१ वाटी भाजून सोललेले सोलापूरी शेंगदाणे
पाव वाटीपेक्षा थोडा जास्त सोललेला लसूण
मीठ
तिखट
चमचाभर शेंगदाण्याचे तेल.
भाजून सोललेले शेंगदाणे, तिखट, मीठ सर्व एकत्र करून उखळात चटणी कांडावी. उखळ नसेल तर खलबत्ता आणि खलबत्ता नसेल तर फूड प्रोसेसर वापरावा.
मी इथल्या १ measuring cup ला इथल्या ७-८ मोठ्या लसूण पाकळ्या घेते. लसणाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण जास्त लसूण घातला की खमंग चव येते. लसूण घातला की चटणी कोरडी होते म्हणून चमचाभर तेल घालायचं. आणि फूड प्रोसेसरला कणीक मळायच्या अॅटाचमेंटनं चटणी बारीक करायची. फार बारीक न करता ओबड-धोबड करायची. फूड प्रोसेसरमधे कणीक मळायच्या अॅटाचमेंटनं चटणी बारीक करताना थोडा वेळ लागतो पण उखळात कुटलेल्या चटणीचं टेक्शर आणि अगदी तशीच नसली तरी जवळपास जाणारी चव येते. मिक्सरमधे अगदी बारीक पूड होतो त्यामुळे मिक्सरमधे शक्यतो करू नये. ही चटणी टिकते भरपूर पण ताजी केलेलीच छान लागते.
सोलापूरच्या चटणीची खासियत तिथे मिळणारे शेंगदाणे आणि उखळात कांडल्यामुळे येणारी चव यात आहे. पुण्यात मिळणारे घुंगरू दाणे वापरले तर खमंग चव येत नाही. या चटणीत बाकी काही जिन्नस जसे जीरं वगैरे घालू नये. हीच चटणी वापरून, त्यात थोडं मेतकूट चालून, भरपूर लसणाची फोडणी दिली की खमंग शेंगदाण्याची आमटी तयार होते. भाकरी बरोबर मस्त लागते. किंवा चटणीत नुसतं दही किंवा तेल घालून भाकरीबरोबर छान लागते.
सोलापूरी दाणे आकाराने लांबट आणि रंगाने डार्क गुलाबी असतात.
घुंगरू दाणे साधारण असे दिसतात. रंग फिकट आणि गोलसर असतात
.
.
अर्रे वा. आली का ही रेसिपी.
अर्रे वा. आली का ही रेसिपी. अप्रतिम चटणी होते तुझ्या ह्या पद्धतीने अंजली. दर आठवड्याला करते मी ही चटणी
हा फोटू.
वरच्या चटणीत थेंबभरही तेल घातलं नाहीये. मस्त आपोआप तेल सुटत जातं.
मस्त! तोंपासु! तिखटाचं
मस्त! तोंपासु!
तिखटाचं पारंपारिक प्रमाण किती?
मस्त. (मी उखळात कांडलेली
मस्त.
(मी उखळात कांडलेली खाल्ली आहे. )
तिखटाचं पारंपारिक प्रमाण
तिखटाचं पारंपारिक प्रमाण किती>> बित्तु, आपल्याला सोसेल तेव्हढं ;). पण संकेश्वरी आणि ब्याडगी असं मिक्स तिखट असेल तर चवीबरोबरच रंगपण छान येतो.
छान, सोपी रेसिपी आहे .. मी
छान, सोपी रेसिपी आहे .. मी करून बघेन ..
पण इकडे जे दाणे मिळतात त्यांची चव कशी काय असते सोलापुरी आणि घुंगरू दाण्यांच्या तुलनेत?
इथे व्हर्जिनिया पीनटस म्हणून
इथे व्हर्जिनिया पीनटस म्हणून मिळतात बघ, त्याची छान होते ही चटणी.
धन्यवाद अंजली .. मी करून बघेन
धन्यवाद अंजली .. मी करून बघेन ..
धन्यवाद अंजली!
धन्यवाद अंजली!
अंजली , ही चटणी सोलापुरची
अंजली , ही चटणी सोलापुरची फेमस "नसले बंधु चटणी " सारखी होते का? क्रुती वरुन तसच वाटतय. नक्की करणार.
अरे वा. सोलापूरची शेंगा चटणी
अरे वा. सोलापूरची शेंगा चटणी - माझ्या गावची पेशाल्टी!! मला खूप आवडते. आणि मी अशीच करते.
