घरी कोणी नसणे व घरात दुध असणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. तर योगायोगाने हा योग आमच्या नशिबी आज चालू आला. मातोश्री लग्नकार्याकरिता म्हणून बाहेरगावी व आमच्या सौ. मुंबईत. तेव्हा किचन का राजा कोण
काय ही तरी करावे.. काही तरी करावे ही मनात दडपून ठेवलेली इच्छा आज पुर्ण होण्याचा पुर्ण 'राज'मार्ग मला दिसत होता.
मस्तपैकी एक गाणे चालू केले (Rihanna-Dont Stop The Music).
स्वंयपाक घरात प्रवेश केला व चहा ठेवण्यासाठी पातेले शोधण्याचा महान उद्योग चालू केला. पण योग्य त्या आकाराचे भांडे काही केल्या सापडले नाही म्हणून सरतेशेवटी ( ) ज्या मध्ये दुध होते तेच भांडे गॅसवर ठेवले.
मग त्या दुधाला गरम होऊ पर्यंत वाट पाहिली.
दुध म्हणजे पुर्ण धोकादायक पदार्थ. जेव्हा तो गॅसवर असतो व आपले लक्ष त्याच्याकडे असते तेव्हा तो उतू जात नाही पण अचानक आपले लक्ष विचलित झाले की भळाभळा तो गॅस कट्टावरून वाहू लागतो. त्यामुळे त्याच्यावर विषेश लक्ष ठेवावे. सांडशीने दुध हळू हळू गोल गोल फिरवावे म्हणजे उतू जात नाही.
एवढे सर्व केल्यावर आपल्या लक्ष्यात येतं की चहा पावडर असलेला डब्बा नक्की कोणता हे आपल्याला माहिती नाही आहे. घाबरून न जाता फक्त गॅस बंद करावा युद्धपातळीवर चहा पावडरचा शोध घ्यावा एकून ८ डब्बे उघडल्यावर तुम्हाला ९ व्या डब्बात नक्कीच चहा पावडर मिळेल. आता चहा पावडर हाती असल्यावर गॅस चालू करून, पहिली कृती परत करावी, दुध हलवण्याची.
त्यानंतर त्यात चहा पावडर अगदी आपल्याला हवी तेवढी टाकावी, कारण योग्य प्रमाण काय हे आपल्याला कधी कळतच नाही.
पुन्हा दुधाला उकळी येईल तेव्हा आपल्याला आठवेल की आपल्या जवळ आपण साखर देखील ठेवलेली नाही आहे, लगेच साखर शोधावी व लगेच परत यावे नाही तर असे घडते.....
चहा उतू जातो व आपला चहा गॅसचा कट्टा पितो. आता गॅसच्या कट्टावर चहा सांडला म्हणून लगेच साफसफाईला लागू नका, हळून गॅस शेगडी मागे सरकवा म्हणजे त्याच्या खाली सांडलेला चहा लपून राहील.
असा
त्यानंतर उरलेल्या चहाला पुन्हा उकळी आणावी व गरागरा फिरवत रहावे असे...
व थोड्यावेळात तयार होतो जगप्रसिद्ध अमृततुल्य राजे चहा.... हा असा !!
ज्यांना फोटो दिसत नाही आहेत त्यांनी गप्पगुमान घरी जाऊन घरच्या पीसीवरून फोटो पहावेत, उगाच फोटो दिसत नाहीत म्हणून प्रतिसाद ठोकू नयेत
धन्यवाद !!!
जय हिंद !!
(No subject)
चिमुरी धन्यु
चिमुरी धन्यु
(No subject)
चहा एकट्याने कधीच प्यायचा
चहा एकट्याने कधीच प्यायचा नसतो... म्हणून ओट्याला पाजला वाट्टं.
हा हा तसंच काहीतरी घडलं
हा हा तसंच काहीतरी घडलं दिनेशदा.
चहाची बासुंदी तर नाही ना झाली
चहाची बासुंदी तर नाही ना झाली ?
लय भारी..
लय भारी..
(No subject)
जागू तै, >चहाची बासुंदी तर
जागू तै,
>चहाची बासुंदी तर नाही ना झाली ?
