एक्स्पायरी डेट - अंतिम भाग

Submitted by विस्मया on 14 January, 2012 - 23:17

याआधीचा भाग इथं वाचा.
(उत्कंठा राखण्यासाठी मागचा प्रसंग पुढे पुन्हा कंटिन्यू करण्याचा फॉर्म या कथेत वापरला आहे)

प्रकरण सहा

" संदीपा, निघायचं ना ? "
" जॉन हे तरी वाचू देत ना
" काय वाचायचं त्यात ! आता कळेलच ना सगळं."
" धिस इज नॉट डन जॉन. तुला आणि प्रोफेसरांना सगळं माहीत आहे म्हणून मला काय फरफटत नेणार का सगळीकडे ?"
" हे बघ आपल्याला आता प्रोफेसरांच्या घरी जेवायला जायचंय. त्याआधी एयरपोर्ट रोडवरच्या ऑफीसमधे आपल्याला जायचंय. रचनाचं ऑफीस, संगणक नीट बघ तू. उद्या मीटिंग आहे आणि लगेचच अहवाल देखील बनवायचाय आपल्याला "
" नाही आताच सांग. हे काय चाललंय जॉन ? "
" सांगतो म्हणालो ना !"
" जॉन धिस इज टू मच . मला कशाचीही टोटल लागत नाहीये "
" बरं ठीक आहे. रात्री प्रोफेसरांनी बोलवलंय. त्यावेळी तुला कळून जाईल. उद्या बॉसने मिटींग बोलवलीये अहवाल बनवण्यासाठी "
"अहवाल ? "
"मॅडम, भारताच्या हाय कमिशनरचा मृत्यू ही साधी गोष्ट नाही. तिकडच्या मीडियाने लावून धरलय सगळं. आता एक वर्ष होत आलं म्हटल्यावर पुन्हा एकदा फोन येऊ लागलेत. एका न्यूज चॅनेलचे रिपोर्टर्स स्टोरीच्या आशेने कालच हेडक्वार्टर मधे आले होते. आज केपमधे दाखल झाले असतील "
" अरे पण त्यांचा मृत्यू हार्ट अ‍ॅटॅकने झाला ना ? "

" संदीपा ! ते खरंच आहे. आपणही तेच तर सांगतोय, पण असं आहे, शहांनी जी जागा खरेदी केली त्याच्या कमिशनचा चेक सिंग साहेबांच्या बायकोच्या नावाने भारतातल्या बँकेत जमा झालाय. भारतीय चलनात दहा कोटी रूपये ! "
" माय गॉड "
" हा चेक सुबोध एंटरप्रायजेसच्या खात्यातून जमा झालाय "
" म्हणजे व्होरांना उद्ध्वस्त करण्यात सिंग साहेबांनी भूमिका बजावलीये ? "
" तसं आताच म्हणता येत नाही. पण जागेच्या व्यवहारात तर नक्कीच ! "
" जॉन तू नेहमी हातचं राखून का बोलतोस ?"
त्यावर जॉन फक्त गडगडाटी हसला.

" जॉन, तू बराच पुढे आहेस तपासात. पण त्यातलं बरंचसं रिपोर्ट्समधे नाही असा मला संशय आहे. प्रोफेसरांनाही तू सगळी माहीती देत असशील यावर माझा विश्वास नाही "
" संदीपा..."
"जॉन, माझ्यापासून लपवू नकोस काही "
" अ‍ॅक्च्युअली प्रोफेसरांनी या नोटस क्रमाने काढल्या म्हणून इथपर्यंत तुला सलग कळालं नाहीतर तिच्या डायरीत कुठलाही क्रम नाही. जसं आठवेल तसं लिहीलय तिने. प्रोफेसरांनी मागचा प्रसंग आणि पुढच्या प्रसंगातली संगती जोडून घेत ते पूर्ण केलंय. रहस्यकथांमधे नाही का मागे सोडून दिलेलं प्रकरण पुढे सुरू होतं तसं "
" म्हणजे प्रोफेसर रहस्यकथा वाचतात तर " संदीपा हसत म्हणाली.
" माहीत नाही. पण आता प्रोफेसरांना वेळच मिळणार नाही नोटस काढायचा. म्हणूनच या केसमधली संगती लावणं आपल्या सर्वांनाच गरजेचं आहे. मागचा भाग लक्षात ठेवायचा आणि पुढे जोडून घ्यायचा. लक्षात ठेव हं संदीपा.. "
जॉन मिस्कील हसत होता. त्यातली मेख संदीपाच्या लक्षात आली नसावी.
" आता खरंच वेळ नाही आपल्याकडे. जर का यातलं काही लीक झालं कि हा इंडियन मेडीया अशक्य आहे. २४ तास हीच स्टोरी राहील त्यांच्याकडे. आणि इथंही त्यांचीच री ओढली जाईल असं दिसतंय. "
" का बरं ?"
" तिथं गोंधळ सुरू झाला कि कृष्णवर्णिय कामगारांच्या हत्येचा इश्श्यू इथं गरम होईल. दोन्हीमधे मरण आपलंच ना ?"

संदीपाने समजलं न समजलं अशा अर्थाची मान हलवली. एयरपोर्ट रस्ता येईपर्यंत तिने नोटस वाचायला सुरूवात केली. ल्युसीच्या इथे पुढे काय झालं... तिला भयंकर उत्सुकता लागून राहीली होती.

*******************

रात्री प्रोफेसरांकडे जॉन आणि संदीपा जेवायला गेले होते. संदीपाने दिलेल्या लिस्टप्रमाणे मिसेस व्हॅटमोर यांनी मसाले आणले होते. बंगाली पद्धतीने केलेले मासे आणि भात याचा घमघमाट जॉनला अस्वस्थ करत होता. त्याने तसं बोलून दाखवल्यावर सगळेच हसले.

"प्रोफेसर जॉनचं नाक खूपच तीक्ष्ण आहे "
" ते पाहीलंच मी. अतिशय तल्लख बुद्धीचा कॉप आहे जॉन "
" प्रोफेसर ! जेवण झाल्यावर आता या केसवर तुम्ही प्रकाश टाका "

बंगाली रश्शाचा रंग पाहूनच सगळे खूष झाले होते.

" तुला माहीतिये का संदीपा ! बंगाल मधे मी आवर्जून मासे खाल्ले. पहिल्यांदा डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. पण त्याचबरोबर ही चव पण अशी काही जीभेवर रेंगाळली कि त्यानंतर बंगाली \ भारतीय पद्धतीचं जेवण हा माझा वीक पॉईण्ट बनला. तुझी आई कोकणस्थ नाही का ? तिथली चव पण चाखलीये बरं का मी. त्या नारळाच्या दूधाला काय म्हणतात गं ? मी घरी पण ट्राय केलं पण जमलं नाही आणि सुझनची बोलणी खावी लागली ती वेगळीच " प्रोफेसर भरभरून बोलत होते.

त्यावर मिसेस व्हॅटमोर हसत हसत म्हणाल्या " संदीपा, डॅनी असाच आहे. पन मला भीती वाटते गं लाल रंगाची " संदीपा फक्त हसली.

संदीपाच्या हाताला चव होती.
जॉन डोळे पुसत पुसत आणखी मागून घेत होता. ते पाहून प्रोफेसर गालातल्या गालात हसत होते. सुझन आंटीच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि त्या हातानेच नको नको म्हणून खूण करत होत्या.
त्यांना माशाचे तुकडे धुवून घेऊन फक्त भाताबरोबर खाताना पाहून प्रोफेसरांना हसायला आलं. त्यावरून त्या दोघात शाब्दिक चकमक उडाली.
आता त्यांना हसायची पाळी जॉनची होती.

"संदीपा, माझ्या बायकोला , मेरीला पण शिकवशील का ?"
" शिकवीन शिकवीन , पण फीज द्यावी लागेल "
" माझ्या मुलाला मासे खूप आवडतात संदीपा "
" ओहो, मग फीज नाही.. फ्री शिकवीन रे "
" जॉन, मुलाला घेऊन ये माझ्याकडे "
" प्रोफेसर, माझ्या मुलासाठीच मला वेळ नाही बघा "
जॉनच्या मुलाचा उल्लेख झाल्याने संदीपाला राहवलं नाही.
" काय होतं त्याला ? "
" आवाज ऐकू येतात त्याला दूरचे..."
" स्किझोफ्रेनिया ?"
" संदीपा ! पेशंटला पाहिल्याशिवाय, माहिती घेतल्याशिवाय अंदाज बांधत जाऊ नकोस "
संदीपाला मेल्याहून मेल्यासारखं झालं. ऩकळत ती प्रोफेसरांसमोर बोलून गेली. इतरांचं ठीक होतं, पण संदीपा या शाखेची विद्यार्थिनी म्हटल्यावर तिला बोलणी बसणं स्वाभाविकच होतं.

जेवणं झाली तसं सगळे हॉलमधे येऊन बसले.

" जॉन तुझा ब्लॅक मॅजीकवर विश्वास आहे ? "
" एक कॉप म्हणून नाही "
" म्हणजे जॉन म्हणून आहे...."
"प्रोफेसर .. मी इथं जन्मलो. वाढलो. ही संस्कृती माझ्या नसानसात वसलीय" दुखावलेल्या स्वरात जॉन बोलत होता " तुमच्या येण्याने आमच्या संस्कृतीवर बरेच आघात झाले. काही चांगले तर काही वाईट पण. तीन पिढ्यामागे धर्म बदलूनही मी माझी संस्कृती विसरू शकलो नाही "
" आय अंडरस्टँड जॉन "
" लहानपणापासून पाहीलेलं, अनुभवलेलं मी कसा नाकारू प्रोफेसर ? "
" हम्म.."
" असो. प्रोफेसर सुरू करा आता "
" मला एक सांग, मी मागवलेली माहिती आणलीस का ? "
" तुम्ही हुकूम करायचा प्रोफेसर. "

प्रोफेसर उठून उभे राहीले. पॅरासायकॉलॉजी बद्दल त्यांनी रचनाला दिलेलं लेक्चर पुन्हा एकदा संदीपा आणि जॉनसाठी रिपीट केलं. जॉनसाठी ते नवीन नव्हतं इतकंच.

