कुठे शोधू तुला एकटीला
किती शोधू तुला एकटीला
तुझा विरह असह्य होतोय
तुझ्याविना चडफडतोय !
येताजाता बाहेर फिरायला
कामाला आणि उंडारायला
तुझी साथ असायची !
लांब जवळ गेलो तरी
तू बरोबरच असायची !
दारापासून कार्यालयापर्यंत-
मंदिरापासून मद्यालयापर्यंत
तुझ्याविना बाहेर पडायला
लाज वाटते मला ,
तुझ्याशिवाय बाहेर जायला
तोंड नाही मला ,
'प्रिये'च म्हणतो आता तुला
प्रिये, जीव किती गुंतला !
किती छळणार मला
किती दुखवणार मला ,
तुझ्यासवे दूरवर
फिरायला आवडते ,
तू आता नसतांना
माझे पित्त खवळते !
कुठे आहेस कशी आहेस
शोध काही लागेना ,
एकच पायात घालू कशी
दुसरी चप्पल सापडेना !
" शोध तिचा लागेना ...! "
Submitted by विदेश on 19 January, 2012 - 12:36
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
काहीच्या काहीत का? ही तर
काहीच्या काहीत का? ही तर फक्कड विनोदी मस्त कविता आहे.
आजुबाजुच्या कुत्र्याना
आजुबाजुच्या कुत्र्याना विचारा.
मस्त करमणूक.