----------------------------------------------------------------------------------------
गटचर्चा = ग्रूप डिस्कशन
गटघटक(गघक) = पार्टीसिपंट्स
------------------------------------------------------------------------------------------
चर्चेचे नियम (गटघटक घटना)
१) प्रत्येक गघकाने आपला मुद्दा एकाच शेरात सांगायचाय . संधी एकदाच मिळेल.
२) शेर स्वत्तःची गुणवैशिष्टे, नाम / तखल्लुस , व्यवसाय,स्वानुभव यास साजेसा असावा.
३) चर्चेअंती अक्खी गझल पूर्ण झालीच पाहिजे
४) माबोवरील काही परमप्रीय गझलकारांस त्यासाठी मुद्दामच गटपास दिले आहेत. तत्पूर्वी गघक क्र .१ ते ५ यांची पूर्वपरवानगी घेतली आहे, नियम १ ते ३ यांचे पालन केले आहे ,तरी गटपासधारक मिळालेल्या पासांचा मोठ्या दिलाने ( ते त्यांच्याकडे आहेच ) स्वीकार करतील अशी खात्रीच आहे मुळी
५) इतराना प्रवेश हवा असल्यास हार्दिक स्वागत , फक्त शीर्षकास अनुरूप असे स्वतःचे काफिये (अप्पान्त) सोबत आणावेत. नियम १ ते ३ आणि ५ काटेकोरपणे पाळणे बंधनकारक.
--------------------------------------------------------------------------------------------
चर्चा सुरू -
(गघक क्र. १= कु नेहमिका रिकामटेकडे )
परवाच संस्कृतीच्या भरवू दुपारगप्पा
ठरवू तिलाच मोहें-जोदरो हडप्पा
(गघक क्र. २= सदा एकलकोंडे )
गेलीय कोणत्याशा किटिपारटीत मम्मी
भलत्याच टूरवरती गेलाय काल पप्पा
(गघक क्र. ३ = कु. कलिका उतावळे :एक स्वानुभव)
ना एकवीस-अठरा ; तारुण्य हाक देई-
-पौगंड 'पाक' होई, तो वेगळाच टप्पा
(गघक क्र. ४ = रडतकुमार राउत)
इथले भविष्य आता विरले अरासपानी
उरले कठोर कोटा तांडूर अन् कडप्पा
(गघक क्र. ५ = कवींद्र कवाडे )
काव्यात गोठवुन घ्या त्या कोवळ्या फुलांना
नाचून घ्या सुरांनो तो भांगडा -हिडिप्पा
गटपासधारक विभाग --------------------------------------------
(गपाधा क्र.१ =बेफिकीर )
माबोस भूषणावह तो कटककर कशाला
मारून घेत आहे 'मी बेफिकीर' ठप्पा
(गपाधा क्र.२ = कणखर )
कणखर उगाच ना त्यां दिनकरसुतास म्हणती
कणखर अशाच गझला करतात हो विदिप्पा
(गपाधा क्र.३ = टोकूरिका )
निःशंक अम्ची टोकू नित साईना ठरावी
इतरेण गुट्ट ज्वाला अन् आश्विनी पुनप्पा
(गपाधा क्र.४= सौ'प्रिया')
बे-नेमके तखल्लुस नाजूक (सॉरी सॉरी -साजूक) से प्रिया ते
काव्यात भेळ ओली गझलेत गोलगप्पा
(भेळ ,गोलगप्पा... तोंडाला पाणी सुटतंय ना ? प्रियातैच्या रचनांचे रसग्रहण करताना आमचं अगदी असंच होतं)
(गपाधा क्र.५ = डॉक. कैलास )
कानात डिंगरी(स्टेथेस्कोप) अन् ओठी गझल झुलावी
डॉक्टर तुझा असावा ऐसाच देवबाप्पा
(गपाधा क्र.६ = ह.बा. शिंदे )
फुकटात ना ह. बा. रे गटपास हा तुला रे
दे विठ्ठलास माझ्या ; हृदयात एक कप्पा
( चर्चा समाप्त सामुदाईक अफसोस )
ड्याश्ड्याश अय्यो अप्पा टिम्ब्टिम्ब अय्यो अप्पा
ड्याश्ड्याश अय्योअप्पा टिम्ब्टिम्ब अय्योअप्पा
???????
