१ वाटी भाजून सोललेले सोलापूरी शेंगदाणे
पाव वाटीपेक्षा थोडा जास्त सोललेला लसूण
मीठ
तिखट
चमचाभर शेंगदाण्याचे तेल.
भाजून सोललेले शेंगदाणे, तिखट, मीठ सर्व एकत्र करून उखळात चटणी कांडावी. उखळ नसेल तर खलबत्ता आणि खलबत्ता नसेल तर फूड प्रोसेसर वापरावा.
मी इथल्या १ measuring cup ला इथल्या ७-८ मोठ्या लसूण पाकळ्या घेते. लसणाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण जास्त लसूण घातला की खमंग चव येते. लसूण घातला की चटणी कोरडी होते म्हणून चमचाभर तेल घालायचं. आणि फूड प्रोसेसरला कणीक मळायच्या अॅटाचमेंटनं चटणी बारीक करायची. फार बारीक न करता ओबड-धोबड करायची. फूड प्रोसेसरमधे कणीक मळायच्या अॅटाचमेंटनं चटणी बारीक करताना थोडा वेळ लागतो पण उखळात कुटलेल्या चटणीचं टेक्शर आणि अगदी तशीच नसली तरी जवळपास जाणारी चव येते. मिक्सरमधे अगदी बारीक पूड होतो त्यामुळे मिक्सरमधे शक्यतो करू नये. ही चटणी टिकते भरपूर पण ताजी केलेलीच छान लागते.
सोलापूरच्या चटणीची खासियत तिथे मिळणारे शेंगदाणे आणि उखळात कांडल्यामुळे येणारी चव यात आहे. पुण्यात मिळणारे घुंगरू दाणे वापरले तर खमंग चव येत नाही. या चटणीत बाकी काही जिन्नस जसे जीरं वगैरे घालू नये. हीच चटणी वापरून, त्यात थोडं मेतकूट चालून, भरपूर लसणाची फोडणी दिली की खमंग शेंगदाण्याची आमटी तयार होते. भाकरी बरोबर मस्त लागते. किंवा चटणीत नुसतं दही किंवा तेल घालून भाकरीबरोबर छान लागते.
सोलापूरी दाणे आकाराने लांबट आणि रंगाने डार्क गुलाबी असतात.
घुंगरू दाणे साधारण असे दिसतात. रंग फिकट आणि गोलसर असतात
सहि.....
सहि.....
वाह!! मस्त होते ही चटणी. आमचे
वाह!! मस्त होते ही चटणी.
आमचे एक शेजारी कुटुंब सोलापुरजवळील तडवळ गावाचे होते. ते गावावरून आले की डबे भरभरून ही वायनात कांडलेली चटणी घेऊन यायचे. आमच्याकडे शेजारधर्मानुसार व मागणीनुसार चटणीचे पार्सल यायचेच!! मग खाऊ खाल्ल्यासारखी जाता-येता तोंडात टाकून ही चटणी बघता बघता संपायची!
गावावरून त्यांच्या घरी काम करणार्या गऊबाईंच्या हातच्या पातळ, खरपूस, पापुद्रा सुटलेल्या भल्या थोरल्या भाकर्या आणि ही चटणी आमच्या घरी आली की आम्हाला मेजवानीच असायची मस्त!
पौर्णिमा, दाण्यांच्या
पौर्णिमा,
दाण्यांच्या फरकामुळे तेल सुटत नाही. मी इथे करते तेव्हा अगदी चमचाभर तेल घालते. भारतात - उखळात कांडताना - तेलाची अजिबात गरज लागत नाही. इथेही तेल घातलं नाही तर फारसा फरक पडत नाही पण मला तसं टेक्शर आवडतं. दाण्याचं पिठलं, दाण्याची आमटीपण मस्त लागते.
अकु,
ज्वारीची भाकरी ही सोलापूर भागातली दुसरी खासियत :). महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातही सुरेख भाकरी करतात. एकदम पातळ, छान पापुद्रे सुटलेली भाकरी, भरली वांगी किंवा पिठलं, दाण्याची चटणी, मिरचीचा कुट्टा आणि घरचं घट्ट दही. माझा स्वर्ग ;).
अंजली , तू व्हर्जिनिया पीनटस
अंजली , तू व्हर्जिनिया पीनटस अमेरिकन स्टोर मधून आणतेस का on-line मागवतेस ? आणि दाण्याची आमटी कशी करतेस ?
पल्लवी, मी सॅम्स / बीजे'ज
पल्लवी,
मी सॅम्स / बीजे'ज मधून घेते. अमेरीकन ग्रोसरी स्टोअर मधेपण मिळतात. Dry roasted / unsalted घ्यायचे.
दाण्याची आमटी: २ चमचे दाण्याचं कूट किंवा चटणी, आवश्यकते नुसार तिखट, पाऊण चमचा मेतकूट, मीठ घालून पाणी घालून किती वाट्या आमटी हवी तेव्हढं पातळ करायचं. फोडणीत जीरे, मोहरी, हिंग, हळद, कडीपत्ता आणि लसूण घालायचा. वरून कालवलेलं मिश्रण घालायचं. व्यवस्थित उकळून घ्यायचं. एकदम झटपट प्रकार. गरम भात, आमटी, कैरीची चटणी असा बेत मस्त जमतो.
