Submitted by manisha bangar ... on 6 February, 2012 - 04:56
बेताल वागण्याने मी हैराण झाले
मवाळ शब्दच ओठातून गहाण झाले
कशी राहू वचनबद्ध तुझ्याशी आत्ता
पुरते वागणेच तुझे बेईमान झाले
सोंग -ढोंग का करतोस सुसंस्कृत पनाचे
कळेना तुझ्यावर मन कसे कुर्बान झाले
जनाची भिस्त जराशी असू दे मनाला
असे सांगणेच जणू पोथ्या पुराण झाले
राहिले उराशी मी सावली बनून तुझी
कशी मी तुझ्या पायातली वहाण झाले
- मनिषा बांगर -बेळगे
६ /२ /२०१२
दुबई
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान.............
छान............. आवडली.........
वृत्तासाठी काही बदल करणे
वृत्तासाठी काही बदल करणे अनिवार्य !!
आशय विषय ; काफियेदेखील उत्तम .............
खयाल छान.
खयाल छान.
THANKU
THANKU
चांगला प्रयत्न.... हेही
चांगला प्रयत्न....
हेही वाचा... http://www.maayboli.com/node/21889