Submitted by pradyumnasantu on 19 January, 2012 - 21:21
केवळ विनोद क्र.४, रावण कसा मेला-एक बिनडोक कविता
मी रावणाचे डोके नम्बर नऊ
मला आहेत जोडीला
आणखी नऊ जुळे भाऊ
मी थोडे मद्य प्यालो काल रात्री आधी जेवणाच्या
चिडुन मग बोलली मंदोदरी अरे कारे ए शिंच्या
ती गेली लगावण्याला जोरामध्ये माझ्या कानशिली
मी थोडा सरकलो मागे अन ती नंबर आठला बसली
आम्ही दोघे आठ, अन नऊ होउनी गेलो निकामी
*
सहा अन सात नंबरची सर्दी-पडशाशी टक्कर
दोन ते पाच यांची मधुमेहाने वाढली साखर
रावण जो झोपला नवीन आणलेल्या पलंगावरी
रूंदी पडली कमी अन शीरे लोंबकळली बाहेर
एक नि दहाच्या मानेमधी उसण भरुन गेली
अशा रितीने दहाही डोकी निरुपयोगी झाली
*
दहाही डोकी निकामी हे मोठे संकट खरोखर
उद्याचे युद्ध तर होते ठरलेले रामाबरोबर
अखेरीस चिंतातुर रावण उभा युद्धाला ठाकला
दहा डोकीवाला असून बिचारा बिन-डोक लढला
परिणाम: मेला !!!!!!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
भारी आहे. एकदम 'दस नंबरी'
मामी, मनःपूर्वक आभार
मामी, मनःपूर्वक आभार
हे हे कैच्यकै ... पण
हे हे कैच्यकै
... पण स्ट्योरी भारिये 
मस्त आहे
मस्त आहे
आणि आपल्याला मिळाले
आणि आपल्याला मिळाले आहेत......''दहा'' गुण.
खरोखरच काहीच्या काही कविता
खरोखरच काहीच्या काही कविता आहे !
एकदम मजेशीर कविता आहे. आवडली
एकदम मजेशीर कविता आहे.
आवडली
बिन डोक्याने वाचली असे
बिन डोक्याने वाचली असे लिहिणार होतो पण परिणामाला घाबरलो................(आवडली).
डॉ.साहेबांचा प्रतिसाद भन्नाट.
बिन डोक्याने वाचली असे
बिन डोक्याने वाचली असे लिहिणार होतो पण परिणामाला घाबरलो................ >>
कैच्याकै.. कैच्याकै..
कैच्याकै.. कैच्याकै.. कैच्याकै.. कविता...
जी १० पैकी १० गुण मिळवून गेली जाता..जाता..
(No subject)
खुप मजा आली.डॉक आणि विभाग्रज
खुप मजा आली.डॉक आणि विभाग्रज यांचे प्रतिसाद पण लय भारी.
मज्जा आली वाचताना. :D
मज्जा आली वाचताना.

अखेरीस चिंतातुर रावण उभा
अखेरीस चिंतातुर रावण उभा युद्धाला ठाकला
दहा डोकीवाला असून बिचारा बिन-डोक लढला
परिणाम: मेला !!!!!!
हे जबरीच आहे.
ट्रुली कैच्याकै
ट्रुली कैच्याकै !!
डॉक्टरांन्ना अनुमोदन ...दहा पैकी दहा गुण
व्वा. खरोखर जबरी कविता. एक
व्वा. खरोखर जबरी कविता.
एक भाबडा प्रश्न - रावणाने मरताना 'हे राम' कुठल्या तोंडाने म्हटलं होतं ?
दुसरा तिर्यक प्रश्न - Ra One कसा (मरून) पडला त्याचाही किस्सा आहे काहो तुमच्याकडे प्रद्युम्न ?
हे हे हे हे हे हे हे हे मस्त
हे हे हे हे
हे हे हे हे
मस्त
प्रतिसादकर्त्यांचे हार्दिक
प्रतिसादकर्त्यांचे हार्दिक आभार.
डॉ. कैलाशजी, विभाग्रजजी, एम. कर्णिकजी: प्रतिसाद फर्स्टक्लास !!!!!
ते ... तीन आणि चारच काय
ते ... तीन आणि चारच काय झालंते कळलं नाही.
मी मिसल् का काही ?
आहो डोक क्रमांक ....
आहो डोक क्रमांक ....
मजे'शीर'
मजे'शीर'
स्वाती, दोन ते पाचमधे तीन आणि
स्वाती, दोन ते पाचमधे तीन आणि चार येऊन गेले न. ब्लड शुगर बरीच हाय झाली होती हो. अहो डोक्यापर्यंत साखर पोचल्यावर दुसरं काय डोंबल होणार त्यांचं?
(No subject)