तो : हल्ली कोणाच्या जवळ जायचं म्हटलं कि भीती वाटते...
मित्र : हं.....
तो : खूप त्रास होतो यार..... आपण आपल्या परीनं नातं टिकवायचा प्रयत्न जेवढा करतो ना तेवढा नाही प्रतिसाद मिळत.... मग तुटत जायला होतं आतून....
मित्र : हं.....
तो : किती कोरडे reply देतोयेस .... काय करू विचारल्याशिवाय बोलणार नाहीस ना.....? सांग ना काय करू....?
मित्र : (दीर्घ श्वास घेऊन..) ..........इथूनच सुरुवात होते त्रास व्हायला... हे बघ... तू मला सांगत होतास... प्रतिसादाची अपेक्षा ठेवून... मी तो दिला नाही.. त्रास झालाच ना...? बऱ्याचदा असंच होतं बघ.... नातं टिकवणं म्हणजे अपेक्षा करणं नव्हे... तर ती पूर्ण करणं.. नातं, बीतं हे सगळं व्यवहाराचच दुसरं रूप आहे बघ.. ज्याला हा व्यवहार जमला ना त्याला सुखी माणसाचा सदरा सापडला म्हणायचं....
तो : अच्छा म्हणजे तू आता नात्यांमध्ये व्यवहार आणायला बघतो आहेस....?
मित्र : १००%
तो : मला नाहीये हे पटत...
मित्र : स्वाभाविक आहे... त्यात तुझा नाही दोष...
तो : मग पटव ना...
मित्र : अच्छा म्हणजे तुझी पटवून घ्यायची इच्छा आहे म्हणायची.....
तो : बोल तरी.....
मित्र : हे बघ सगळ्यात आधी "व्यवहार हा फ़क़्त पैशाचा" हा विचार मनातून काढून टाक... "व्यवहार म्हणजे देवाण घेवाण" मग ती कशाचीही असू शकेल.... भिंतींशी कुणी मैत्री करत नाही.... कारण त्या काही देऊ शकत नाही... मुळात "नि:स्वार्थी नातं" ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही..
तो : काहीतरीच...
मित्र : पटवू....?
तो : go ahead ...
मित्र : thanks .... आत्ताच बघ... तू माझ्याशी बोलात होतास... मी ढिम्म ऐकून घेतलं तू चिडलास... तुझं मी ऐकून घ्यावं असं तुला वाटणं हाच झाला स्वार्थ.. आई मुलाच्या नात्यातही बघ... "माझा मुलगा संस्कारित व्हावा" ह्यामागेही माझे संस्कार वाया जाऊ नयेत हा झाला स्वार्थ.. एखाद्याला आपण फोन करतो तेंव्हा त्यानं तो उचलावा हा झाला स्वार्थ.. अगदी साध्या साध्या गोष्टीतही कुठेतरी कोपर्यात स्वार्थ दडलेला असतोच फ़क़्त तो मान्य करण्याचा प्रांजळपणा आपल्यात नसतो... आणि त्याचं प्रमाण जेवढं जास्त तेवढा त्रास जास्त.. कारण स्वार्थ आणि अपेक्षा ही जुळी भावंडं आहेत... ती नाही वेगळी करता येत...आणि फरकही नाही ओळखता येत.. त्यामुळं जेवढ्या अपेक्षा कमी ठेवू तेवढा त्रास कमी होईल...
तो : अच्छा म्हणजे फारसं कोणाच्या जवळही जाऊ नये....?
मित्र : इतकंही जवळ जाऊ नये... कि त्याचा आपल्याला त्रास होईल.... तुला ट्रेकिंग ला जायला आवडतं...?
तो : खूप......
मित्र : मग जेंव्हा तू एकदम शेवटच्या टोकावर जातोस तेंव्हा नेमकं काय वाटतं..?
तो : भारी वाटतं... वादळांनासुद्धा आव्हान द्यावंसं वाटतं... खूप उंच झाल्यासारखं वाटतं.... मोठ्ठ्यान ओरडावस वाटतं.... स्वत:चं भान विसरायला होतं...
मित्र : आणि जर कुणी सांगितलं कि आता वरच रहा तर....
तो : ...........
मित्र : सुरुवातीला काही काळ बरं वाटेल.. पण काही वेळानं त्याच वार्याचा त्रास वाटू लागेल... घश्याला कोरड पडेल... वाटेल आता बास खाली जावूयात.... भारी वाटतं म्हणून कोणी काही शिखरावर मुक्काम नाही करत.... नात्यांचं तरी काय वेगळय...? एकदा का कोणत्या नात्याचा परमोच्चबिंदू गाठला ना.... कि काही वेळानं त्याचाच त्रास सुरु होतो. अपेक्षांच्या वादळांना तोंड देता देता नाकी नऊ येतात, त्याच अपेक्षांच्या आतल्या स्वत:चं नव्यानं दर्शन होतं आणि त्याचं भान वाढीस लागतं आणि जेवढं उंच जाऊ तेवढ्याच वरून धाडकन पडण्याचीही भीती असतेच... आणि सगळ्यात महात्वाचं म्हणजे नंतर जीभेचं गार्हाणं दातांना नाही सांगता येत आणि लपवूनही नाही ठेवता येत मग कितीही रडा किंवा ओरडा.. परिणाम एकंच "जळणाऱ्या रात्री आणि विझलेली स्वप्नं" ..... किती जरी नाही म्हटलं तरी हे असं होतंच आणि मग लागतात परतीचे वेध... आणि सुरु होते खरी कुत्तरओढ... धड सोडता येत नाही आणि पकडूनही नाही ठेवता येत...
