केवळ विनोद क्र.४, रावण कसा मेला-एक बिनडोक कविता

Submitted by pradyumnasantu on 19 January, 2012 - 21:21

केवळ विनोद क्र.४, रावण कसा मेला-एक बिनडोक कविता

मी रावणाचे डोके नम्बर नऊ
मला आहेत जोडीला
आणखी नऊ जुळे भाऊ
मी थोडे मद्य प्यालो काल रात्री आधी जेवणाच्या
चिडुन मग बोलली मंदोदरी अरे कारे ए शिंच्या
ती गेली लगावण्याला जोरामध्ये माझ्या कानशिली
मी थोडा सरकलो मागे अन ती नंबर आठला बसली
आम्ही दोघे आठ, अन नऊ होउनी गेलो निकामी
*
सहा अन सात नंबरची सर्दी-पडशाशी टक्कर
दोन ते पाच यांची मधुमेहाने वाढली साखर
रावण जो झोपला नवीन आणलेल्या पलंगावरी
रूंदी पडली कमी अन शीरे लोंबकळली बाहेर
एक नि दहाच्या मानेमधी उसण भरुन गेली
अशा रितीने दहाही डोकी निरुपयोगी झाली
*
दहाही डोकी निकामी हे मोठे संकट खरोखर
उद्याचे युद्ध तर होते ठरलेले रामाबरोबर
अखेरीस चिंतातुर रावण उभा युद्धाला ठाकला
दहा डोकीवाला असून बिचारा बिन-डोक लढला
परिणाम: मेला !!!!!!

शब्दखुणा: 

बिन डोक्याने वाचली असे लिहिणार होतो पण परिणामाला घाबरलो................(आवडली).
डॉ.साहेबांचा प्रतिसाद भन्नाट.

कैच्याकै.. कैच्याकै.. कैच्याकै.. कविता...
जी १० पैकी १० गुण मिळवून गेली जाता..जाता.. Lol

Lol

अखेरीस चिंतातुर रावण उभा युद्धाला ठाकला
दहा डोकीवाला असून बिचारा बिन-डोक लढला
परिणाम: मेला !!!!!!

हे जबरीच आहे.

व्वा. खरोखर जबरी कविता.
एक भाबडा प्रश्न - रावणाने मरताना 'हे राम' कुठल्या तोंडाने म्हटलं होतं ?
दुसरा तिर्यक प्रश्न - Ra One कसा (मरून) पडला त्याचाही किस्सा आहे काहो तुमच्याकडे प्रद्युम्न ?

मजे'शीर'

स्वाती, दोन ते पाचमधे तीन आणि चार येऊन गेले न. ब्लड शुगर बरीच हाय झाली होती हो. अहो डोक्यापर्यंत साखर पोचल्यावर दुसरं काय डोंबल होणार त्यांचं?

Back to top