Submitted by पुरंदरे शशांक on 8 February, 2012 - 01:46
वाघाची मावशी......
वाघाची मावशी मनीमाऊ छान
सिप स्पिप करताच टवकारी कान
शांपूबिंपू काही नको, तरी किती स्वच्छ
चाटून चाटून स्वतःला ठेवते अगदी लख्ख
म्याँव म्याँव करत घोटाळते पायात
लाड करुन घेते मावशी ही अचाट
टॉमी समोर येताच गुरकते केवढी
केस फुलवून म्हणते मी तर तुझ्याएवढी.......
(संस्कारीत) वाघाची मावशी - दादाश्रींकडून
वाघाची मावशी मनीमाऊ छोटीशी
सिप सिप करताच उडी मारी इवलीशी
शांपूबिंपू काही नको तरी किती छान
चाटत बसते स्वतःला आवडेना घाण
म्याँव म्याँव करत घोटाळते पायात
लाड करुन घेते मावशी ही तोर्यात
टॉमी समोर येताच गुरकते केवढी
केस फुलवून म्हणते मी तर तुझ्याएवढी...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
टॉमी समोर येताच गुरकते
टॉमी समोर येताच गुरकते केवढी
मस्तच शशांकजी
केस फुलवून म्हणते मी तर तुझ्याएवढी....... >>
मस्तच.
मस्तच.
भारीच , मला आयती कविता मिळाली
भारीच , मला आयती कविता मिळाली पिल्लु साठी धन्यवाद !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काका माफी , मुलाला म्हणुन दाखवताना सुचलेले बदल (आवडलं तर नाहीतर दुर्लक्श करा)
वाघाची मावशी मनीमाऊ छोटुशी,
सिप स्पिप करताच उडी मारे इवलुशी,
शांपूबिंपू काही नको, तरी किती छान
चाटत बसेल स्वतः ला , आवडेना घाण,
म्याँव म्याँव करत घोटाळत येइ पायात
लाड करुन घेते म्हणे मावशी मी तोरयात,
टॉमी समोर येताच गुरकते केवढी
केस फुलवून म्हणते मी तर तुझ्याएवढी.......
(मला म्हणायला सोप जाव म्हणू़न , खरं आभारी तुमचा )
बहोत खूब दादाश्री! खूपच
बहोत खूब दादाश्री! खूपच चांगले बदल केलेत. मलाही आवडले.
मस्त आहे कविता , माझा मुलगा
मस्त आहे कविता , माझा मुलगा एक्दम खुश..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व जाणकार रसिकांचे मनापासून
सर्व जाणकार रसिकांचे मनापासून आभार............
पुरंदरे शशांक >>> काका आभारी
पुरंदरे शशांक >>> काका आभारी आहे , धन्यवाद !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व मार्जारप्रेमींसाठी.....
सर्व मार्जारप्रेमींसाठी.....
छान आहे.... छोटीशी आणि
छान आहे.... छोटीशी आणि ठेक्यात म्हणता येण्यासारखी
आत्ताच माझ्या मुलीने वरील
आत्ताच माझ्या मुलीने वरील दोन्ही कविता वाचून पाहिल्या. अर्थातच तिला खुप खुप आवडल्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)