" सर, म्हणजे हे पूर्वाभासाचं प्रकरण आहे का ?"
" ऑक्टोबर मधे जेव्हां मी एका प्रकरणाची माहीती घेतली तेव्हां मी चाटच पडलो. अशी केस यापूर्वी कधीही झाली नव्हती. एका व्यक्तीने ट्विटर वर तो मरणार असल्याचं ट्विट केलं. त्यात तो कुठल्या लॉजमधे कशा पद्धतीने आणि कुठल्या तारखेला मरणार आहे हे लिहीलं होतं. "
" हो . ऐकलंय त्याबद्दल. पण नंतर काय झालं त्याचं ? "
" तो ज्या दिवशी मरणार होता त्या दिवशी त्याचं मित्रांसाठी शेवटचं ट्वीट होतं त्यात मरणाच्या तारखेमधे पंधरा दिवसांचा बदल सुचवला होता. "
"पंधरा दिवसांनी तो त्याच नावाच्या लॉजमधे सांगितलेल्या दिवशी ( बदललेल्या तारखेला ) आणि सांगितलेल्या वेळेला ट्विट केल्याप्रमाणे हार्टअ‍ॅटॅकने मेला ......! "

"हे कसं झालं असावं "
" गूगल वर सर्च दिलात तर तुम्हाला ही माहीती मिळेल. मी त्याच्या मित्रांना संपर्क साधला तेव्हा त्याने अशाच प्रकारे काही लोकांच्या मृत्यूची भविष्ये सांगितली होती. "
" मग ?"
" त्यातली काही खरी झाली.... ! "
" ओह नो "
" जॉन काय म्हणशील याबद्दल ?"
" काहीच नाही. "
"म्हणजे?"
" प्रोफेसर, तुमच्याचसारखं .. माहीती घेतल्याशिवाय काहीच सांगता येत नाही " डोळा मारत जीन म्हणाला. प्रोफेसर हसले.
" सर ! या व्यक्तींना असं वाटत असावं कि आपण आता मरणार आहोत, आणि या भीतीपोटी ती वेळ जवळ येताच प्रचंड दडपणाखाली त्यांचा मृत्यू झाला असावा. मानसशास्त्राला अशा केसेस नव्या नाहीत"
" संदीपा, ते ठीक आहे. पण इतरांच्या भविष्याबद्दल काय ?"
,
,
" आपल्या केस मध्ये राहुल ? "
प्रोफेसर हसले.
"जॉन ! आता बोल तू "
जॉन ने पॉझ घेतला.

"प्रोफेसर ! मी या राहुलबद्दल माहीती काढली. ज्या ज्या कामगारांच्या मृत्यूच्या घटना झाल्या त्यासंबंधात माहीती काढली. रचनाच्या एचआरडी मधे जाऊन कंपनीच्या एम्प्लॉईज रजिस्टरची माहिती घेतली "

" मग ?"

" प्रोफेसर ! धक्कादायक माहिती आहे. हा राहुल कधीच या कंपनीत कामाला नव्हता ! इतकंच काय त्याच्याबद्दल कुणालाही कसलीही माहिती नाही. याबाबतीत रचनाने लिहीलेले सगळे प्रसंग काल्पनिक आहेत "

हा मात्र प्रचंड मोठा धक्का होता. अगदी प्रोफेसर सुद्धा त्यातून सावरले नाहीत. संपूर्ण केसला आता यु टर्न मिळाला होता. इतक्या दिवसांची मेहनत वाया जात होती.

" मला शंका आलीच होती. तिच्या बोलण्यात असंबद्धतता येत होती कधी कधी. "
ते मान हलवत राहीले.
" म्हणूनच ती राहुलला घेऊन ये म्हटलं कि विरोध करायची. "

"पण जॉन, नंदिनीला माहिती असेलच ना त्याच्याबद्दल. ती राहुलबद्दल तिच्याजवळ कितीतरी बोलली होती. जर राहुल अस्तित्वातच नाही तर रचनाच्या मेंदूच्या कार्यपद्धतीप्रमाणे ती नंदिनीजवळ कधीही राहुलबद्दल बोलणार नाही "

" म्हणजे प्रोफेसर, तुमच्या अजून लक्षात आलं नाही ? "

" काय ?
"अहो ! नंदिनी पण कधीच अस्तित्वात नव्हती "
" ओह गॉड ! "

सर्वांना धक्क्यांवर धक्के बसत होते. रचनाची केस किती कॉम्प्लिकेटेड व्हावी याला काही मर्यादा ?

---------------------------------------------------------

जॉन ने घाई केली म्हणून संदीपा चिडली होती.
तरी तिने नोटस सोबत घेतल्या होत्या. एयरपोर्ट रोडच्या रचनाच्या ऑफीसमधे पोहोचेपर्यंत जितकं वाचून होईल तितकं ती वाचत होती.

" व्हुडू ? "
" सगळ्यात घातक चेटूक ! "
" अरे देवा ! "
खूप वेळ शांततेत गेला. मग ल्युसीने परिस्थिती आपल्या नियंत्रणात घेतली.

" रचना तुझ्यावर हिप्नॉटिझम केलं गेलय आणि त्या वेळी तुझ्यावर नियंत्रण मिळवलं गेलंय "
" हिप्नॉटिझम ?"
"व्हुडूवाले हिप्नोसिस मधे एक्सपर्ट असतात. व्हुडू हे असं चेटूक आहे ज्यात ज्याच्यावर ते झालंय त्याच्याकडून वाट्टेल ते घडवून आणलं जातं "
"पण कशावरून माझ्यावर चेटूक झालंय"
"तुझे केस पाहीले मी. एक बट तिच्या स्कीन सहीत काढली गेलीय ! "
"........................."
" केस, स्कीन आणि रक्त. आता ते एका बाहुलीला लावलं गेलं असणार. त्या बाहुलीला दिलेले सिग्नल तुझ्यापर्यंत पोहोचत असणार आणि ते सिग्नल मिळाले कि तू हिप्नेसिसखाली वावरत असणार "
" ओह नो !"
" तुझ्यावर केलं गेलेलं चेटूक माझ्या लक्षात येत नाहीये. खूप एक्सपर्टचं काम आहे. व्हुडू वाल्यांची संघटना असते. शक्यतो ते एकमेकांची जादू कुठल्याही परिस्थितीत छेदत नाहीत. तसं केल्यास त्याचं वाटोळं होतं. "
"म्हणजे तू पण..?"
" नाही मी नाही. मी आपली काळी जादू शिकलेय ते लोकांवर काय जादू झालीये हे सांगण्यासाठी. कुणाचं वाइट होण्यासाठी मी हे काम करत नाही. व्हुडू देखील मी याचसाठी शिकलेय. तुझ्यावर कुणी चेटूक केलं हे समोर आलं कि त्यावरचा उतारा पण सांगता येईल."
"पण हे कशासाठी ?"
"मी तरी काय सांगू ? पण मला असं वाटतंय कि त्यांची जादू मधेच छेदली जातेय. त्यामुळे ते चिडून आहेत. कदाचित तुझ्या जीवावर उठणार आहेत. ते ढोलाचे आवाज हेच तुला संमोहीत करायचे सिग्नल असावेत. ज्यावेळी तुला संमोहीत केलं त्याच वेळी ढोलाचे आवाज तुला ऐकवले गेले असणार "
" आणि ते राहुलचं प्रेडिक्शन... "
" त्याबद्दल मला काहीच सांगता येत नाहीय्ये. कदाचित तो त्यांचा हस्तक असावा "
" हस्तक ?"
"हो हस्तक. हस्तक आजूबाजूला वावरतात. ते आजूबाजूला असताना सिग्नल्स पाठवता येतात. एकतर बाहुली किंवा माध्यम. फक्त माध्यमात आणि हस्तकात टेलिपथी असावी लागते "
"माध्यम ?"
" माध्यम. तू माध्यम आहेस "
" मी आणि माध्यम ?"
ल्युसी हसली.
"म्हणजे त्यांचं काम करण्यासाठी ?"
" तू माध्यम म्हणजेच लक्ष कुणीतरी असणार "
" काय म्हणायचंच्य ल्युसी ?"
" मला वाटतं रचना, राहुलने प्रेडिक्ट केलेल्या एक्सपायरी डेटस आनि तुझा जवळचा संबंध आहे. कदाचित त्यांचे खून झाले असावेत "
" ल्युसी काय बोलतेस तू ?"
" माफ कर रचना. मला नक्की सांगता येत नाही पण तुला त्यांनी त्यांची एक्सपायरी डेट सांगायला लावली असेल आणि त्या दिवशी तिथं असं काहीतरी घडलं असेल कि .... "
" ओह माय गॉड ! "
" किंवा त्यांच्याशी टेलिपथी प्रस्थापित केली गेली असेल. ती ही तुझ्याच करवी. आणि नंतर त्या माध्यमातून त्यांनी काही केलं असावं. काहीही. मेडिकल रिपोर्ट हार्टअ‍ॅटॅक सांगतो पण त्याचं कारण नाही सांगू शकत "
" ल्युसी तू मला खूनी ठरवतेस "
" रचना. प्लीज. मी तुला सावध करतेय. खून कुणीतरी घडवतंय. तुझा वापर त्यासाठी होतोय. यात तुला अडकवण्याचंही कारस्थान आहे "
,
,
,
,

" नंदिनी ! प्लीज हेल्प मी "
" रच्यु ! मी आहे तुझ्यासोबत. घाबरू नकोस "

"एक मिनिट ! "

ल्युसीने कसलातरी झाडू आणला. त्याने माझ्या अंगावर झटकल्यासारखं केलं. मग मला एका ग्लासातून थोडंस पाणी आणुन दिलं. त्यात कसलीतरी पावडर मिसळलेली दिसत होती .
मी ते पाणी प्यावं कि नको हा विचार करत होते पण ल्युसीने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात आता फक्त दयेचे भाव होते. विचार करत करत मी ग्लासातलं पाणी पिऊन टाकलं.

मला आता खूपच तरतरीत वाटू लागलं होतं.
" काही काळ तरी तुला त्यांच्यापासून लपून राहता येईल. पण नेहमीच नाही. या पाण्याचा प्रभाव संपल्यावर पुन्हा तुझ्याशी त्यांचं कनेक्शन प्रस्थापित होईल. त्यानंतर तू पुन्हा त्यांच्या ताब्यात जाशील. तोपर्यंत आपल्याकडे थोडा वेळ आहे "

ल्युसीने मग माझं डोकं दाबून दिलं. खूप बरं वाटलं तिच्या या कृतीने. खूप रिलीफ मिळाला. बरेच दिवसांच्या आजारातून उठल्यासारखं वाटत होतं.

