राजा
कोकण म्हणजे चहा आंबोळ्या, कोकण म्हणजे दारावरच्या रांगोळ्या
कोकण म्हणजे निळी खाडी, कोकण म्हणजे माडाची झाडी
कोकण म्हणजे सागराची गाज, कोकण म्हणजे रूपेरी वाळुचा साज
कोकण म्हणजे दशावतारी खेळ, कोकण म्हणजे भावभक्तीचा मेळ
कोकण म्हणजे वाळुची पुळण, कोकण म्हणजे घाटाचे वळण
कोकण म्हणजे फणस काजू आंबा, कोकण म्हणजे आंबटगोड रातांबा
कोकण म्हणजे मामाचं कौलारू घर, कोकण म्हणजे आजीच्या मायेचा पदर
कोकणातली माणसं वाटतात आपली, मैत्रीची हि नाती कायम मनात जपली
कोकण म्हणजे लोकसंगीतातली लय, झालो मी पुरता "कोकणमय"
कोकण म्हणजे तांदळाची पेज आणि चुलीत भाजलेला मासा
म्हणुनच तर म्हणतंय "येवा कोकण आपलोच आसा"

प्रचि ०१
( गिर्ये येथील रामेश्वर मंदिरातील श्री मूर्ती,रेडीचा गणपती, जयगणेश मंदिर (मालवण), लक्ष्मीनारायण (वालावल), सातेरी देवी (सरंबळ-कुडाळ), मानसीश्वर (वेंगुर्ला), वेतोबा (आरवली), श्री देवी भगवती (धामापूर) )

प्रचि ०२
सरंबळ (कुडाळ)

प्रचि ०३
कांदळगाव (मालवण)

प्रचि ०४
नेरूरपार

प्रचि ०५
श्री कलेश्वर मंदिर (नेरूरपार)

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
नेरूरपार

प्रचि १०
नेरूरपार

प्रचि ११
निवतीचा समुद्रकिनारा

प्रचि १२
निवतीचा समुद्रकिनारा

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
निवती बॅकवॉटर

प्रचि १६
निवती

प्रचि १७
भोगवे

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
निवती

प्रचि २१
देवबाग बॅकवॉटर

प्रचि २२
किल्ले सिंधुदुर्ग

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
मालवण

प्रचि २६
किल्ले विजयदुर्ग

प्रचि २७
वाडातर

प्रचि २८

प्रचि २९
वाडातर पूल

प्रचि ३०
वाडातर

प्रचि ३१
नेरूरपार

प्रचि ३२
नेरूरपार

प्रचि ३३
देवबाग समुद्रकिनारा

प्रचि ३४
(क्रमशः)

गुलमोहर: 

मस्त.
नेरुरपारचा पिवळ्या शेतांचा खूप आवडला.
काजूबोंडांचा फोटो पाहून तोंपासू. लहानपणी गारगोटीला आमच्या घराला काजूच्या झाडांचंच कंपाउंड होतं. तेव्हा लै खाल्लेत बोंडं आणि ओले काजू. Happy

फोटो अजून बघायचेच आहेत. पण सुरवातीपासून वाचायला लागल्यावर तुझं 'कोकणमय' काव्य वाचलं आणि लगेच प्रतिसाद देत आहे. अप्रतिम काव्य केलयंस! फारच मनापासून आल्यात त्या ओळी हे जाणवलं.

'जियो जिप्सी!' Happy

योगेश चित्रांपेक्षा तुझ्या कवितेतुन कोकण उतरलय.. फोटो पाहुन तिकडे जावुन आल्यासारख वाटल. मस्तच!! Happy

जिप्स्या, मला दोन फोटो अफलातून आवडले -
१) प्रचि ८ - मधील दोन्ही पोर्ट्रेट्स

२) प्रचि ३३
देवबाग समुद्रकिनारा - अफलातून कॉंपोझिशन, १/३ रुलचे परफेक्ट उदाहरण.