ओके....करून बघते ग ..थैंक्स
ओके....करून बघते ग ..थैंक्स !
पण आमटी मध्ये कोणती डाळ नाही मग खूप पातळ नाही होत का?
नाही होत. कारण मेतकूट आणि
नाही होत. कारण मेतकूट आणि दाण्याच्या कुटाचं मिश्रण असतं ना. सुरवातीला थोडं कमी पाणी घालून बघ, मग लागेल तसं वाढव.
दाण्याची आमटी माझी आई अशी
दाण्याची आमटी माझी आई अशी करते -
उपवासाची आमटी - दाण्याचे कूट किंवा दाणे + हि. मिरची चवीनुसार + मीठ + साखर आवडत असेल तर हे मिक्सर मधून बारीक वाटायचं. तुपाची जिरे घालून फोडणी करायची. मग हे वाटण घालून लागेल तसे पाणी घालून उकळी आणायची. लिंबूरस/कोकम आवडत असेल तर शेवटी घालून एक उकळी.
नेहमीची आमटी - दाण्याचे कूट किंवा दाणे + तिखट + मीठ + काळा मसाला + चिंच + गूळ वाटण करून घ्यायचे. नेहमीची मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता घालून फोडणी, आवडत असेल तर कांदा थोडा परतून घ्यावा. मग वाटण घालून लागेल तसे पाणी घालून उकळी आणायची. वरून खोबर्-कोथिंबीर.

मस्त लागतात या दोन्ही आमट्या.
धनश्री, चवदार वाटतेय कृती.
धनश्री, चवदार वाटतेय कृती. तुझ्या पद्धतीनं एकदा करून बघते.
छान पाककृती सोलापूरी चटणीला
छान पाककृती

सोलापूरी चटणीला मजा भट्टीत भाजलेल्या शेंगदाण्यांनी येते. ह्या वेळी आई आली होती तेव्हा तिने मायक्रोवेव्हमधे भाजले, जवळपास तशीच चव होती. हि चटणी करताना थोडं हिंग घालायचं हि तिची टिप
दाण्याची आमटी मस्त वाटतीये.
दाण्याची आमटी मस्त वाटतीये. (ही चटणी तर असतेच मस्त आमच्या गावाची) ..
आज केली होती चटणी. मस्त
आज केली होती चटणी. मस्त तोंपासु झाली. तिखटाला पांड्या मिर्च्या घेतल्या. बेताची तिखट झाली. लोखंडी खलबत्त्यात कांडली. जेवताना भाजीसारखी खाल्ली!
मीही केली काल. फुडप्रोसेसर
मीही केली काल. फुडप्रोसेसर मध्ये.
घुंघरू दाणेच होते घरी. त्यामुळे ती चव नाही आली. पण तरीही छान झाली.
धन्यवाद अंजली.
जमली! खलबत्त्यात कुटली ह्या
जमली!
खलबत्त्यात कुटली ह्या वेळी, त्यामुळे बेताचं तेलही सुटलं तिला. मिक्सरमध्ये अगदीच भरभरीत होते. खलबत्त्यात मस्त झाली, शिवाय ते टेक्श्चरही आलं. धन्यवाद
प्रमाण परफेक्ट आहे!
ह्म्म्म.. चटणी ज्वारीची
ह्म्म्म.. चटणी ज्वारीची भाकरी, पिठलं दही... मला भूक लागली.
माझ्या मामाची बार्शीला गिरण आहे. त्यामुळे ही चटणी आमच्याकडे तिकडून कुणी आलं की किलोभर घेऊन येतात. (आणि आम्ही ती लगेच संपवतो)
एक्दम मस्त. तोंपासु...
एक्दम मस्त. तोंपासु...:)
(No subject)
अंजली... एकदम कातिल फोटु....
अंजली... एकदम कातिल फोटु.... अत्ता चमचाभर तोंडात टाकावी वाटत्येय
एकदम कातिल फोटु.... अत्ता
एकदम कातिल फोटु.... अत्ता चमचाभर तोंडात टाकावी वाटत्येय >>> लाजो + १०० , सोलापुरी चटणी पाहिल्यावर वाटतं कॅलरीज गेल्या ....
माझी मामी ही चटणी अशीच करते.
माझी मामी ही चटणी अशीच करते. तिचेही माहेर सोलापूर कडले. धन्यवाद अंजली. हे दाणे किराणात नाही, पण एका स्नॅक्स सेंटर मध्ये मिळतात, तिथुनच आणते.
शेंगा,लसूण,कारळे,तीळ,अळशी
शेंगा,लसूण,कारळे,तीळ,अळशी यांच्या वेगळ्या चटण्या करतो आणि वेगळ्या वाढून घेतो हव्या तशा.
शेंगा चटणीमध्ये शेंगदाण्यांचा प्रकार आणि कुटून/ कांडून/वाटून/मिक्सरमधून केली यावर चव बदलते - सहमत.
Pages