घुंगरू दाण्याविषयी अनुमोदन.
घुंगरू दाण्याविषयी अनुमोदन. मला घुंगरू दाण्याने पित्ताचा देखिल त्रास होतो. सोलापुरी दाण्यांची चव वेगळी असते हे खरं.
पिहू, ही चटणी नसले
पिहू, ही चटणी नसले बंधूंपेक्षा छान होते ;). करून बघ :).
लय भारी ! मस्त टेस्ट असते
लय भारी ! मस्त टेस्ट असते ह्या चटणीला .
अंजली, मी यावेळेस ही चटणी
अंजली, मी यावेळेस ही चटणी रेडिमेड घेऊन आलेय. चांगली आहे ती ही चवीला.
मस्तच, करायला हवी आता..
मस्तच, करायला हवी आता..
धन्यवाद अंजली. नक्की करून
धन्यवाद अंजली. नक्की करून पाहीन.
वॉव.. तोंपासु बिल्वा..
वॉव.. तोंपासु
बिल्वा.. फोटोकरता इस्पेशल धन्स
मस्त. ही चटणी असली कि
मस्त. ही चटणी असली कि दुसर्या कुठल्या भाजीची गरज सुद्धा भासत नाही.
अरे वाह, मस्त.
अरे वाह, मस्त.
वा! नक्की करुन पहाणार.
वा! नक्की करुन पहाणार.
मस्त! शेंगदाण्याचे फोटोही
मस्त!
शेंगदाण्याचे फोटोही टाकलेस ते बरं झालं.
आता कोणीतरी आमच्या कुतुहलशमनासाठी अमेरीकेत मिळणार्या लसणींचाही फोटो टाका प्लिज! ते एक-दोन, सात-आठ लसणी इत्यादी प्रमाण वाचायला भारी गंमत वाटते.
वा वा तोपासु. सोलापुरला
वा वा तोपासु.
सोलापुरला गेलेले तेंव्हा जेवणात रोज असायची. घरीही खुप पॅकेट्स आणले होते मस्त.
एकदम चटकदार!!!! नक्की करणार
एकदम चटकदार!!!!
नक्की करणार
बिल्वा, फोटो पाहूनच भूक
बिल्वा, फोटो पाहूनच भूक लागली. धन्यवाद अंजली. नक्की करणार.:)
स्स!! तोंपासु अगदी. बिल्वा,
स्स!! तोंपासु अगदी. बिल्वा, टेम्प्टिंग फोटो!
मंजू , मी आमच्याकडच्या
मंजू , मी आमच्याकडच्या लसणीचा फोटो देतेय .
<< ते एक-दोन, सात-आठ लसणी इत्यादी प्रमाण वाचायला भारी गंमत वाटते.
बायदवे , अंजलीने ७ -८ लसणी नाही , ७ - ८ मोठ्या लसूण पाकळ्या लिहिल्यात .
ओहो संपदा! धन्यवाद. पण हा
ओहो संपदा! धन्यवाद.
पण हा आकार म्हणजे ठीक आहे... हल्ली इकडेही साधारण इतपतच मोठे कांदे मिळतात लसणींचे, पण तेवढे स्ट्राँग नसतात, त्यामुळे त्या पाकळ्याही बारक्या लसणींच्या प्रमाणात वापराव्या लागतात, म्हणजे निदान आमच्याकडे तरी
आम्ही लसणीला लसणीचा कांदा आणि पाकळ्यांना लसूण म्हणतो, तुमची काय हरकत आहे?
<< आम्ही लसणीला लसणीचा कांदा
<< आम्ही लसणीला लसणीचा कांदा आणि पाकळ्यांना लसूण म्हणतो, तुमची काय हरकत आहे
अजिबात काहीही हरकत नाही . मला वाटले तुझा काही गैरसमज झालाय , म्हणून जरा विस्ताराने लिहिलंय हो .
'घुंगरू' नाव काय गोड आहे हो,
'घुंगरू' नाव काय गोड आहे हो, असेच मिळतात इथे. मी केलेली चटणी नेहेमी कोरडीच होते पण असं तेल सुटत काही नाही तिला. हे दाण्यांच्या फरकामुळेच का? वरून तेल घालणं काही होत नाही आणि माझ्याच्यानं! एकदा धाडस करून बघायला हवे
Pages