IMG_5932 copy[1].jpg

मस्तच !!!!!!!!!!!!!!!!! !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!साधनाच मनावर घेच आता Happy

प्रस्तावना आणि कविता आवडली...

कोकणचा विस्तृत नजारा कॅमेर्‍यात कैद करणे फार कठिण काम... पण तू ते लिलया पार पाडतो आहेस.

काढण्याचा बुडुबुड आवाज ऐकू येतोय... मस्त Happy

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy

आपली भेट कधी होइल काय माहित. >>>>>झकास नक्की भेटु रे Happy
अतुलजी १/३ रुलसाठी खास धन्यवाद Happy

छानच सगळे प्रचि. देशावरच्या माणसाच्या नजरेतून कोकण बघायला मिळाले.
माझे बर्‍याच वर्षात जाणे झालेले नाही.

कोकण म्हणजे लोकसंगीतातली लय, झालो मी पुरता "कोकणमय" >>> कोकण म्हणजे रंगित स्वप्न Happy

btw नात्या बद्दल लवकरच विचार कर... खरच शेवटची संधी सोडू नको Wink

खरच डोळ्यांचे समाधान झाले, पण मनाचे नाही.

प्रची ३ खर्च चिपळूण आठवले आजोळ
प्रची २४ आई ची मामाकडून निघताना न विसरता अबोलीची झाडे बिया घेण्याची लगबग आठवली
खरच शब्दात सांगता येत नाहीये सगळे काही Sad

"चैतन्य" हॉटेलने [ शेवटचा फोटू ] "अस्सल मालवणी जेवण" या विशेषणाचं स्वतःच्या नांवावर 'ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन' करून घेतलंय असं हॉटेलच्या मालकमंडळीतल्या कुणीतरी मला सांगितलं; "कोकणसय " व "कोकणमय" याचं तसंच "ट्रेड मार्क रजिस्ट्रेशन" अनुक्रमे शैलजा व जिप्सी या मायबोलीकरानी खरंच करून घ्यावं !! Wink

प्रचि ३४.......नेमका जेवणाच्या वेळी बघतोय...
आता जेवणाचा डब्बा काय बोड्ख्याची मजा देणार..
हा अन्याय आहे ...

जिप्सी, डोळ्यात पाणी आलं माझ्या.. (असं वाटेल यात रडण्यासारखं काय आहे..? :अओ:)
कोकण माझं दैवत आहे.. माझं स्वप्न आहे..
धन्यवाद, खुप अप्रतिम फोटो आहेत सगळेच.. Happy

कधी नव्हे ते मलाही असंच झालं >>>जिप्स्या जिप्स्या जिप्स्या लेका काय बोलु रे आता................ <<< लईच्च्च्च्च खास्स्स्स्स्स्स्स्स्स फोटो अन कविताही Happy

btw नात्या बद्दल लवकरच विचार कर... खरच शेवटची संधी सोडू नको >> अगदी.. मी घेऊ का काम हाती... Proud Lol

कोकणात जाउन कवितेचे ज्ञान अवगत होते हे जिप्सीने लिहीलेल्या कवितेतून समजते.. मस्तज फोटो.. पोट भरला असा म्हणूचा नाय.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत Happy Proud येवांदे

व्वाहवा!! ...सुंदर कोकणसफर!! जिप्स्या धन्स रे! Happy
हे नेरुरपार प्रकरण भलतच खास दिसतय! या सुट्टीत प्लॅन करायला हरकत नाही.

हि फक्त प्रस्तावना असल्याने जास्त लिहिले नाही. >>> म्हणजे मेजवाणी बाकी आहे आमची Wink

प्रचि तर लय भारी , कोलाजपण मस्तच , प्रचि ४,८,११,१२,१४,२२,३३ अफलातुनच Happy
२४ खासच Happy

Pages