???????
वैभवराव, एकंदरीत धिंगाणा
वैभवराव,
एकंदरीत धिंगाणा आहे.
फक्त विनोदी लेखनात हलवावात म्हणजे आधिक लोक आस्वाद घेऊ शकतील. 'मराठी गझल' म्हटले की ९७% मायबोलीकर उघडतसुद्धा नाहीत.
काईच्या काई...
काईच्या काई...
सुप्रिया
सुप्रिया
अपेक्षित प्रतिसादांबद्दल आभार
अपेक्षित प्रतिसादांबद्दल आभार .......................
(गघक क्र ६-नवीन= वै. व. कु.)
अपुली व्यथा कुणाला समजोSथवा-नसमजो
घोड्यास दामटावे म्हणतो अडेलहिप्पा
इतुके दिवस जी शांत होती
इतुके दिवस जी शांत होती गुलमोहराच्या पानांआड
आली वै.व. कुंची गज़ल आता कुठं तरी लप्पा
- माझा हातभार.
बाकी गझल मस्तच

विदीपांना अनुमोदन.
(गघक क्र ७ -नवीन= @मितवा)
(गघक क्र ७ -नवीन= @मितवा)
गुलमोहरात नाही कुठलाहि चोरकप्पा
हुडकून काढू आम्ही मितवा कुठेहि लप्पा
@मितवा गझल एकाच वृत्तात असावी अशी गझल तंत्रकारांनी आम्हाला तंबी दिली आहे म्हणून ही सुधारणा
चला तुमच्या कृपेने मतला-ए-सानी तयार झालाय धन्यवाद
भन्नाट,
भन्नाट,
(गघक क्र.८नवीन=
(गघक क्र.८नवीन= विभाग्रज)
खेळून येथ खो-खो दमलेत गडी सारे
नवख्या विभाग्रजा घे पाठीत एक धुप्पा
असा कोणता लपंडाव खेळला
असा कोणता लपंडाव खेळला सखीने
निजलो शोधून आता ,अन प्रेतास देई धप्पा
पहिलाच प्रयत्न आहे. प्रतिसाद द्या
फुकटात ना ह. बा. रे गटपास हा
फुकटात ना ह. बा. रे गटपास हा तुला रे
दे विठ्ठलास माझ्या ; हृदयात एक कप्पा
ह्रदयात विठ्ठलाला कोंबून पाहिले मी
आला अभंग ओठी की ; अब्बा जब्बा डब्बा!
जबरी! अप्पा, गप्पा, टप्पा इ.
जबरी!
अप्पा, गप्पा, टप्पा इ. शी यमक जुळवणारा माझा एक शेर -
सोनार, शिंपी, कुलकर्णी अप्पा
यांची संगत नको रे बाप्पा
भारतीय फलंदाजांची देवाकडे
भारतीय फलंदाजांची देवाकडे प्रार्थना -
मागतो हात जोडूनि, हे चि एक बाप्पा
बॅटीच्या मधोमध येऊ देरे, चेंडूचा टप्पा
मास्तुरे, तुमच्या दोन्ही
मास्तुरे, तुमच्या दोन्ही मतल्यात अलामत भंगली
अलामत सलामत न राहता भंगली तर
अलामत सलामत न राहता भंगली तर भंगली. काय फरक पडतो! 'प्पा'चं यमक तर जुळलं ना!!
