धमाल!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

dubeyji.jpg

रिक्षा सोडली आणि जानकी कुटीरमधे प्रवेश केला. पृथ्वीच्या गेटमधून आत शिरताना आपोआप नजर उजवीकडे कॅफेतल्या टेबलांवर फिरून आली.

आहेत का?
च्च आता कसे असतील? ते नाहीत म्हणून तर इथे जमलेत सगळे.

अ‍ॅब्सेन्स.. गैरहजेरीनेच जाणवणार आहात का यापुढे?
नो नो डोन्ट वरी.. नो रोतडूगिरी. ओन्ली 'धमाल'

एक रंगमंच, अनेक कलाकार नवशिके ते मान्यवर..
काही कविता, काही नाट्यप्रवेश, काही नाच, काही गाणी.....

सोनालीने म्हणलेली दुबेजींची आवडती कविता 'झाड'..
स्वानंदने गायलेलं 'बावरा मन'.
रत्नाजींनी वाचून दाखवलेला आजोबांनी नातवंडासाठी झाड लावण्याबद्दलचा उतारा...
क्षणात कोंडणारा घसा, डोळ्याला ओल, गालांवरून वाह्यलेलं पाणी..
बट आय अ‍ॅम नॉट क्रायिंग सर!

पहले सांस लो फिर बोलो.
फोकस..
सेन्टेन्स पुरा बोलो,
बाई, पिच अर्धा सूर खाली,
तुम्ही तेव्हा गमतीदार मराठी बोलायचात.
एकही उच्चार चूक नसायचा पण तरी वाक्याचा रिदम वेगळा होता.
ते फार मस्त वाटायचं कानाला.

पूर्वा नरेशचे अप्रतिम आणि सहज सुंदर नृत्य
इप्टा वाल्यांनी तुमच्यासाठी म्हणून सादर केलेली अप्रतिम गाणी...
अधून मधून तुमच्या आठवणी,

तू पुण्यातली कोकणस्थ तुला स्टेजवर रडता येत नसेलच.
काय ओळखलंत!
तुमचा पेन एक्सरसाइझही माझ्यापुढे निष्प्रभ ठरला होता.
पण 'आडा चौताल' मधे मला रडण्यापासूनच सीनची सुरूवात करायला लावलीत.
रडायला शिकवलंत खरं..
तरी मी आत्ता रडत बसणार नाहिये!

'खुदा के लिये.. मत देखना' मधला तुम्हीच तुमच्या 'संभोग से सन्यास तक' मधून कॉपी केलेला सीन,
कुमुद-सुहिताचे 'सुदामा के चावल'
टाळ्यांचा कडकडाट, हसण्याचा धबधबा..

सगळं काही तुमच्या ओढीने. ही कुठली जादू होती तुमच्याकडे?
जो जो तुमच्या संपर्कात आला त्याला श्रीमंत करून सोडलंत. अगदी आयुष्य बदलण्याइतकं श्रीमंत.
हे करताना त्या त्या प्रत्येकावर प्रेम केलंत. शिव्या घालत, समोरच्याचा इगो डिवचत प्रेम केलंत.
अगदी माझ्यासारख्या चिरकुट लोकांपासून पार नसीरजी, अमरिश पुरी यांच्यासारख्यांपर्यंत.

तुम्ही स्वतःच स्वतःची घेतलेली मुलाखत. थँक्स टू सुनिल आणि हिदा.
स्वतःचं डिसेक्शन करून ठेवलं होतंत तुम्ही. 'संगीत नाटक अकादमी' अवॉर्ड मिळालं तेव्हा.

सरतेशेवटी "आयुष्यभरात राहून गेलेल्या झोपेचा कोटा पुरा करत होते दुबेजी गेले तीन महिने, जेणेकरून स्वर्गात गेल्यावर लगेच नाटक करता यावं. ही मस्ट बी मेकिंग 'हेल' आउट देअर!" इति नसीरजी
"येस 'अंधा युग' विथ ओरिजिनल कास्ट!"

व्हॉट अ 'धमाल!!'

--------------------------------------------------------------------------------------------
तळटिपा - १. कोणीही उस्फूर्तपणे स्टेजवर येऊन एकट्याने/ समूहाने ५ मिनिटाचे काहीतरी परफॉर्म करायचे. क्रम ठरवलेला नाही, एकत्रित तालमी बिलमी असं काही नाही. असा दीड दोन तासाचा कार्यक्रम म्हणजे 'धमाल!' दुबेजींची अतिशय आवडती अ‍ॅक्टिव्हिटी होती. हे नावही त्यांनीच दिलेले होते.
२. 'अंधा युग' हे धर्मवीर भारतींचं अतिशय गाजलेलं नाटक. महाभारतावर आधारित आहे.

विषय: 
प्रकार: 

छान

तसं मी खूप रॅण्डम लिहिलंय हे आता वाचलं परत तेव्हा जाणवलं. दुबेजींच्या हाताखाली काम केलेल्या शिकलेल्या आम्हा सगळ्यांना हे सगळं ओळखीचं आहे पण त्यांना न ओळखणार्‍यापर्यंत, न बघितलेल्यांपर्यंत हे कितपत पोचतंय माहित नाही. पण शेअर करावसं वाटलं.

मी दुबेजींशी, त्यांच्या कामाशी फारशी परिचीत नाही त्यामुळे हेलावून वगैरे गेले नाही पण ते एक वेगळं, विशेष व्यक्तिमत्व होतं हे जाणवलं ..

नीधप | 9 January, 2012 - 22:10 नवीन
तसं मी खूप रॅण्डम लिहिलंय हे आता वाचलं परत तेव्हा जाणवलं. दुबेजींच्या हाताखाली काम केलेल्या शिकलेल्या आम्हा सगळ्यांना हे सगळं ओळखीचं आहे पण त्यांना न ओळखणार्‍यापर्यंत, न बघितलेल्यांपर्यंत हे कितपत पोचतंय माहित नाही. पण शेअर करावसं वाटलं.>>>>>

चांगलं झालं शेअर केलंत ते! नाहीतर कळलंच नसतं की हे सगळं असं असतं! मनःपुर्वक अभिनंदन! दुबेंना माझ्या बिचार्‍याकडून श्रद्धांजली!

-'बेफिकीर'!

सशल , अनुमोदन. ह्या आधीही नी कढूनच ऐकलय त्यांच्या विषयी. Happy

बेफिकीर, कृपया कुरपत काढू नका. लिखाण तुम्हाला रँडम वाटलं त्याबद्दल काहीच प्रश्न नाही पण "बिचारे" वगैरे लिहीणं मुद्दाम कुरापत आहे.

बेफिकीर, कृपया कुरपत काढू नका. लिखाण तुम्हाला रँडम वाटलं त्याबद्दल काहीच प्रश्न नाही पण "बिचारे" वगैरे लिहीणं मुद्दाम कुरापत आहे. >>>>

बरोबर आहे वैद्यबुवा! स्वतःलाच काय बिचारे म्हणायचे! जमले की संपादीत करतो. Happy

मी ही सशलशी सहमत. नाव ऐकून माहितेय ह्यापलिकडे बाकी काही ओळख नाही. संदीप कुलकर्णीच्या मुलाखतीत थोडं वाचलं होतं त्यांच्याबद्दल.

"धमाल" श्रद्धांजली रिपोर्ट आवडला. नेहमीची साचेबध्द भाषणं/मृत्यूलेख दुबेजींना खचितच आवडले नसते.

Pages