मग मला का कोण जाणे कुणीतरी एक अनुवादीत इंग्लिश कविता म्हणतंय असं वाटू लागलं..

दि:कालातून आला, तो दि:कालातून आला
मृत्यूचे हे सत्य जगाचे, भविष्य घेऊन आला
अरे मानवा झुकेल आता त्याच्यापुढे हे शीश
ऐकशील ना आता आपुली मरणाची तारीख

माझ्या तोंडून हे कडवं ऐकताच ल्युसीने मला हलवलं. " कुठं ऐकलंस हे ?"
"नाही सांगता येत "
"ही आफ्रिकन दंतकथा आहे. मरणाचं भविष्य सांगणा-या मृत्युदूताची. त्याला देव मानलं जातं. खूष केलं जातं. त्याला खूष करणा-या प्रार्थनेचा हा इंग्लीश अनुवाद आहे."

"म्हणजे राहुल तो देव आहे ? "
"नाही. पण मृत्युदूताचा अंश जागवला गेलाय. नक्की माहीत नाही. राहुल नाही का ? काय फरक पडतो नावाने "
" मात्र आता ते चवताळून उठतील. काही काळ तू त्यांच्या नियंत्रणातून बाहेर होणार आहेस. निसटणार आहेस. हे त्यांना आवडणार नाही. माय गॉड ! मोठीच चूक झाली माझ्याकडून "
" रचना तुझ्या जिवाला खूप खूप धोका आहे "

ल्युसीने धोक्याची जाणीव करून दिली पण तिच्याकडे उपाय काहीच नव्हता. एखाद्या कॅन्सरने मरणा-या पेशंटला त्याच्या आजाराची जाणीव करून द्यावी आणि नंतर वैद्यकीय शास्त्रात या आजारावर अजून काहीच उपाय नाही हे ही त्याला सांगावं तशी माझी अवस्था झाली होती.

........................................................................................

रचनाचं ऑफीस येताच जॉनने गाडी पार्क करून संदीपाला उतरायचा इशारा केला. संदीपाने नोटस ठेवून दिल्या. ते आता रचनाच्या ऑफीसमधे शिरत होते

*****************************************

प्रकरण सात

" म्हणजे प्रोफेसर, तुमच्या अजून लक्षात आलं नाही ? "

" काय ?
"अहो ! नंदिनी पण कधीच अस्तित्वात नव्हती "
" ओह गॉड ! "

" जॉन ! मला नीट सांग बघू "
" मी नंदिनी बद्दल चौकशी केली. इथं कुठलीही नंदिनी म्हणून तिची मैत्रीण नाही. इतकंच काय कुणीच नंदिनी तिच्या कंपनीत कामाला देखील नाही आणि नव्हती. हे दोघे सोडले तर बाकिचे सगळे जण अस्तित्वात आहेत मी तिच्या शाळेतून माहिती घेतली. त्यावरून ती कुठे रहायला होती, तिचं लहानपण कसं गेलं. त्यांच्या परिस्थितीत कसा फरक पडला हे कळालं. "
" प्रोफेसर, त्तुम्ही जेव्हा तिच्या बाबतीत स्किझोफेनियाची शंका वर्तवली तेव्हाच माझ्या मुलाबद्दल तुम्हाला मी विचारलं होतं. तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्क्रिझोफेनियाची लक्षणं जी माझ्या मुलात आहेत ती रचनात दिसली नाहीत मला."
" यू आर राईट जॉन. कदाचित ती सुरूवात असावी "
" प्रोफेसर , तिच्या शाळेतून मिळालेया माहितीनुसार तिच्या मित्र मैत्रिणींची माहिती घेतली. माझा भारतातला कॉण्टॅक्ट पुण्यात गेला होता. रचनाचं लहानपण चांगलं म्हणता येत नाही. तिच्या डायरीत तिच्या आईबद्दल उल्लेख आहे. पण तिची आई लहानपणीच गेली. तिला तेव्हां कळत होतं. आई आठवत असणार तिला. तिच्या बाबांचं कदाचित कूठे तरी अफेअर असावं. त्याबद्दल निश्चित माहिती मिळत नाही. पण बाबांनी लगेचच दुसरं लग्न केलं होतं. तिच्या आईचा मृत्यू कसा झाला हे कळत नाही. पण रचना खूपच डिस्टर्ब होती. "
" नवीन आई आल्यानंतर बाबांकडे पैसे खुळखुळायला लागले. रचनाची रवानगी पुण्याजवळच्या एका हिल स्टेशनच्या शाळेत झाली "
" पाचगणी का " संदीपाने विचारलं
" तुला कसं माहीत ? "
" मी तिथंच शिकलेय जॉन "
" दॅट्स गुड संदीपा, मला आधी माहीत असतं तर ?"
" तू आधीच विश्वासात घेतलं असतंस तर ? "
" हम्म .. प्रोफेसर ! मी ही माहिती मिळवण्यासाठी काय काय केलं , कल्पना नाही तुम्हाला. अगदी रचनाच्या लहानपणाच्या डिटेल्ससाठी तिथल्या पोलीस खात्याची मदत घेणं, काही प्रायव्हेट सोर्सेसची मदत घेणं हे सगळं सोपं नाही प्रोफेसर "
" हम्म .. त्याबद्दल आभार "
" मला लाजवू नका प्लीज. आभार तर मीच तुमचे मानायला हवेत प्रोफेसर. पण आमच्या खात्याला या मेहनतीची कल्पना नाही "
" जॉन ! " त्याच्या खांद्यावर हात ठेवत प्रोफेसर म्हणाले.
"हं.. तर पुण्यातल्या ज्या शाळेत रचना होती तिथं तिची एक बेस्ट फ्रेण्ड होती... तिचं नाव नंदिनी ! "

प्रोफेसरांचे डोळे चमकले.

" जॉन ! तिची आई गेली तेव्हां रचना किती वर्षांची होती ?"
" सात "
" हं ! म्हणजे तिला ती आठवत असणार. तिचा मृत्यूही आठवत असणार "
"हं "
" पण तरी तिच्या लिखाणात आईचा उल्लेख आहे. आहे ना अजब ?"
" सर... ती डीआयडी ची शिकार आहे ना ?"

"संदीपा ही खूपच इंटरेस्टींग केस आहे "
" मला समजेल असं बोला.. व्हॉट डीआयडी ?"
" डीआयडी ही टेस्ट आहे. मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतात याला "
" म्हणजे ?"
" सोप्या भाषेत स्प्लिट पर्सनॅलिटी. संदीपा जॉनला समजावून सांग "
" जॉन ! एखादा मनुष्य एकापेक्षा जास्त व्यक्तीमत्व जगू लागतो तेव्हा तो या मानसिक आजारातून जातोय असं आपण म्हणू शकतो. त्याच्या कितीही प्रोफाईल्स असू शकतात. एक तो स्वतः आणि बाकि त्याने उभ्या केलेल्या "
" म्हणजे लोकांना फसवण्यासाठी "
"छे ! तो कुणालाच फसवत नसतो. त्याच्या मेंदूत कप्पे निर्माण झालेले असतात. थोडक्यात त्याच्या मेंदूतलं प्रोगामिंग असं काही बिघडलेलं असतं कि अचानक तो दुस-या व्यक्तिमत्वात शिरतो. त्याचा स्वभाव त्याने ठरवलेला असतो. त्याप्रमाणेच तो वागू लागतो. कदाचित तो क्राईमही करू शकतो. आणि जेव्हां मूळ व्यक्तिमत्वात परत येतो तेव्हां त्याला या कप्प्याचं त्या कप्प्याला काहीही माहीत नसतं. "
" म्हणजे त्याने दुसरंच कुणीतरी बनून खून केला तर.."
" हो, शक्य आहे. पण जेव्हां तो मूळ व्यक्तिमत्वात परत येईल तेव्हां त्याला त्याबद्दल काहीही माहीत नसतं. हे सिद्ध झालेलं आहे "

"जॉन संदीपाने उत्तम माहीती दिलीये बघ. या आजाराची शक्यता आपण गृहीत धरूयात. पण बघ ह. आतापर्यंत आपल्याला ज्या केसेस माहीत आहेत त्यात काय होतं ? तो स्वतःच त्या त्या भूमिका जगत असतो नाही का ?"
" हो. बरोबर सर "
" त्याला एका व्यक्तिमत्वात असताना दुस-याबद्दल काही ठाऊक असतं ?"
" नाही "
" आपल्या रचनाच्या केसमधे तिला एकाच वेळी सगळी व्यक्तीमत्वं ठाऊक आहेत का ?"
" अं.... खरं तर हो , तिला रचना असताना नंदिनीही ठाऊक आहे आणि राहुलही "
" आणि ती त्या भूमिकेत शिरतेय का ?"
" नाही. ती या भूमिकांपासून अलिप्त राहतेय "
" ती नंदिनी बनून किंवा राहुल बनून कुणाला भेटलीये का ? हा प्रश्न जॉनसाठी"
" आजपर्यंत तरी या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. तसंच ती ज्याला ज्याला भेटली त्या कुणालाही या दोघांबद्दल बोललेली नाही. दोनच व्यक्तींसमोर तिने यापैकी एकाचा किंवा दोघांचा उल्लेख केलाय "
" कोण ?"
" एक तुम्ही स्वतः आणि दुसरी ब्लॅक मॅजीक वाली ल्युसी "
"हंम्म.. !"

प्रोफेसर विचारात पडले.

"सर ही केस डीआयडीची नाही का ?"
" संदीपा. असं कुठलीही शक्यता नाकारून चालत नाही. हे शास्त्र बाल्यावस्थेत आहे. अनुभवावर विकसित होतंय. ही केस जगावेगळी खरीच. कदाचित स्प्लिट पर्सनॅलिटीची ही एक वेगळीच केस असावी ज्यात व्यक्ती स्वतः ते आयुष्य जगत नाही "
" मग सर ! त्या प्रेडिक्शन्सचं काय ?"
" जॉन, आणखी काय माहीती दडवलीयेस ?"
" दडवलीये नका म्हणू प्रोफेसर.. ! "

जॉन उठत म्हणाला. त्याला थांबायचा इशारा करत प्रोफेसर त्याला निर्वाणीचा इशारा देत म्हणाले, " थांब जॉन ! आत चल "

दोघे गेस्टसाठी राखून ठेवलेल्या रूममधे गेले. आत फिक्क्ट पडलेली आणि चेह-यावर कसलेही भाव नसलेली एक स्त्री होती.