तो : मग कोणाच्याच जवळ जाऊ नये....? तोडून टाकावीत सारी नाती.....?
मित्र : नाही रे राजा... माझ्यामते.... कुठले बिंदू वगैरे गाठण्यापेक्षा.... आरामाचीच जागा शोधावी... जिथून उठूच वाटू नये... जगाच्या साऱ्या चिंतेची उकल तिथे करता येईल.... आणि परत परत जाताही येईल.."विनासायास"... आणि अशा ठिकाणी स्पर्धां नसतेच, जिंकणा हरणंही नसतं... असत ते फ़क़्त..... "समाधान"
तो : फार गोंधळ झालाय... बघ तूच म्हणतोस कि "नातं टिकवणं म्हणजे अपेक्षा करणं नव्हे... तर ती पूर्ण करणं".... म्हणजे आपण दुसर्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या.... पण आपल्या अपेक्षांचं काय...?
मित्र : आरामाची जागा ही त्यासाठीच रे.... तिथं कुठलंच टोक नसतं.. तिथ असतो सुवर्णमध्य.. आणि मी म्हणालो अपेक्षा कमी ठेवायच्या... ठेवायच्याच नाहीत असं नाही.... आणि ह्या अश्या ठिकाणी गेल्यावरच आपण त्यांच्या priorities ठरवू शकतो.... बघ जमलं तर.... एकदाच.... आणि अनुभव कसं वाटतंय ते.......
मित्र
Submitted by चेतन.. on 20 January, 2012 - 10:25
गुलमोहर:
शेअर करा
आवड्ली कथा . पण खर सांगायचे
आवड्ली कथा . पण खर सांगायचे तर समाधानकारक उत्तर नाही मिळाले.
मस्त आहे पण नो समाधान काही
मस्त आहे पण नो समाधान
काही तरी आजुन पाहीजे
आपल्या अपेक्षांचीही अपेक्षा न
आपल्या अपेक्षांचीही अपेक्षा न करणं यातच समाधान मानावं.
फक्त आपलं कर्तव्य आपली जबाबदारी पार पाडत रहावी..... पालकांनी मुलांकडून, मित्राने मित्राकडुन, नवर्याने बायको कडुन, माणसा ने माणसाकडुन 'अपेक्षा' ठेवु नये.
मुळात 'फळाची' अपेक्षा ठवणे हेच जगातील दु:खांचे कारण असावे.
मुळात "नि:स्वार्थी नातं" ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही..>>> हे तितकेसे तथ्य वाटत नाही......
वृक्ष,पाणी, हवा,सुर्य हे क्षणाक्षणाला जिवनशक्ति प्रदान करत राहतात.
यांना आपण काय देत असतो..???
छान लिहिलय. पण अपुरं
छान लिहिलय. पण अपुरं वाटतं.....
मी अपुरं म्हणतोय, अपूर्ण नाही
चांगल लिहीले आहे ललित (कथा
चांगल लिहीले आहे ललित
(कथा वाटली नाही )
एका जुन्या गाण्याच्या २ ओळी
एका जुन्या गाण्याच्या २ ओळी आठवल्या...
वो अफसाना जिसे अंजामतक ले जाना न हो मुन्कीन.. उसे इक खुबसुरत मोड देकार छोडना अच्छा...
अंजली, प्रितीभुषण, चातक,
अंजली, प्रितीभुषण, चातक, बागुलबुवा, अनघा_मीरा, अभि.... अभिप्रायांबद्दल खूप आभार... खरं तर हे ललित मध्येच पोस्ट करायचं होतं... नंतर तिथेच करेन..
मुळात "नि:स्वार्थी नातं" ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही..>>> हे तितकेसे तथ्य वाटत नाही......
वृक्ष,पाणी, हवा,सुर्य हे क्षणाक्षणाला जिवनशक्ति प्रदान करत राहतात....>>>
प्रत्येक विधानाला अपवाद असतातच ना....?
मुळात मलाही काही प्रश्नांची उत्तरे नाहीत मिळाली.. जशी मिळतील तशी पोस्ट करेन.....
तसा पहिलाच प्रयत्न होता... आणि पुढच्या वेळेस अपुरं न वाटू देण्याचा प्रयत्न करेन........