त्याची दोन मुले
जणू एका फांदीवरची दोन फुले
एक गर्द रंगाचे
तर दुसरे थोडे फीकेवाले
*
मुळांवर ’तिच्याकडून’ जे थेंब पडले
ते फांदीने फुलांना चोख धाडले
पण तिच्या माघारी
आईविना फुलांचे चेहरे सुकले
*
फांदीने काही न केले कमी
जे होते ते सर्व फुलांना दिले
कटु-गोड प्रसंगांत
त्यांना टवटवीत ठेवले
*
नोकरी, धंदा, कामानिमित्त,
मुलांची जागा दुरावली
एक इकडे, एक तिकडे
दूरदेशी स्थिरावली
*
फांदी विस्कटली
जणू मधूनच फासटली
जखम ’तिच्या’ वियोगाची
पुन्हा एकदा खरचटली
*
कितीतरी दिवसांनी
दुसरे फूल भेटीला आले
फांदी, फुलांची भेट झाली
फासटलेली फांदी पुन्हा सांधली
*
आता फांदीला जाणवल्या
भूमिका तिघांच्या बदललेल्या
जीवनरसाच्या धमन्या फुलांच्या
आता फांदीच्या दिशेने वळलेल्या
*
दोन्ही फुलांना आनंद मिळाला
फांदीवर पाहून नवा तजेला
रोप, फुले पुन्हा टवटवली
येणारी चिमणी आधीच चिवचिवली
*
तो आता पूर्ववत झालेला
जणू दोन्ही मुलांच्या सहवासाचे व्हिटॆमिन प्यालेला
काही हरकत नाही आता
काही काळ एकाला निरोप देण्याला
***
दोन फुले
Submitted by pradyumnasantu on 6 February, 2012 - 18:15
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
पहिल्यांदाच असं झालं की तुमची
पहिल्यांदाच असं झालं की तुमची कविता पुन्हा पुन्हा वाचावी लागली.ही फक्त कविता नाहिय अजुन काहितरी आहे.....छान आहे.शुभ प्रभात.
फालकोरजी: शुभ प्रभात. आपण
फालकोरजी: शुभ प्रभात. आपण ग्रेट आहात.
सुंदर
सुंदर
काहितरी खास आहे या
काहितरी खास आहे या कवितेत,समजतय थोडं थोडं.
साळसुदः आपला अभिप्राय मिळाला.
साळसुदः आपला अभिप्राय मिळाला. भरुन पावलो. कृपया असाच लोभ ठेवावा ही विनंती.
रसिकराज विभाग्रजांना नाही
रसिकराज विभाग्रजांना नाही समजणार तर आणि कोणाला? आभार.
लॉस्ट अँड फाउंड फॉर्म्युला
लॉस्ट अँड फाउंड फॉर्म्युला आहे
एक कोमलहृदयी पिता व दोन मुले
एक कोमलहृदयी पिता व दोन मुले असे ते कुटुंब. पित्याने अत्यंत प्रेमभराने आपल्या पत्नीच्या माघारी मुलांना वाढविले आहे. मी या कुटुंबाला एका फांदीवरील दोन फुलांची उपमा दिली आहे. दोन्ही मुले फार चांगली पण भिन्न स्वभावी. एक थोडासा सौम्य तर दुसरा थोडासा बोलका, अॅग्रेसिव्ह, म्हणून एक फूल गर्द तर दुसरे फीकट. पित्याने पत्नीच्या इच्छेनुसार मुलांचे संगोपन चोख केलेले. मुलांना अडीअडचणीत नेहमीच सावरलेले. आपला सारा जीवनरस या फांदीने दोन्ही फुलांना समानच वाटलेला.
मोठी झाली तशी मुले चौरस विचार करू लागली. कामानिमित्त एका मुलाला दूरदेशी स्थायिक होणे भाग पडले. एकत्र रहाण्याची सवय असलेले कुटुंब विस्कटले. फांदी मधून फासटली. एक फूल इथे तर दुसरे तिथे. पित्याला पत्नीची पुन्हापुन्हा आठवण येऊ लागली.
काही दिवसांनी दूर गेलेला मुलगा भाउ, वहिनी व वडलांना भेटायला आला. कुटुंबात पुन्हा आनंद संचारला. विलगलेली फांदी पुन्हा सांधली. दोन्ही फुले एकत्र आली. हास्यविनोद झाले. पित्याला आता लक्षात आले की आता मुलाच्या आपल्याकडून काही अपेक्षा नाहीत. उलट तीच आता आपल्या प्रेमळ पित्याचा सांभाळ करण्यास सक्षम व इच्छुक झाली आहेत. फुलांच्या धमन्या आता फांदीलाच जीवनरस देण्यासाठी उलट्या दिशेला वळल्या आहेत्.या विचाराने फांदी पुन्हा टवटवीत झाली. फुलेही अधिक बहरली. त्यातच दूर गेलेल्या मुलाने ती गोड बातमी सांगितली. नात्/नातू येण्याच्या बातमीने पिता-आजोबा मोहरून गेले. येणारी चिमणी आधीच चिवचिवली.
आता मात्र पिता मुलगा दूर परत जाणार या सत्याला सामोरा जातो. त्याच्या कोमल मनाला दुनियेची रीत समजून घ्यायला मुलांनीच बळ दिले आहे. मुलाला निरोप देण्यासाठी तो आता आनंदाने एअरपोर्ट अथवा स्टेशनवर जाईल. फांदी फासटली तरी रोप नवनवी फुले धरत टवटवीत राहील.
सत्यजीतः मनमोहन देसाईंच्या
सत्यजीतः मनमोहन देसाईंच्या मॅटिनीजचा ओव्हरडोस झालाय की काय
फारच सुन्दर कविता आणि त्यातील
फारच सुन्दर कविता आणि त्यातील आशय.
आपण देलेल्या प्रतिसादातुन कवितेचा आशय आणखी स्पष्ट होतो.
छान.
धन्यवाद pbs
धन्यवाद pbs
आशयघन
आशयघन कविता.............सुंदर.......
लॉस्ट अँड फाउंड फॉर्म्युला .
लॉस्ट अँड फाउंड फॉर्म्युला . हम्म्म