"जॉन ! ओळखतोस ना हिला "
" रचना जोशी ! ओह माय गॉड "
तिच्या डोळ्यातली ओळख केव्हाच नाहीशी झाली असावी. एखाद्या प्रेतासारख्या असलेल्या रचनाकडे पाहवतही नव्हतं. गाल बसलेले, केसाची दुरावस्था झालेली, कपड्यांचीही शुद्ध नसलेली आणि कदाचित श्वास घेतेय म्हणून जिवंत म्हणायचं अशी अवस्था झालेल्या तिला पाहील्यावर जॉनही गहिवरला.

"प्रोफेसर, ही कुठं सापडली ?"
" ती स्वतःच आली जॉन "
" कसं शक्य आहे ?"
" का नाही ? जॉन ती पहिल्यांदा आली तेव्हां तिने झेनर कार्डस पैकी फक्त दोनच पत्ते ओळखले होते. पण जस जसे आमचे सेशन्स होत गेले, अर्थात राहुलच्या केससाठी, आमच्यात इंटरअ‍ॅक्शन वाढत गेलं. ती जवळ असताना मला कधीकधी आजूबाजूला ढोल वाजल्याचे भास होत असत. म्हणून मी पुन्हा एकदा झेनर कार्डसचा प्रयोग केला... जॉन तिने दहाही पत्ते अचूक सांगितले "
" व्हॉट ?"
" एकदा नाही अनेकदा... प्रत्येक वेळी !"
" यू मीन... "
"येस्स जॉन. मी सुद्धा !!!"

आता धक्का जॉनला होता.
"संदीपा माझ्यात ही शक्ती असल्याची जाणीव झाली तेव्हाच मी या साईडकडे वळालो. मी मूळचा न्यूझिलंडचा बरं का जॉन. टेलिपथी आणि ब्लॅक मॅजिक यांचा जवळचा संबंध आहे. म्हणून मी भारतात आलो. बंगाल, कोकण या भागात हिंडलो. नंतर आफ्रिकेत आलो. इथं तर बरंच चालतं, तुला माहीतच आहे. "
" सर , तुम्ही या शक्तींचं अस्तित्व मान्य केलंत ?"
" तुला माहीत नाही का संदीपा ? मी केव्हढा विरोध झेलला. पण मी या सर्वांमागचं विज्ञान शोधलं तेव्हां मला असं जाणवलं कि संमोहन शास्त्र आणि मानसशास्त्र यांचा जितका संबंध आहे तितकंच या ब्लॅक मॅजीकवाल्यांनाही ते महत्वाचं आहे. ती एक कला आहे असं म्हणूयात ना, चेटूकवाल्यांना त्यातलं सायन्स माहीत नाही पण ते कसं वापरायचं हे माहीत आहे. ज्याच्यावर ब्लॅक मॅजीक झालंय असं म्हटलं जातं तो कुठल्या न कुठल्या मानसिक आजाराने ग्रस्त असतो. तो आजार दूर झाला कि त्याच्यावर चेटूकचा प्रभावही नाहीसा होतो. बरेचदा स्किझोफेनियाचे रोगी चेटूकचे शिकार झाल्याचं दिसून येतं. खरं म्हणजे त्यांच्यात ईसपी चे सेन्सेशन्स असतात. ज्यावेळी त्यांच्यावर संमोहनाचे प्रयोग केले जातात तेव्हा ते रिसीव्हर बनतात. आणि मग ते एखाद्या आवाजाची वाट पाहत असतात किंवा त्यांना तो ऐकवण्यात येतो. टेलिपथीची ही जाणीव म्हणा किंवा आणखी काही म्हणा.. कुठल्या तरी उपायाने रिसीव्हरशी कनेक्शन जोडण्याची कला यांना अवगत असते. ही बाहुली वगैरे निमित्त असावं.. तो मांत्रिक स्वतःच सेंडर बनत असतो. बाहुली प्रतिकाचं काम करत असते. तिच्याद्वारे काहीच होत नसतं. ती एक निर्जीव बाहुली.. सेंडरच्या जाणिवाच रिसीव्हरला मिळत असतात "
"आज ल्युसीला बोलवून घेतलं होतं. तिला यामागचं थोडंसं सायन्स सांगितलं तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिला थोडं समजलं बरंचसं नाही. लोकांना वाटतं मी त्यांना काळ्या जादूतून बरं करतो. पण खरं तर मानसिक आजार दूर झाला कि रोगी आपोआपच बरा होत असतो "
"म्हणजे मानसिक आवाजाचे सगळे रूग्ण हे चेटूकचे शिकार असतात ?"
"संदीपा ! माझ्या स्टेटमेण्टचा असा अर्थ निघतोय का ? हा आजार होण्याची कारणं वेगळी आहेत. लहानपणी घडलेल्या असाधारण घटना. ज्या रचनाच्या केसमधे दिसतातच. आई नसणं, तिचा गूढ मृत्यू, मग बाबांनी दुसरं लग्न करणं... तिचं भावविश्व उद्ध्वस्त होण्यासाठी पुरेसं होतं. उद्या मी याचा खुलासा करीनच "

" जॉन , आता मला तुझाकडची सगळी माहीती हवी तरच मी उद्याच्या मीटिंगला येण्यात अर्थ आहे. नाहीतर माझा संबंध फक्त रचनाशी आहे. मी तिच्याकडे लक्ष देणं हे सध्याच्या घडीला माझं परमोच्च कर्तव्य आहे. तुमची मदत करणं माझ्यासाठी दुय्यम बाब आहे "

जॉनला वाईट वाटलं असावं. पण त्याने निर्णय घेऊन प्रोफेसरांना सगळं सांगायला सुरूवात केली. जॉन सांगत असताना प्रोफेसर फक्त ऐकत होते. मधेच त्यांच्या भिवया ताणल्या जात, तर कधी डोळे आक्रसले जात. डोळे मिटून ते एकाग्रपणे ऐकत होते.

जॉनचं सांगून झाल्यावरच त्यांनी डोळे उघडले.
"जॉन उद्याची मीटिंग आणि आपली भेट शेवटची ठरो ! या केस संदर्भातली "
"प्रोफेसर तपास चालू आहे आणि राहील "
" म्हणजे ?"
" म्हणजे उद्या तयारीत रहा रात्री. मी ओल्ड कॅसलला जाणार आहे. तिथून फोन करीन तेव्हां आपल्याला पळापळ करायचीये ..."

प्रोफेसर न समजल्यासारखे पाहत राहीले.....
" शेवट जवळ आलाय प्रोफेसर ! " जॉन हसत म्हणाला

-------------------------------------------------------

किती वेळ गेला ते लक्षातच नाही आलं. समुद्राचं वारं जाणवत होतं. मधेच कधीतरी गाडी समुद्राकाठचा रस्ता सोडून वर चढू लागली तसं संदीपा बाहेर पाहू लागली. समुद्र खाली दिसत होता. गाडी आता केप पॉईंटच्या रस्त्याने वर चढत होती.

वर गेल्यावर एक दीर्घ वळण घेऊन ते थांबले

"संदीपा, उतर चटकन "
ओल्ड कॅसल भागात आता ते होते. ती एक निर्जन जागा होती आणि एक पडकं घर तिथं दिसत होतं. लांबूनही ते घर दिसलं नसतं पण रस्त्यावर थांबलेली गाडी मात्र दिसली असती असा तो स्पॉट ह्प्ता. घराला लागून अनेक वेली आणि झाडं होती. कित्येक वर्षात रंगरंगोटीही केलेली नसावी. दारं खिडक्या नावालाच होते. आत मधे कदाचित प्राणी पक्षी असावेत. माणसाचा लवलेशही बाहेरून दिसून येत नव्हता. तिथं असं एखादं घर असावं हे रोज त्या रस्त्याने जाणा-याच्याही लक्षात आलं नसतं.

जॉन च्या हातात गन होती आणि तो गाडीतून उतरत होता. हळूच त्याने गेट ढकललं तेव्हां बिजाग-यांचा केव्हढा तरी मोठा आवाज झाला. इतका कि जॉन देखील दचकला. आत वाघळांची फडफड झाली असावी. निशाचरांसाठी याहून चांगलं निवासस्थान कुठलं असणार होतं ?

"संदीपा, गाडीजवळच थांब. बी अ‍ॅलर्ट. मी आत जातोय. दोन तासाने परत आलो नाही तर कंट्रोल रूमला कळव "
" जॉन. काही घडणार असेल तर मी येते "
"काहीच घडणार नाहीये. काही घडलं तरच आश्चर्य आहे "
" मग ही गन, हा इशारा "
"काळजी नको घ्यायला ? "

" रिलॅक्स ! मी येतोच परत. आता इथं कुणी नसावं या अंदाजाने आपण आलोय. पण कुणी असलंच तर मात्र गोळीबार ऐकू येईलच तुला " जॉन हसत हसत म्हणाला.

संदीपाने दोन तासाचा अलार्मच लावला. अशा कुठल्याही मोहीमेची तिला सवय नव्हती. त्यामुळं एकीकडे भीती वाटत असतानाच ती थोडीशी उत्साहीतही झाली होती.

अर्ध्या तासाने जॉन आला तेव्हा त्याच्या अपेक्षेप्रमाणेच काही घडलं नव्हतं.

" जॉन आपण इथं का आलो होतो ?"
" एका मिसिंग कनेक्शनसाठी. त्याबद्दल सांगतो नंतर.. इथून ते नाहीसे झालेत. आपल्याला त्यांचा माग काढावा लागणार आहे. "
" कोण नाहीसे झालेत ?"
जॉनने एक फडकं दाखवलं. ते उघडून घेतलं तेव्हा त्यात एक काळी बाहुली होती आणि तिच्या डोक्याला केस चिकटवलेले होते. तिच्या डोक्याला सुया टोचलेल्या होत्या.
" हे काय आहे जॉन ?"
" मी म्हटलं ना मिसिंग कनेक्शन ! "

"प्रोफेसर ! रचना आहे का घरात ?"
........................................
"काय ? कशी ? कधी ? "
.......................................

"जॉन काय झालं ? "
"संदीपा रचना आज नाहीशी झालीय. प्रोफेसरांना काहीच माहीती नाही. ते आपल्यासोबत मीटिंगलाच होते ना दिवसभर !"

