ऑकलंड शहरातच एका टेकडीवर ईडन गार्डन ही बाग निर्माण केली आहे. इथे आधी दगडाची खाण होती. ती बंद पडल्यावर एका खाजगी संस्थेमार्फत ईथे उद्यान विकसित केले गेले आहे.
तिकिटाच्या ऐवजी आपल्याला बागेचा नकाशाच मिळतो. तिथे ऋतूमानानुसार वेगवेगळी फुले फुलतात. सध्या लिटिल किसेस नावाची देखणी फुले आहेत (जानेवारी २०१२ ) तिथे ट्यूलिप्स पण भरभरुन फुलतात (साधारणपणे संप्टेंबर मधे)
बागात व्यवस्थित आखलेल्या वाटा आहेत. आपण त्या मार्गे डोंगरावर जाऊ शकतो. चढ जरा तीव्र आहे.
पण तशा सूचना तिथे आहेतच. (तब्येत ठिक आहे ना ? पायात बूट आहेत ना ? वगैरे. तिथे अनवाणी चालण्याची फॅशन आहे. मी पण तिथे तसाच भटकायचो,)
वाटेत अनेक ठिकाणी विश्रामाच्या जागा आहेत. त्यांची योजना एवढी चपखल जागी आहेकि तिथून हलावेसेच वाटत नाही. वरती पोहोचल्यावर शहराच्या एका भागाचे विहंगम दृष्य दिसते.
तिथे मला एक ८ फूट वाढलेला तेरडा दिसला. फुले आपल्या तेरड्यासारखीच होती.
त्यांचा राष्ट्रीय वृक्ष पोहोतुकावा, त्यालाच ते क्रिसमस फ्लॉवर असेही म्हणतात कारण त्या सुमारास त्याला लाल फुलांचा बहर येतो. त्या दिवसात सगळीकडे तोच दिसतो. सध्या अर्थातच त्याचा बहर ओसरलाय.
बागेतच एक छोटेसे हॉटेल आणि स्वच्छतागृह आहे. दोन्हीही उत्तम आहेत.
इथे मी मोजकेच फोटो देतोय, फेसबुकवर बरेच टाकलेत. अवश्य बघा
http://www.facebook.com/media/set/?set=a.10150593360983470.409713.703983...
5.
7.
8. पोहोतुकावा
12.
13.
14.
15.
16.
17.
18.
19.
21.
22.
23.
24.
25.
26.
27.
28.
29.
30.
31.
32.
33.
34. गेटच्या बाहेर डोके काढून टाटा करणारी हि फुले, परत कधी येणार,,, असेच विचारत होती.
मस्तच फोटो दिनेशदा! ४ वेळा
मस्तच फोटो दिनेशदा! ४ वेळा पाहिले तरि मनच भरत नाहिये.....
छान
छान
सुंदर! फोटो किती आवडले ते
सुंदर! फोटो किती आवडले ते सांगायला शब्दच नाहीत.........:)
माझा कॅमेरा पॅनासोनिक
माझा कॅमेरा पॅनासोनिक ल्यूमिक्स टी झेड ८ असा आहे. अगदी साधाच आहे.
मला वाटतं, तिथले प्रदूषणरहित हवामान आणि स्वच्छ सूर्यप्रकाश यांचा हातभार लागलाय.
यापेक्षाही अनोखी फुले पुढच्या अनेक भागात दिसणार आहेत. (रिक्षा !!!)
दिनेश सगळे फोटो खूपच सुंदर.
दिनेश सगळे फोटो खूपच सुंदर. ३ आणि ४ खूपच आवडले. इतक्या निगुतीने 'टॅटींग' करून फुले बनवणारा निसर्ग आणि ते टिपणारे तुमचे डोळे - दोन्ही ग्रेटच. फोटोवर जलखूणा टाका ना मला डाऊनलोड करून घ्यायचे आहेत ३ आणि ४![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अ प्र ति म!!!
अ प्र ति म!!! रिफ्रेशिंग!!
धन्यवाद दिनेशदा!!
क्या बात है!
क्या बात है!
माधव, या फोटोत माझी करतूद ती
माधव, या फोटोत माझी करतूद ती काय ? मी तो भारवाही हमाल.
मी कुठल्याच फोटोवर वॉटरमार्क टाकत नाही. मला संपर्कातून मेल पाठवली तर ते फोटो मूळ रुपात पाठवीन.
अप्रतिम फुलांचा खजीना!
अप्रतिम फुलांचा खजीना! धन्यवाद!!!
Pages