सुभाषितांचा हा आठवा भाग वाचकांना आवडेल अशा भावनेने इथे सादर करतो आहे.
३८.
अपि स्वर्णमयी लंका न मे रोचति लक्ष्मण |
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ||
सोन्याची ही लंका परि मजसी न, लक्ष्मणा, मोहविते |
मातेजैसी जन्मभूमि ही स्वर्गाहुनि मोठी असते ||
३९.
दुर्जन: प्रियवादीति नैतद् विश्वासकारणम् |
मधुतिष्ठति जिव्हाग्रे हॄदये तु हलाहलम् ||
गोड बोलला तरिही दुर्जन विश्वासाला पात्र नसे |
जिभेवरी मध परी हलाहल अंत:करणामधी वसे ||
४०.
विकृतिं नैव गच्छन्ति संगदोषेण साधव: |
आवेष्टितं महासर्पैश्चंदनं न विषायते ||
दुष्टात राहिले तरिही दुष्ट होती न सज्जन |
सापानी वेढिले तरिही विष शोषी न चंदन ||
४१.
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् |
येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत् ||
माठ फोडुनी, वसन फाडुनी वा बसुनी गाढवावरी |
या ना त्या कारणातुनी नर प्रसिद्धिची लालसा धरी ||
४२.
परस्परविरोधे तु वयं पंचश्चते शतम् |
परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकं शतम् ||
परस्परांच्या विरोधामधे शंभर ते अन पाच आम्ही |
असू एकशेपाच परंतु तिसर्याशी लढण्यासमयी ||
४३.
अहो दुर्जनसंसर्गात् मानहानि: पदे पदे |
पावको लोहसंगेन मुद्गरैरभिताड्यते ||
दुर्जन संगतीमद्ध्ये मानहानी पदोपदी |
लोखंडासह अग्नीला घणाघाते प्रहारती ||
४४.
योजनानां सहस्त्रं तु शनैर्गच्छेत् पिपीलिका |
आगच्छन् वैनतेयोपि पदमेकं न गच्छति ||
निश्चये मंद मुंगीही हजारो मैल चालते |
अनिच्छ गरुडाच्याने एक पाऊल ना पडे ||
४५.
काकः कृष्णः पीकः कृष्णः कोभेदः पीककाकयो |
वसंतसमये प्राप्ते काकः काकः पीकः पीकः ||
कावळा काळा, कोकिळ काळा, काय फरक दोघात असे |
कावळा कोण अन् कोकिळ कोण हे ऋतु वसंत येताच दिसे ||
दुवे:
सुभाषिते १ ते ५ - http://www.maayboli.com/node/32066
सुभाषिते ६ ते ११ - http://www.maayboli.com/node/32119
सुभाषिते १२ ते १६ - http://www.maayboli.com/node/32218
सुभाषिते १७ ते २२ - http://www.maayboli.com/node/32230
सुभाषिते २३ ते २७ - http://www.maayboli.com/node/32376
सुभाषिते २८ ते ३२ - http://www.maayboli.com/node/32490
सुभाषिते ३३ ते ३७ - http://www.maayboli.com/node/32590
सुभाषिते ४६ ते ५१ - http://www.maayboli.com/node/32873
सुंदर सुभाषिते, साधा सोपा
सुंदर सुभाषिते, साधा सोपा अनुवाद मन प्रसन्न करतात.
सुंदर! सोप्या भाषेत
सुंदर! सोप्या भाषेत असल्यामुळे लगेच अर्थ कळतो.
धन्यवाद कर्णिकजी या भागातील
धन्यवाद कर्णिकजी
या भागातील बहुतेक सर्व सुभाषितं मी ९/१० वी ला असताना पाठ केली होती असं आठवतंय.
तेव्हा मार्कांसाठी पाठ केल्याने फारशी स्मरणात राहिली नाहीत. आता मनापासून पाठ करीन म्हणतो
आज पुन्हा एकदा ही वाचल्याने खूप बरं वाटलं.
<<स्वर्गाहुनि मोठी असते>>
<<स्वर्गाहुनि मोठी असते>> यापेक्षा "स्वर्गाहुनि श्रेष्ठ असते" असे कसे वाटते?
उत्तमच.
खूप छान उपक्रम आहे. हे अनुवाद
खूप छान उपक्रम आहे.
हे अनुवाद तुम्ही फारच छान केले आहेत.
धन्यवाद.
सुंदर सुभाषिते, साधा सोपा
सुंदर सुभाषिते, साधा सोपा अनुवाद मन प्रसन्न करतात.>>>> हे आता पर्यंतच्या सगळ्याच भागांना लागू होते.
सुंदर आहेत सुभाषितं.. आपण
सुंदर आहेत सुभाषितं.. आपण घेतलेल्या या कष्टांबद्दल आभार !
जीभेवरून आठवले. जीभेला होणारी
जीभेवरून आठवले.
जीभेला होणारी जखम सगळ्यात लवकर बरी होते;
अन जीभेमुळे होणारी जखम कधीच बरी होत नाही!
आपण 'संस्कृतमधील सुभाषिते मराठीत' माला पुर्ण करून पुस्तकरूपाने तयार करा.
वा छानच मराठी सुभाषितमाला...
वा छानच मराठी सुभाषितमाला...
हि सुभाषित माला माझ्या निवडक
हि सुभाषित माला माझ्या निवडक १० मध्ये