........................................................................................

डोनाल्डच्या ऑफीसमधे प्रोफेसर व्हॅटमोर, संदीपा, जॉन आणि खुद्द डोनाल्ड हे गंभीर चेहरे करून बसले होते.

" जॉन, खूप वेळ लागतोय , तपासाला. मी खूष आहे असं समजू नकोस "
" हं !"
" बोला प्रोफेसर ! काय म्हणता ?"
"संदीपा, तूच सुरू कर.."
संदीपाला समजेना डोनाल्डसमोर सुरूवात कशी करावी. ती भांबावली.
"जॉन ?"
जॉन ने मग प्रोफेसरांना सांगितलेली कहाणी पुन्हा रिपीट केली. खूपच संक्षिप्त. बहुधा त्याने बॉसला आधीच ब्रीफ केलेलं असावं.

" म्हणजे प्रोफेसर ही केस ब्लॅक मॅजीकची आहे असं तुमचं म्हणणं आहे ?"
"मी काहीच म्हणत नाही. काही नाकारतही नाही आणि काही स्विकारीतही नाही "
"कम ऑन ! आपल्याला लॉजिकल रिपोर्ट लिहायचाय. त्यात या ब्लॅक मॅजीकला काहीही स्थान नाही. माझा विश्वास नाहीच पण सगळ्यांचं ऐकून घ्यायला मी तयार आहे "
" डोनाल्ड ! जॉनला सांगू दे आता "
" सर , परिमल इंडस्ट्रीतला स्फोट शहांच्या माणसांनी घडवला असावा असा संशय आहेच. "
" काय झालं त्या केसचं ?"
" सर ! तपास चालूच आहे "
" कधीपर्यंत ? "
"केस बंद होत नाही तोपर्यंत !"
डोनाल्डला काहीतरी खरमरीत बोलायची हुक्की आली होती पण प्रोफेसर व्हॅटमोर तिथं असल्याने त्याने शब्द गिळले.
" बरं पुढे सांग "
" तर, त्या केस मधे एक भारतीय मुलगा होता. रचनाच्या असंबद्ध लिखाणातून आणि खोडलेल्या काही पानातून प्रोफेसरांनी जी शक्यता व्यक्त केली त्यावरून तिच्याबाबतीत संमोहनाचा प्रयोग केला गेला आहे "
" कम ऑन जॉन ! हे लिहायचं रिपोर्ट मधे ?"
" डोनाल्ड ! संमोहन हे शास्त्रच आहे..."
" ओके "
" तर संमोहनाचा उपयोग करून तिच्या मेमरीतला काही भाग पुसून टाकण्यात आला आहे. अगदी पाटी पुसतात तसा "
" प्रोफेसर हे शक्य आहे ?"
" संमोहनात असं स्कील मानसशास्त्राच्या अभ्यासक व्यक्तिंच्या बाबतीत माझ्या पाहण्यात नाही. पण अशा प्रकारे प्रावीण्य मिळवलेलं असणं अशक्य नाही. दुर्दैवाने ब्लॅक मॅजीकवाल्यांकडे हे ज्ञान आहे. पिढीजात ..!"
" त्याचा या केसशी काय संबंध पण ?"
" सर ! ज्या वेळी हा स्फोट झाला त्या वेळी रचना त्या इमारतीत शिरण्यासाठी बाहेर गाडी लावत होती. प्रचंड स्फोटाच्या आवाजाने ती बधीर झाली असावी , त्याच वेळी तिला धक्का मारून कुणीतरी पळालं आणि त्या व्यक्तीच्या मागे तीन चार लोक "
" इंटरेस्टिंग ! "
" सर ती माणसं शहांची असावीत असा माझा संशय आहे. ते रचनाला आणि रचना त्यांना ओळखत असावी "
" कशावरून ?"
" कारण, मला पहिल्यापासून रचनाशी बोलू दिलं जात नव्हतं तेव्हाच मला संशय आला होता आणि मी रचनावर पाळत ठेवली होती "
" जेव्हां ती ल्युसीकडे दिसली तेव्हा मला संशय आला. इथं काहीतरी पाणी मुरतंय. पण रचना अगदी इनोसण्ट वाटत होती. पण तिचा संबंध काही वस्तू खरेदी करण्यापुरताच दिसत होता. तरीही मी ल्युसीला दमात घेतलं. ल्युसी काही सामान्य बाई नव्हे. ब्लॅक मॅजीकच्या क्षेत्रातलं एक बडं नाव आहे. पण तिने तिच्या देवांवर हात ठेवून शपथ घेतली तेव्हा मला खात्री पटली. पण तिने जे काही सांगितलं ते धक्कदायक होतं. रचनावर ब्लॅक मॅजीक झालंय किंवा कोणत्या तरी शक्तीम तिच्यावर नियंत्रण मिळवू पाहत आहेत हे ल्युसीला जाणवलं होतं. म्हणून मी चौकशीच्या बहाण्याने रचनाच्या डोक्यात ल्युसीला भेटायची सूचना दिली. ती ही अशी कि ही सूचना आहे हे तिला समजू नये. मला ही खबरदारी घ्यायची सूचना ल्युसीनेच केली होती "
" पुढे तिच्या तपासात हे लक्षातच आलं. तिच्यावर काळी विद्या अजमावण्यातही आली होती आणि त्यासाठी संमोहनशास्त्राची मदत घेण्यात आली होती "
" काल प्रोफेसरांशी बोलल्यावर संमोहनाबद्दल माहीती मिळाली. रचना मानसिक दृष्ट्या खंबीर आहे असं ती समजत होती. प्रत्यक्षात तिचं बालपण असुरक्षित असल्याने मनाच्या एका झाकलेल्या कोप-यात असुरक्षिततेची भावना होती . असे लोक अशा प्रयोगांना चटकन बळी पडतात. "
" जॉन ! तुझ्या तपासातलं एक अक्षरही माझ्या कामाचं नाही. इतके दिवस वाया घालवून तू हे ऐकवतोयेस ? तुला वेळोवेळी ज्या सूचना दिल्या त्याच्यावर काहीसुद्धा विचार केला नाहीस ? आणि संदीपा तू पण पाट्या टाकल्यास ?"
" सर ! प्रोफेसर व्हॅटमोरना आणलंय ना त्यासाठीच "
"हं...."
मग अचानक चेह-यावर प्रोफेशनल हसू आणून डोनाल्ड प्रोफेसरांकडे वळाला.
" प्रोफेसर ! माफ करा हं. तुम्हाला ऑकवर्ड वाटलं असेल. पण माझी माणसं काय सांगतात ते ऐकलंत ना तुम्ही ? आता हे कायद्याच्या भाषेत कसं बसवू मी ? "
"लेट हिम फिनिश "
" सांग रे जॉन.. जे हवं ते सांग "

" सर ! ज्या ज्या लोकांचा गूढ मृत्यू झाला त्या सर्वांना रचना भेटलेली होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे मात्र राहुल भेटला जो कधीही तिच्या कंपनीत नव्हताच. नंदिनीही अस्तित्वात नव्हती. पण खरी गंमत अशी कि जी माणसं मृत्यू पावली ती स्फोटाच्या दिवशी परिमल इंडस्ट्रीजवळ दिसली होती. वर्षभर चौकशी करूनही जे कळालं नाहि ते रचनाच्या डायरीमुळं लक्षात आलं आणि याचे धन्यवाद तिला द्यायलाच हवेत "
जॉनने एक अर्थपूर्ण पॉझ घेतला. डोनाल्डला ते असह्य झालं. हातानेच पुढे कंटिन्यू कर अशी खूण त्याने केली.
" एयरपोर्ट रोडला मंडेला सरांच्या सुरक्षिततेसाठी चौकी उभारण्यात आली होती. सुदैवाने या लोकांचे नंबर टिपून घेण्यात आले. आणखी एक नंबर एका कारचा होता जी शहांच्या या युनिटची आहे. त्यावेळी हे युनिट अर्थातच दुसरीकडे होतं "
" कंपनीच्या सिक्युरिटीच्या रेकॉर्डसप्रमाणे कार नम्रता आणि मायकेल वापरत होते ! "
" म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे नम्रता, मायकेल आणि त्या दोन चार जणांचा परिमल इंडस्ट्रीतल्या त्या स्फोटात हात होता जो रचनाने पाहिला आणि म्हणून त्यांनीच तिच्यावर.. ते ब्लॅक मॅजीक वगैरे... केलं असंच ना ?"
" नाही सर ! रचनावर हिप्नॉटिझम केलं गेलं ते शहासरांच्या संमतीने. तिच्या मेमरीतला तो भाग काढून टाकण्यासाठी "
" मग तिच्या जिवावर कोण उठलंय ? किंवा तिच्याकरवी कुणाला धोका आहे अजून ? कोण आहे यामागे "
" सर ती मिसिंग लिंक आहे या प्रकरणात..."
" एनी वे ! मला अजिबात रस नाही त्यात "

डोनाल्डने दोन्ही हाताची बोटं एकमेकांत गुंफून चाळा सुरू केला. तो विचारात पडला म्हणजे असं करीत असे.

" प्रोफेसर ! माझी मदत करा. हे ब्लॅक मॅजीक वगैरे सगळं वगळून शास्त्रीय भाषेत मला समजेल असं सांगा "
" शास्त्रीय म्हणजे काय डोनाल्ड "
" ते तुम्हीच सांगायचं ना ! नाहीतर मी कशाला पोलिसात भरती झालो असतो ?"
" हं ! "
प्रोफेसरांनी पुन्हा एकदा पॅरासायकॉलॉजी हे शास्त्र समजावून सांगितलं. त्यांना थांबवत डोनाल्ड म्हणाला..
" प्रोफेसर हे सगळं रेकॉर्ड होतंय बरं का "

प्रोफेसर मान हलवत चालेल म्हणाले. खरं तर अहवाल बनवायचा म्हणून रेकॉर्डिंग चालू होतं. यातला बराचसा भाग गाळायचा विचार डोनाल्ड करत होता. ज्याचे पुरावे शोधता येतील तितकाच भाग तो ठेवणार होता. आतापर्यंत तपास तर समाधानकारक होता पण त्यात आलेल्या चमत्कारिक गोष्टींनी तो अस्वस्थ झालेला होता.

