केक, गिफ़्ट, आणि कॅन्डी

Submitted by pradyumnasantu on 10 January, 2012 - 19:42

अकरा-बारा वर्षांच्या पुढील बालांना थोडी दु:ख सह्नशीलता व अनुकंपा यांचीही ओळख करुन देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणूनच ही कविता रचली आहे. ती येथे योग्य नसल्यास क्षमस्व!

केक, गिफ़्ट, आणि कॆन्डी

लांब दिसणारा तो तारा
म्हणजे म्हणे माझा डॅडी प्यारा
माझ्या डोळ्यात तो आणतो
एक आसू खारा
पण असतील का ते खरेच माझे डॅडी?
आणतील का माझ्या बर्थडेपार्टीला
केक, गिफ़्ट, आणि कॅन्डी?
**
डॅडी बहुतेक विसरला
पण का?
आजपर्यंत माझा बर्थडे त्यांनी कधीच नाही चुकवला
पार्टी संपत आली
तारा तर अजून तिथंच लुकलुकतोय
बहुतेक डॅडींना रजा नाही मिळाली
**
थकून शेवटी डोळे मी मिटले
अचानक माझ्या ओठांवर ओठ कुणाचे टेकले
नक्की नक्की नक्की ते होते माझे डॅडी
मला वाटतच होतं ते नाही विसरले
**
डोळे उघडून पहातो तो वाजले होते बारा
खोलीभर माझ्या नाचत होता वारा
भिंतीवरल्या चित्रातल्या मोराचा पिसारा
अन माझ्या बेडवरती
माझ्या बेडवरती
होता चमचमणारा तारा
**
येस ही वॊज माय डॅडी
येस ही वॊज माय डॅडी
अ‍ॅण्ड ही हॅड ब्रॊट मी
केक, गिफ़्ट, आणि कॅ...न्डी
**
हिरे आसवांचे चमकले
ता-याच्या डोळ्यात
खारट केकचे आले आवंढे
माझ्याही गळ्यात
**
डॅडी म्हणाले
हॅपी बर्थडे माय बॊय
धिस ईज युअर केक, कॅन्डी
आणि इलेक्ट्रॊनिक टॊय
एन्जॊय!!!
एन्जॊय म्हणून तारा
चमकायचा थांबला
झर्र्कन खिडकीतून
दिसेनासा झाला

आईने दिले सकाळी
टॊय आणि केक
असा झाला माझा
बर्थडे सेलिब्रेट,,..
अगदी म्हणजे अगदी म्हणजे अगदीच मजेत!!!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

क्या बात है प्र....तुजी,
आज आपण छोट्यांमधे आलात खेळायाला!
सुंदर बालकाव्य,मनात घालमेल करुन गेलं.

जागा योग्य आहे आणि कवितेबद्दल तर क्या कहे? बाळाच्या डोळ्यातला खारा आसू आमच्या पापणीवर थरथरतोय आणि केकही तोंडात घोळतोय. हॅपी बर्थडे बाळ!

पाषाणभेद, विभाग्रज, एम. कर्णिक, पद्मजा_जो: किती म्हणून आभार मानू! आपल्यामुळे माझ्या टेबलवर तारा चमकतो आहे.

वेगळ्याच प्रकार पण आशय छान मांडलाय .... आवडली कविता.
-----------------------------------------------------------------------
अवांतर.
११-१२ वर्षाचा मुलगा म्हणजे कुमार/किशोर
या वयातलं विश्व वेगळं असतं.
किंवा या वयात विश्वची ओळख व्हायला लागते.

"पप्पा जल्दी आ जाना, सात समुन्दर पारके" ह्या गाण्याची आठवण झाली. थोडावेळ मनाची घालमेल
झाली. कारण मला माझं लहानपण आठवलं.