Submitted by pradyumnasantu on 2 February, 2012 - 11:38
सज्जनांचा रक्षक, तू सुखस्मृती
दुर्जनांस सदैव रे तुझी भिती
सर्वांना प्रिय असे तुझीच आरती
तुझ्या दर्शनाने हो इच्छापूर्ती
तुझ्या दर्शनाने हो इच्छापूर्ती, दु:ख दूर माझेही करा गणपती
शेंदुराची ऊटी सर्वांगावरती
देते तुझ्या सामर्थ्याची प्रचिती
मोत्यांची कंठमाळ दावी श्रीमंती
तुझ्या दर्शनाने हो इच्छापूर्ती
तुझ्या दर्शनाने हो इच्छापूर्ती. दु:ख दूर माझेही करा गणपती
रत्नकांत! माता तुझी पार्वती
केशरी कुंकुम, तशी सजली ऊटी
घुंगरू दुर्जनांस धडकी भरविती
तुझ्या दर्शनाने हो इच्छापूर्ती
तुझ्या दर्शनाने हो इच्छापूर्ती, दु:ख दूर माझेही करा गणपती
लंबोदर तू का, हे गणपती
अमुचे अपराध तू घालशी पोटी
प्रेमांकीत नेत्रे गरीबांवर प्रीती
तुझ्या दर्शनाने हो इच्छापूर्ती
तुझ्या दर्शनाने हो इच्छापूर्ती, दु:ख दूर माझेही करा गणपती
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंगलमुर्ती मोरया. तिस-या
मंगलमुर्ती मोरया.
तिस-या नेत्राने गरीबांवर प्रीती>>>>प्रेमांकित नेत्राने गरिबांवर प्रीती.....बघा कसे वाटते..तिसरा नेत्र म्हटला की भगवान शिवशंकर डोळ्यासमोर येतात.
विभाग्रज उत्तम सूचना. तात्काळ
विभाग्रज उत्तम सूचना. तात्काळ अंमलात आणली आहे. आभार.
आरती मस्त जमलीय,चाल लावली
आरती मस्त जमलीय,चाल लावली पाहीजे.(गणपतीत गावी वाडितली सर्व मुलं आणि चाकरमानी वाडीत सर्वांच्या घरी आरतीसाठी जातो तेथे पारंपारिक आरत्यांसोबत अशा नविन आरत्यांचही आवडीने स्वागत केलं जातं)
छानै..... अशा रचना स्वतःलाच
छानै..... अशा रचना स्वतःलाच आनंद देणार्या असतात त्याचे तोलमोल होऊ शकत नाही...
बाप्पा आपली प्रतिभा वृधींगत करो!!! पु.ले.शु!
फालकोरजी: आभार. आरती मस्त
फालकोरजी:
आभार.
आरती मस्त जमलीय,चाल लावली पाहीजे.(गणपतीत गावी वाडितली सर्व मुलं आणि चाकरमानी वाडीत सर्वांच्या घरी आरतीसाठी जातो तेथे पारंपारिक आरत्यांसोबत अशा नविन आरत्यांचही आवडीने स्वागत केलं जातं)>>>>>>
असे घडले तर आनंदच वाटेल.
शामजी: अशा रचना स्वतःलाच आनंद
शामजी:
अशा रचना स्वतःलाच आनंद देणार्या असतात त्याचे तोलमोल होऊ शकत नाही...>>>>>
सत्य आहे. ही रचना रचताना खरोखरच मनाला आनंद वाटत होता.
बाप्पा आपली प्रतिभा वृधींगत करो!!! पु.ले.शु!
निर्मळ आशिर्वादाबद्दल मनापासून आभार
गणपतीची आरती/गीत चांगलं
गणपतीची आरती/गीत चांगलं जमलंय.
---------------------------------------------------------------------------
लयीसाठी कदाचित थोडे बदल आवश्यक भासतात.
छान भक्तिपूर्ण आरती.
छान भक्तिपूर्ण आरती. उल्हासरावांना अनुमोदन.
(विभाग्रज, प्रद्युम्न,
अवांतर : रामदासांच्या मूळ आरतीतही असे शब्द आहेत.
-' सरळ सोंड, वक्रतुंड, त्रिनयना , दास रामाचा वाट पाहे सदना .......')
छान ..आवडली..
छान ..आवडली..
आरती छान जमली आहे. आरती
आरती छान जमली आहे.
आरती सन्ग्रहात जमा करण्यायोग्य आहे.
उल्हासजी, एम. कर्णिक हार्दीक
उल्हासजी, एम. कर्णिक हार्दीक आभार. बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण काही सुचविल्यास आभारी होईन.
दीपकजी, pbs: आपण केलेल्या
दीपकजी, pbs:
आपण केलेल्या कौतुकाने आनंद मिळतो. ऋणी आहे.
नादमय सुंदर खरोखर चाल लावली
नादमय सुंदर खरोखर चाल लावली तर आरती संग्रहात जमा होईल
छन आरती. निवडक दहात. चाल नकीच
छन आरती. निवडक दहात. चाल नकीच लावीन. गणपती उत्सवात म्हणायला नवीन आरती छान आहे.
छान आरती. निवडक दहात. चाल
छान आरती. निवडक दहात. चाल नकीच लावीन. गणपती उत्सवात म्हणायला नवीन आरती छान आहे.
छानआहे.तेतिसर्या नेत्राचे
छानआहे.तेतिसर्या नेत्राचे मलापन जाणवले होते.मलातर वाटते जसे माबोगीत बनविलेआहे तशीही आरती पण बनवावी. खूप लोक संग्रही ठेवतील.
गुरुवार १० फेब्रुवारी संकष्टी
गुरुवार १० फेब्रुवारी संकष्टी