" रचनाचं बालपण आपण पाहीलं. पुढे उद्भवणा-या मानसिक आजारांसाठी आदर्श परिस्थिती आहे त्यात. आई गेली तो आघात, बाबांनी लग्न केलं हा दुसरा आघात. तिने तिच्यासाठी आई उभी केली. लहान मूल स्वतःशीच गप्पा मारताना दिसतं. खरं तर ते स्वतःला एक्सप्रेस करत असतं. त्याला कळालेलं ते एका काल्पनिक मित्राला सांगत असतं. अशी मुलं हुषार असतात. आम्ही याला इमॅजिनरी फ्रेंड (disambiguation ) म्हणतो. यात काळजी करण्यासारखं काहीच नसतं उलट मुलाची मानसिक वाढ होण्यासाठी ते चांगलंच असतं. पुढे ही फेज निघून जाते. मुलं ते विसरतात.

पण रचनासारख्या मुलांना ते नको असतं. रचनाने तिच्या आईला तिच्या विश्वात बोलावून घेतलं होतं. ती तिच्याशी गप्पा मारत असे. ही Scizophrenia ची सुरूवातीची लक्षणं म्हणता येतील. delusiona, hallucination अशी लक्षणं मात्र इतर रूग्णांसारखी गंभीर स्थिती नाही. त्यांना नसलेल्या गोष्टी दिसू शकतात. पुढे तिची रवानगी बोर्डिंग स्कूलमधे झाल्यावर तिने नंदिनीला आपल्यासोबत नेलं. नंदिनी तिची बेस्ट फ्रेंड असू शकते. रचनाचे वडील तिच्याशी क्रूरपणे वागलेले दिसतात. मुलांचं भावविश्व वगैरे त्यांच्या गावीही नव्हतं.

ज्याला आम्ही मल्टी पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतो त्यामधे ब्यक्ती स्वतःच त्या भूमिकेत जातो. तसं इथं घडत नव्हतं . म्हणजेच ही Paranoid Scizophrenia किंवा Undifferenciated Scizophrenia पैकी एक केस असावी असं वाटतं. या दोन्ही केस मधे काल्पनिक आवाज ऐकू येणं किंवा भास होणं हे घडतं. राहुलचा वावर काय किंवा नंदिनीचा वावर काय काल्पनिकच . हे अर्थातच रचनाच्या नाँदी, जॉनचा तपास यावरून म्हणतोय. पण रचनाच्या मेंदूमधे हे काल्पनिक जग ख-या जगाला सांगायचं नाही असं काहीतरी सांगनारी यंत्रणा तिने निर्माण केली होती. नंदिनी आणि राहुल इतरांना कधीच दिसले नाहीत. तसंच सिंग सरांचं बाळही. त्यांचं बाळच आता त्याला बाळ व्हायच्या वयाचं झालंय. तिचा एकटेपणा, या वयातल्या तिच्या आकांक्षा अशा समोर येत असताना तिला ते समजत नव्हतं. दुर्दैवाने आता ती या लक्षणांच्या पुढे गेलेली आहे.

इथून पुढे कदाचित तिला आपल्याला हलता येत नाही असं वाटू शकेल. जग याला तिच्यावर चेटूक झालंय असंही म्हणू शकेल. डोनाल्ड, दुर्दैवाने संमोहनासारख्या कला बेजबाबदार लोकांना चटकन अवगत होतात आणि ज्याला हवं त्याला प्रयत्नपूर्वकही ते साध्य होत नाहीत. याचं कारण विश्वास ! या शास्त्रावरचा विश्वास जितका ब्लॅक मॅजिकवाल्यांचा आहे तितका वैज्ञानिक जगतात नाही. अणुबाँब बनवायचं शास्त्र आहे ना तसंच आहे हे. कुणाच्या हाती ते लागतं त्यावर सगळं आहे.

रचनाची बालपणीची केस हिस्ट्री पाहिली तर तिच्यावर संमोहनाचे प्रयोग करायला नको होते. अर्थात ज्यांना ते करायचं होतं त्यांचे हेतू पाहता त्यांनी तिला जिवंत सोडलं हेच खूप ! "

डोनाल्ड ऐकत होता. प्रोफेसर थांबले हे पाहून त्याने विचारलं

"प्रोफेसर थँक्स या मदतीबद्दल..
आता एकच प्रश्न .. त्या गूढ मृत्यूंचं काय ?"

" ते रचनाने केलेत असं म्हणता येत नाही सर !"
" जॉन , प्रोफेसरांना बोलू दे "
" जॉन म्हणतो ते खरंच आहे. रचना त्यांना भेटली हे ही खरं आहे. हा योगायोग नाही का ? कदाचित त्यांना त्या घटनेबद्दल मन खात असावं जे रचना भेटल्यामुळे उफाळून वर आलं असणार. कदाचित रचना काही म्हणालीही असेल.. पण तिने खून केला असं म्हणता येत नाही. आपण त्या घटनेचे साक्षीदार होतो याबद्दल तिचं मन खात असावं. हिप्नोसिस नंतरही त्या व्यक्ती समोर आल्याने तिच्या स्मृती जागृत होत असाव्यात.. खरं तर त्या लोकांचे मृत्यू हा योगायोगच ! "
" हे झालं डोनाल्ड तुमच्या कायद्यासाठी. पण पॅरासायकॉलॉजी टेलिपथी वर विश्वास ठेवते आणि सिद्धही करू शकते. या लोकांच्या मृत्यूचा आणि टेलिपथीचा जवळचा संबंध असावा. त्या जबरदस्त स्फोटाने या सर्वांमधे कनेक्शन स्थापित झालेलं असावं. गॉड नोज ! "

पाणी प्यायला प्रोफेसर थांबले... शांतता ! पिनड्रॉप सायलेन्स निर्माण झाला होता.

" डोनाल्ड ! जे विवेचन मी केलं त्याचा आपण शास्त्रीय पद्धतीने तपास करू शकतो. आणि रचना बरी झाल्यावर काही प्रश्नांची उत्तरं मिळतीलही. ज्यांची मिळणार नाहीत ती सोडून देऊ .. पण अगदीच काही वाईट परिस्थिती नाही आपल्यासाठी, नाही का !"

" प्रोफेसर ! मी कसे आभार मानू तेच मला कळत नाही. मला कसा अहवाल द्यावा हेच समजत नव्हतं. आता तपास बंद केला तरी चालेल. फक्त पुरावे गोळा करायचेत , नाही का जॉन?"
" सर !"

त्यानंतर चहापानी होऊन मीटिंग संपली.

बाहेर पडताना प्रोफेसर जॉनला विचारत होते, " जॉन संपलं सगळं ?"
"तपास चालू आहे." हसत जॉन म्हणाला.
" म्हणजे ?"
"काल सांगितलेलं विसरलात ? "

प्रोफेसर व्हॅटमोर आश्चर्य करीत गाडी स्टार्ट करत असताना जॉन आणि संदीपा गाडीत बसत होते.

-------------------------------------------------------------------

ओल्ड कॅसलच्या भागात शांतता नांदत असली तरी संदीपाच्या मनात अशांतता खदखदत होती.

जॉनला त्याची कल्पना आलीच होती. आता जास्त ताणून धरायला नको म्हणून त्याने गन होल्स्टरमधे सारत गाडी सुरू केली.

" संदीपा.. सांग बरं मिसिंग लिंक कुठली या केस मधली ?"
" नाही सांगता येत "
जॉन हसला.
" मि. व्होरा ! देशोधडीला लागले बिचारे. नंतर त्यांचं काय झालं कुठे गेले काहीच ट्रेस होईना. भारतीय माणूस कुठे लपणार ?"
" व्होरांचा मात्र ट्रेस लागेना. ते केप ताऊनमधे पण नव्हते. आणि अचानक ते इथं उगवले. अर्थात त्या वेळी मला वास लागला नाही. माझ्या खब-यांचं अपयश ! खरं तर तेव्हां व्होरा इतके महत्वाचे पण वाटले नव्हते. एक उपचार म्हणून मी शोध घेत होतो. पण जेव्हां व्हुडूचं ऐकलं तेव्हां त्यामागे कोण असू शकतं ?
" व्होरा ?"
" हा हा हा ! व्होरा नक्कीच, त्याबरोबरच शहा, नम्रता आणि मायकेल हे पण ! "
" हळू हळू शहांबद्दलचा संशय फिटला. नम्रता वर मात्र अजूनही संशय आहे. मायकेल देखील रचनाच्या वाईटावर असेल असं वाटत नाही "

" ज्यावेळी स्फोट झाला त्या वेळी रचना गाडी पार्क करत होती आणि तिला धक्का मारून पोरगेलेसा भारतीय तरूण गेला. नाही का ? त्याच्यामागे काही जण धावले तेव्हां ती काय ओरडली ?"
" त्याला वाचवा असं.."
" म्हणजे त्याचा जीव धोक्यात आहे हे त्याक्षणी तिला माहीत होतं. त्या तरूणाला गाडीत टाकताना गॅरेजवाल्याने पाहीलं होतं. ओल्ड कॅसल भागात त्याचा खून झाला आणि बॉडी तिथंच पुरण्यात आली. मी नंतर येऊन गेलो पण बॉडी सापडली नाही. एका ठिकाणी कबरीसारखा खड्डा सापडला, पण उकरलेला !
संदीपा, मी खूप शोध घेतला विमानप्रवाशांचा. आणि एके दिवशी रस्त्याने नायजेरियाहून एक जण द आफ्रिकेत आल्याची नोंद सापडली. हौस ! "
" त्याचंच नाव राहुल ! राहुल व्होरा. व्होरांचा एकुलता एक मुलगा. केप टाउनला तो आला तो सरप्राईज देण्यासाठी. म्हणूनच त्याच्याबद्दल कुणाला माहीती नव्हतं. मेहतांच्या समोसा स्टॉलसमोर एक दिवस समोसा घेत असताना त्याला रचना भेटली. रचना आणि तो दोघेही पाचगणीच्या शाळेत एकत्र असल्याने त्यांची मैत्री जमली. रचनाने त्याला गेस्ट हाऊसवर ठेवून घेतलं आणि मग एक दिवस दोघेही त्याच्या वडिलांना भेटायला म्हणून गेले नेमका त्याच दिवशी तो स्फोट झाला "

" ओह ! माय गॉड "

" व्होरांच्या दृष्टीने शहांनी स्फोट घडवून आणला आणि रचनाने त्यांच्या मुलाला तिथं आणून मारलं असाच अर्थ निघत होता. त्यांना कुठेच मदत मिळाली नाही. मि. सिंगांनी तर त्यांच्या परिस्थितीचा खूप फायदा घेतला. सिंगांना कमिशन मिळायचं होतं "

" हताश अवस्थेत व्होरा परागंदा झाले. जेव्हां आले तेव्हा एका व्हुडू टोळीच्या संपर्कात राहीले. आता सुड घेणं हे एकच ध्येय त्यांच असणार. या घरात त्यांना पाहीलं गेलं. पण आता त्यांनी ते सोडलंय असं दिसतं "

" नम्रताच्या बाबतीत तिने शहांच्या सांगण्याच्या बाहेर जाऊन आत कामगार असताना स्फोट घडवला आणि हत्याही घडवून आणली. शहांना हे नको होतं. त्यातच रचना साक्षीदार झाल्याने तिचा धीर खचला. राहुल हा व्होरा आहे हे कुणालाच कळालं नाही. रचनावर हिप्नोसिस केल्यावर तिने चेटूक केलं नसेल कशावरून ? आणि जेव्हां कटातल्या साथीदारांचे खून झाले तेव्हा ती अस्वस्थ झाल्याचं दिसून आलं "

" नम्रता असं वागू शकेल ?"