अशीच माणसे गझलेत येतात आणि
अशीच माणसे गझलेत येतात आणि सेहवाग, धोनी, विठ्ठल अन भट असा वाद घालतात आणि नुकसानीतच निघालेल्या मराठी गझलचे नुकसान होत राहते यामुळे काही जण व्यथित होतात
पण तुम्ही खोखो हसत आहात.
पण तुम्ही खोखो हसत आहात. व्यथित झाल्यासारखे वाटत नाहीत.
मी कुठे व्यथित झालोय? काही जण
मी कुठे व्यथित झालोय? काही जण म्हणालो मी!
वैभवराव, तेवढं विनोदी लेखनात
वैभवराव, तेवढं विनोदी लेखनात हलवायचं बघा की राव!!
(गघक क्र.९नवीन
(गघक क्र.९नवीन =मास्तुरे)
कविता कशी करावी ना मास्तुरास ठावे
प्रतिसाद देत सुटतो येडा यडीयुरप्पा
ही नको इज्जत अशी काढूस
ही नको इज्जत अशी काढूस आमची
काय म्हणतो ऐक रे तो गझलपप्पा!
का कुचंबुन तू असा जातोस वैभ्या?
देत नाही ही गझल कांदा-उतप्पा
आप, जिगाचाच रस्ता चालतो जो
शेवटी होतोच त्याचा येथ सप्पा
यावरी गांभिर्य येऊ दे कवित्वा
सोगळ्या, भंगार आता आवर गप्पा
अप्रकाशीत कर त्वरे धागा बिचार्या
नाहीतर सारेच हाणतील चप्प चप्पा
(ग घ क क्र१० नवीन =अनाहक) का
(ग घ क क्र१० नवीन =अनाहक)
का तू अनाहका रे रड्वीशी नाहका रे
हास्यास आज माझ्या फुगवून तोंड "हुप्पा"
विदिपा : आता जर हे लिखाण
विदिपा : आता जर हे लिखाण 'विनोदी'त हलवले तर प्रतिसाद जसेच्या तसे राहतील काय ?......मार्गदर्शन करावे
ह.बा. : आपणास गट्पास नको असेल तर तसे कृपया स्पष्ट शब्दात कळवावे ....आम्ही प्रेमापोटी दिला होता;राग-राग करू नका!!
(तो आवडला नसेल तर दुसरा देवू का? ....थोडा वेळ लागेल 'अप्पांत' काफियांची तीव्र टंचाई जाणवतेय...... शिवाय बरेच लोक लाईनीत आहेत....म्हणून म्हणलं. राग नसावा ही नम्र विनंती-आम्ही आपली माणसं.....कृपया आमच्या अंगावर येवून भीती घालू नका ना राव!!).
>>> (गघक क्र.९नवीन
>>> (गघक क्र.९नवीन =मास्तुरे)
कविता कशी करावी ना मास्तुरास ठावे
प्रतिसाद देत सुटतो येडा यडीयुरप्पा
त्या सेहवागला, हाणा दोन
त्या सेहवागला, हाणा दोन लाफ्फा
हवास आम्हा संघात, रॉबिन उथप्पा !
वा मास्तुरे, यमक आणलत
वा मास्तुरे, यमक आणलत
विदिपा : आता जर हे लिखाण
विदिपा : आता जर हे लिखाण 'विनोदी'त हलवले तर प्रतिसाद जसेच्या तसे राहतील काय ?......मार्गदर्शन करावे>>>>
म्हणजे काय? अगदी शंभर टक्के तसेच राहतील, शिवाय नवीन जे प्रतिसाद येतील ना, ते सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे असतील ह्याची खात्री बाळगा.
(No subject)
सुपरहिट्ट धागा आहे.
सुपरहिट्ट धागा आहे.

केलेत शेर सांचे, खाऊन
केलेत शेर सांचे, खाऊन गोलगप्पा
टोकूस ठाव नाही, ही संस्कृती हिडीप्पा
Pages