नाय नाय... साखरेचा अंदाज माझा एकदम परफेक्ट आहे २-३ चमचा इकडे तिकडे
दिनेशदा, जागू.. राज तुम्ही
दिनेशदा, जागू..
राज तुम्ही धन्य आहात..
(No subject)
दुध म्हणजे पुर्ण धोकादायक
दुध म्हणजे पुर्ण धोकादायक पदार्थ. जेव्हा तो गॅसवर असतो व आपले लक्ष त्याच्याकडे असते तेव्हा तो उतू जात नाही पण अचानक आपले लक्ष विचलित झाले की भळाभळा तो गॅस कट्टावरून वाहू लागतो
>>>> दुध म्हणजे पुर्ण
>>>> दुध म्हणजे पुर्ण धोकादायक पदार्थ. जेव्हा तो गॅसवर असतो व आपले लक्ष त्याच्याकडे असते तेव्हा तो उतू जात नाही पण अचानक आपले लक्ष विचलित झाले की भळाभळा तो गॅस कट्टावरून वाहू लागतो <<<<
बाबारे, पण दूध परवडल.
बायको म्हणजे पण असाच धोकादायक पदार्थ. जेव्हा आपण बागेत/रस्त्यावर असतो व आपले लक्ष तिच्याकडे असते तेव्हा काही होत नाही, पण अचानक आपले लक्ष "तिच्यावरुन" विचलित झाले की भडाभडा तोन्डाचा पट्टा चालू होतो!
काय राव?? लोक च्या चे बी फोटु
काय राव?? लोक च्या चे बी फोटु टाकु लागले काय?
मी पण विचार करतोय विनोदी लेख लिहायचा. कारण मी पण घरी एकटाच आहे तीन दिवस. तर अंघोळीला पाणी कसे तापवले, तेव्हा तपेली कशी भेटली नाही मग पाणी कसे कढुन गॅसवर सांडले, मग ब्रेडला मस्का कसा लावला तेव्हाचे आणि त्या पाककृतीचे फोटु टाकेन म्हणतो.
>>>> तर अंघोळीला पाणी कसे
>>>> तर अंघोळीला पाणी कसे तापवले, तेव्हा तपेली कशी भेटली नाही मग पाणी <<<
तर तर? लिहा की राव! वाट कसली बघता!
फकस्त आन्घुलीपासून म्होरले तेवडेच लिवा बर्का! मागलं नको!
मागलं पण लिवलं असतं वो पन परत
मागलं पण लिवलं असतं वो पन परत पब्लिक गल्ला करील फोटो टाका म्हनुन.
आनी फोटो काढायला कुनीच न्हाय
आनी फोटो काढायला कुनीच न्हाय न्हवं घरात.
दुधाच्या पातेल्यात चहा? हरे
दुधाच्या पातेल्यात चहा? हरे रामा! त्याचा वास कसा जायचा?
नजिकच्या भविष्यकाळासाठी ऑल द बेस्ट!
(No subject)
मस्त प्रकार आहे. चहा करण्याचा
मस्त प्रकार आहे. चहा करण्याचा 'राज'मार्ग फारच विनोदी आहे बुवा!
बायकांचं पण सिगारेट ओढतांना असंच होत असेल काय?
-गा.पै.
राजदा सगळ किचन खराब करून
राजदा सगळ किचन खराब करून अमृततुल्य राजे चहा मस्त बनवला आहे. चहा खरच चांगला दिसतो आहे तर जागुदी च्या कांदा भजी बरोबर एकदम मस्त मैफिल जमून येईल.
आत्ता फक्त मुसळधार पडत्या पावसाची कमी आहे.
बाकी तुमच्या पुढच्या प्रयोगांना शुभेच्छा.....
फक्कड जमलाय अमृततुल्य! सगळं
फक्कड जमलाय अमृततुल्य! सगळं स्किल त्या गरगर फिरवण्यात आहे हे आज उमगलं.
साखरेचा अंदाज माझा एकदम परफेक्ट आहे २-३ चमचा इकडे तिकडे >>>