"आ नाही ? जी माझ्या नावावर कंपनीकडून पैसे उकळू शकते ती काहीही करू शकते " जॉन बोलून गेला खरा आणि त्याने जीभ चावली.
संदीपाने डोळे गरागरा फिरवत जॉनला हात लावून विचारलं " तुझ्या नावावर ?" आणि ती खळाळून हसली.
" बघ, व्होरा, सिंग, रचना, शहा या लोकांच्या नादात जे कृष्णवर्णिय लोक मेले त्यांची आहे का कुणाला फिकीर ?"
" हं ! काय करणार ?"
" हेच तर ना, ते मेले तर मेले. सिंगसाहेब गेल कि आम्हीच पळायचं "
संदीपा विषय बदलत म्हणाली

" रचना कुठे गेली असेल ?"
" काळजी करू नकोस, मला वाटतं मला माहीत आहे ते. गाडीला वेग देत जॉन म्हणाला "

-------------------------------------------------------

प्रोफेसर काळजीने आल्या पावली बाहेर पडले. रचना नाहीशी झाल्यानं त्यांना खूप धक्का बसला होता. जॉनला फोन केले तर तो ड्रायव्हिंग करत असल्याने उचलत नव्हता. नंतर त्याचाच फोन आला आणि त्यांनी हवालदिल होत रचना नसल्याचं सांगितलं.

केप टाऊन मधे कुठं शोधायचं तिला ? लहान का शहर होतं ते ?

गाडी घेऊन तिच्या सर्व ठिकाणांवर ते पाहून आले आणि अचानक

ढोल वाजायचा आवाज. त्या दिशेने त्यांनी गाडी वळवली. या दिशेने येत होता ढोलाचा आवाज, तीव्रता वाढत चालली होती.

ढम ढम ढम

आता कानठळ्या बसेल असा आवाज येत होता. पण कुठंही मोर्चा, मिरवणूक दिसत नव्हती किंवा ढोल वाजवणारा नव्हता.

मग त्यांच्या लक्षात आलं कि ढोल तर त्यांच्या डोक्यात वाजतोय. इथंच तीव्रता जास्त आहे. आणि

रचना !!

हिस्टेरिया झाल्यासारक्खी ती चालली होती. चावी दिलेल्या बाहुलीसारखी !
त्यांच्या हाका तिच्यापर्यंत पोहोचत नसाव्यात. ते किती जवळ होते. पण तिला आवाज जात नसावा. आणि मागून ल्युसी धावत येताना दिसली. प्रोफेसरांना पाहून ती थबकली. एकच क्षण ..

आणि मग पोरीच्या जिवाला धोका आहे असं तिने ओरडून सांगितलं. प्रोफेसरांना काय करावं ते कळेना. अशा आणिबाणीच्या प्रसंगांची त्यांना सवय नव्हती. ते गाडीत बसून राहीले आणि हॉर्न वाजला.
दमून त्यांनी डोकं हॉर्नवर ठेवलं होतं. हॉर्न वाजत राहीला. त्यांच्या कानात तो आवाज शिरत राहीला.

---------------------------------------

तिच्या डोक्यात असह्य कलकल सुरू झाली आणि पाठोपाठ ढोल वाजायचा आवाज. त्यानंतर ती उठून उभी राहिली. आता ढोलाच्या आवाजाशिवाय तिला काहीही ऐकू येत नव्हतं. ती चालत होती.

नम्रता !!

नम्रताचं घर ! सेंट जॉर्ज परिसरात ती आली. कुणीतरी हाका मारत होतं खूप लांबून. आवाज ओळखीचा वाटत होता. मागे फिरावंसं वाटत होतं. पण ढोलाचे लयबद्ध आवाज आणि मागे न फिरण्याचा इशारा. कुणीच बोललं नाही मात्र मागे फिरायचं नाही हे समजलं होतं.

ती बिल्डींगचा जिना चढून वर आली. दार वाजवलं तेव्हां नम्रतानेच उघडलं. समोर रचनाला या अवतारात पाहून ती प्रचंड घाबरली.

" नम्रता तुला मरायचंय ना ?"

" नाही !"

"तुला मरावं लागेल नम्रता. किती जीव घेतलेस तू !"

आणि अचानक एक प्रचंड हॉर्नसारखा आवाज !!
कर्कश्श ! तीव्रता वाढत जाणारा. ढोलाच्या आवाजांची लय बिघडवणारा. हा सतत येत होता. तिची तंद्री भंगली आणि....

सगळं असह्य होऊन ती कोसळली.

.........................................................................

" रचना कसं वाटतंय आता ?"
प्रोफेसर व्हॅट्मोअर तिच्या केसातून हात फिरवत तिला विचारत होते.
डोक्यातला कोलाहल थांबला होता. काल काय झालं हे तर्काच्या कसोटीवर नंतर घासून पाहता येणार होतं.

गरमागरम सूपाने तिला तरतरी आल्यासारखी दिसली. डोळ्यात ओळख आली होती. शारीरीक दृष्ट्या ती बरी व्हायला वेळ लागणार होता. मग तिच्यावर मानसोपचार करता येणार होते. अर्थात गरज पडलीच तर.. गरज पडणार नाही. त्यांना एक विश्वास होता.
सकाळीच संदीपा आली. रात्रभर तिलाही झोप नव्हती. काल रात्री जॉन आणि संदीपा नम्रताच्या घरीच निघाले होते . जॉनचा अंदाज अगदी खरा ठरला . खालीच ल्युसी स्वतःचा देह सावरत धावत येत होती.

"जॉन तिला वाचव..... "
" ती वर गेली ? "
" हो ! "
" तू रोखलं नाहीस ?"
" अरे मी मागं होते खूप. आधी बघ काय झालंय ते "
" आपल्याला उशीर झालाय बहुतेक.."

आणि त्यांना नम्रता खाली आलेली दिसली. तिच्या खांद्यावर रचना डोकं ठेवून चालत होती.
संदीपाने रचनाला मदत करत गाडीत घातलं आणि ते प्रोफेसरांना शोधू लागले. एका ठिकाणी हॉर्न वाजत होता म्हणून जॉनने आत डोकं घातलं तर प्रोफेसर तिथंच झोपलेले.

"असं झालं तर रात्री ! "
प्रोफेसर हसत म्हणाले.

" जॉन अरे ही सगळ्यातून बाहेर पडलीये आता "
" बाय प्रोफेसर !"
" बाय "

" हिला महिनाभर पूर्ण विश्रांती घेऊ द्या. लगेच प्रश्न नको संदीपा "
संदीपाच्या साथीने रचना लवकरच खडखडीत बरी झाली.

....................................................................................

जॉन रोज बघायला येऊन जात होता. ल्युसी देखील अधून मधून येतच होती. फ्ली मार्केट उठून जाताना जॉन ल्युसीकडे आला.

"ल्युसी काय वाटतं ?"
"त्या दिवशी उशीर केलास तू "
"तू गहाळ राहिलीस. ती पूर्ण बरी होईल ?"
"तसं दिसतंय. नाही का ?"
" आणि तिची गेलेली मेमरी ?"
" येऊ पण शकते "
" येईल कि नाही ते सांग "
" नाही तसं सांगता येत "
" काहीही असो. पुन्हा काहीही होउ शकतं. नाही का ? आपण सावध असलेलंच बरं !"
" हं "

जॉन मग तिथंच बसून राहीला. ल्युसीही कंटाळून निघून गेली. जॉन उगीचच स्टेडीयमच्या मागे रेंगाळत राहीला. रचनाच्या केसने त्याचा पिट्टा पडला होता.

कसली तरी जाणिव झाली म्हणून त्याने चाहूल घेतली तर..

दि:कालातून आला, तो दि:कालातून आला
मृत्यूचे हे सत्य जगाचे, भविष्य घेऊन आला
अरे मानवा झुकेल आता त्याच्यापुढे हे शीश
ऐकशील ना आता आपुली मरणाची तारीख

एका भयाण सुरावटीसह हे बोल त्याच्या कानी पडले तसा तो सावध झाला. स्त्री चा आवाज !

रचना ......!!!

" रचना तू ? इथं काय करतेस "
" तुला चांगलंच माहीतेय ते जॉन ! "
" काय म्हणायचंय तुला ?"
" जॉन नम्रताला मारायला तूच पाठवलंस ना ? आता तुझी पाळी "
" थांब थांब ! मी काही केलेलं नाही.. नम्रता "

" जॉन तूच तर होतास ना रे तिथं ? ते चार जण तर वाचवायला धावलेले. सगळं सगळं तूच घडवलंस जॉन. का केलंस हे ? का मारलस माझ्या राहुलला ? "

आता जॉनला विश्वास आला होता. त्याच्या डोळ्यात चमक आली.

" आता तू काय करणार ? सगळं ल्युसीच तर घडवत होती, माझ्या सांगण्यावरून. बाहेरून आलेले लोक तुम्ही. आमचे डायमंडस घेऊन जाता, सोनं घेऊन जाता आणि आम्हाला मात्र त्या वस्तीत रहावं लागतं. माझी माणसं मेली तर त्याचं तुम्हाला दु:खं नाही. किड्यासारखं रगडले जातो आम्ही आमच्याच देशात "

त्याच्या शब्दाशब्दात कडवटपणा भरलेला होता.
द्वेष ! हेवा ! मत्सर आणि सूड...

शहां आणि व्होरा यांच्यातल्या स्पर्धेचा जॉनने उपयोग करून घेताना आधी शहांकडून पैसे घेऊन व्होरांना बरबाद केलं. परिस्थितीही त्याला अनुकूलच होती. मात्र स्फोटात कृष्णवर्णिय लोक ठार झाले आणि जॉनचं डोकं फिरलं. दोन्हीकडून पैसे उकळताना आपणही त्यांच्या मृत्यूला जबाबदार आहोत असं त्याला कधीच वाटलं नाही. द्वेषाने तो अंध झाला होता. आणि आता व्होरांवर संशय जाईल अशा पद्धतीने तपासाला दिशा देत होता. कृष्णवर्णीयांच्या एका कडव्या संघटनेचा तो एक कडवा कार्यकर्ता होता.

आणि आता ही वेडपट मुलगी स्वतःहून समोर आली होती. त्या दिवशी नम्रताला मारून हिला अडकवण्याचा त्याचा विचार होता. रचना अडकली कि थेट शहांना हात लावता येत होता. सगळं कसं व्यवस्थित चाललेलं पण प्रोफेसरांचा हॉर्न !!! त्या हॉर्नने ढोलाची लय बिघडवली. प्रोफेसर आणि रचना यांच्यामधली टेलिपथी ....

सगळी गडबड झाली. हाक मारून त्याने ल्युसीचं लक्ष वेधलं. हळू हळू जाणारी ल्युसी पुन्हा माघारी वळली.

" रचना ! आता कोण वाचवणार तुला ?"
" जो नेहमीच वाचवत आला .. ज्याने तुमच्या प्रत्येक खूनात मला सहभागी होण्यापासून रोखलं .. जे सगळे खून तुम्हीच केले "
" सगळं कळलंय तर तुला "
" काय दाखवत होता तुम्ही त्यांना "
" येऊ दे ल्युसीला ... बघायचंय ना ?"

" जॉन तुझ्या मरणाची तारीख आजच आहे.. ल्युसीसोबत "
जॉन हसू लागला. "ल्युसीला तर येऊ दे "

" ये ल्युसी !"

आणि ल्युसी पुन्हा माघारी जाण्यासाठी वळली..... कारण

रचनाच्या मागून सावकाश एक आकृती आकार घेत होती. जॉन डोळे विस्फारून पाहत राहीला..
आणि सावकाश त्याच्या डोळ्यात ओळख उमटली

पोरगेलासा तरूण

राहुल त्याच्या समोर उभा होता. एक डोळा बाहेर आलेला. छातीत सुरा खुपसलेला... जॉनचाच तर होता तो

शेवटची जाणीव तीच होती !

समाप्त

गुलमोहर: 

जोर का झटका हाय जोरोंसे लगा Proud जॉन गुन्हेगार असणे हा अनपेक्षित शेवट आवडला. somehow वाचताना एक प्रकारचं pressure जाणवत होतं आणि हो रविवारीच कथा पूर्ण केल्याबद्दल धन्स! Happy पुलेशु!

रच्याकने, << " जॉन तूच तर होतास ना रे तिथं ? ते चार जण तर वाचवायला धावलेले. सगळं सगळं तूच घडवलंस जॉन. का केलंस हे ? का मारलस माझ्या राहुलला ? " >> ते चार जण वाचवायला का धावले होते हे कळलं नाही. Uhoh

बापरे बरीच कॉप्लिकेशन्स होती. छान होती. मध्येच काही संदर्भ धूसर वाटले. पण मजा आली.

इतकी कॉम्प्लिकेटेड कथा लिहिण्याचं कसब मात्र मानायलाच हवं. धन्यवाद मैत्रेयी. Happy

पहिल्या भागापासून दिलेल्या प्रोप्त्साहनाबद्दल आणि सांभाळून घेतल्याबद्दल मनापासून आभार.

@ चिमेध

जॉनचा प्रयत्न हा केस कॉम्प्लिकेटेड करण्याचा असायला हवा. चार जणांकडून स्फोट घडवून आणाताना अपघाताने त्यात काही लोक ठार झाले असतील कदाचित. पण जेव्हां जॉन त्या मुलाच्या खूनासाठी धावला असावा तेव्हा रचनाच्या ओरडण्याने ते जॉनच्या मागे धावले असणार... आधीच अनपेक्षितपणे मनुष्यहानी झालेली त्यात खूनाची भर नको असणार..

बरीच गुंतागुंत होती. कथा छान वळण घेत होती.
कलाटणीही आवडली.. पण अगदी प्रामाणिक सांगायचं तर शेवट थोडासा विस्कळीत वाटला.
जॉन आणि ल्युसी एकमेकांना सामिल असणं आणि त्यांचाच हा कट असणं हे जरी शेवटी समजलं असलं तरी.. राहुल तिथे कसा आला? तो भास आहे की खरंच तो आलाय? खरंच आलाय तर कथा भयकथा आणि गूढ कथा यामध्ये कुठेतरी अडकतेय... मग वरती जे काही मानशास्त्राचे दाखले आणि लेक्चर दिलंय त्याला काहीच अर्थ उरत नाही. आणि जर तो जॉन ला भास झाला असेल तरी त्याला बेस नाहीये काही.

किंवा... मला पुन्हा एकदा सगळी कथा वाचावी लागेल.

पहिल्या भागापासून दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
प्राजु - प्रांजळ मत आवडले. कादंबरी मधे रूपांतर करताना निश्चित इथल्या मतांचा मला उपयोग होणार आहे. (मानसशास्त्र या विषयातील जाणकारांचे अभिप्राय आणि अधिक मार्गदर्शन मिळावे ) Happy

मैत्रेयी, कथाबीज उत्तम. वळणे सुद्धा छान. सादरीकरणात थोडा गोंधळ झालाय असं मला वाटते. कारण वाचताना डायरीतली पाने, वास्तवातल्या गोष्टी आणि काळांची सरमिसळ यांची मांडणी गोंधळवते. शेवटचा ट्विस्ट कथेच्या एकंदर बाजाला साजेसा नाही. कारण शास्त्राच्या सगळ्या मतांना तिथे छेद जातो. जर राहुल शेवटी त्याचे अस्तित्व दाखवतो तर मग ते आधी का नाही ? जर तो रचनाला सगळ्या गोष्टीत प्रोटेक्ट करतो तर मग तो तिच्या सहाय्याने आधीच सुड का घेत नाही ? वगैरे... Happy

प्राजु | 16 January, 2012 - 10:46 नवीन
बरीच गुंतागुंत होती. कथा छान वळण घेत होती.
कलाटणीही आवडली.. पण अगदी प्रामाणिक सांगायचं तर शेवट थोडासा विस्कळीत वाटला.
जॉन आणि ल्युसी एकमेकांना सामिल असणं आणि त्यांचाच हा कट असणं हे जरी शेवटी समजलं असलं तरी.. राहुल तिथे कसा आला? तो भास आहे की खरंच तो आलाय? खरंच आलाय तर कथा भयकथा आणि गूढ कथा यामध्ये कुठेतरी अडकतेय...

......

मैत्रेयी, प्राजुचा मुद्दा बरोबर आहे, पण तुला इथे पोस्ट कॉमेन्ट्स लिहायला वाव आहे. चेटुक पुर्ण झाले असताना ल्युसीकडे रचनाला पुन्हा पाठवायची काय गरज? याचे विवेचन असे होउ शकते की प्रोफेसरांच्या उपचारांमुळे रचना बरी होत असावी आणि याच वेळी व्होरांनी केलेल्या व्हूडू मुळे जॉन आणि ल्युसींचे व्हूडू उलटुन (यात मानसशास्त्रिय भाग असा की जॉन व ल्युसींचा या गोष्टींवर विश्वास आहे त्यात गिल्ट मुळे त्यांचे मन कमकुवत असणारच अशात कोणतरी रचना तर्फे प्रतिघात करतो आहे हे राहुलच्या त्यांच्या मनातील जन्माचे कारण असु शकते.) त्यांचा म्रुत्यु झाला.

गोष्ट भन्नाट झाली आहे. कॉम्प्लिकेशन्स पण उत्तम साम्भाळले आहेत.

थँक्स नीलिमा,

कथा वाचल्यावर वाचकाचं जे मतं होईल तेच महत्वाचं.

शंकानिरसनासाठी ही पोस्ट टाकतेय ..
कटाची एखाद्या हुषार अधिका-याने सगळ्या बाजूने चौकशी केली तर "व्होरा" हा मुद्दा कुणी नजरेआड करेल असं वाटत नाही. व्होरा परत आले हा जॉनला कांगावा करण्यासाठी चांगला बेस झाला. त्याने आणि ल्युसीनेच रचनाच्या माध्यमातून लक्षांना काहीतरी करायचा प्रयत्न केला असावा. पण ल्युसीने सांगितल्याप्रमाणे त्यांचे प्रयत्न मधेच छेदले जात होते. त्यासाठीच तिने रचनाला पुन्हा बोलावून घेतलं होतं.

उत्कंठा ठेवण्यासाठी रहस्यकथेचा एक फॉर्म वापरला ज्यात प्रसंग अर्धवट तोडून पुढे फ्लॅशबॅक सारखा सांगण्यात येतो. कदाचित हा फॉर्म कन्फ्युजिंग वाटला असावा असं दिसतंय ज्याचा दोष माझ्याकडे घेतेय. जॉनच्या सहभागाची शक्यता आधीच्या भागातही सूचित केलेली आहे. तसच ज्या वेळी राहुल तिच्या भोवती असायचा त्या वेळी ढोल वाजतात असं वाटणं हे खरं तर ढोल वाजत असतानाच त्याने तिच्या आजूबाजूला राहणं होय. हे तिच्या लक्षात आलं नाही. सगळं आठवल्यावर मात्र तिच्या लक्षात कारस्थान आलं. असो. इथं कौतुकचं मत विचारात घेतेय..

शेवटी शेवटी कथा आटोपती घेतली हा ही दोष माझाच आहे. कारण काही असो.

फार छान गुंतागुंत. मला आवडली. मधे जरा लिंक तुटल्या सारखे वाटत होते... पण तुम्ही अनेक विषयांची सांगड चांगली घातली आहे.

हे तर सीरीयलचे कथानक वाटते. सतीश राजवाड्यांकडे पाठवुन द्या.

Pages