प्लेअर्स.(A Indian ITALIAN JOB)

Submitted by उदयन. on 8 January, 2012 - 09:02

अब्बास मस्तान यांचा चर्चीत प्लेअर्स बघण्याचा दुखःद योग आज आला... मुळ इंग्रजी चित्रपटावरुन घेतलेला हा चित्रपट .. वेगवान पटकथा, अ‍ॅक्शन , अब्बास मस्तान यांचा फेमस 'ट्विस्ट" यांच्या व्यतिरिक्त काहीच नाही यात.. महाबोअर करणारा भंकस चित्रपट याच्यात समावेश होउ शकतो...

चित्रपट चालु होतो एका चोरी वरुन अभिषेक आणि बिपाशा हे एका हिर्‍याच्या हार याची चोरी अतिसामान्य पणे करतात... त्यानंतर दोघे ६ महिन्यासाठी दुर होतात (नियमाप्रमाने Happy ).. या दरम्यान अभीशेक (हो अभिशेकच) ला त्याचा एक रशियातला चोर मित्र मेल्यावर एक माहीती देतो (जी बाप्याला १ महिन्याने मिळते) रुमानिया देशाचा खजीना रशियात आहे जो रशिया त्याला(रुमानिया) परत ट्रेन मधुन परत देणार आहे..(ही ट्रेन कधी निघनार आहे हे मात्र सांगितले नाही) .हा सोन्याचा खजिना चोरी करण्यासाठी अभिशेक त्याचा गुरु (विनोद खन्ना) जो जेल मधे असतो आणि तिथुन पोलिसांना मदत करत असतो (सदगुरु प्रसन्न) मदत करण्याचे मान्य करतो...त्यासाठी एक ठोकळा बाकी ठोकळे जमवतो ( सिकंदर, बॉबी देओल, ओमी वैद्य, बिपाशा, निल मुकेश) यांच्या मदतीने तो ट्रेन मधुन सोने चोरी करतो,(ज्या ट्रेन ची निघायची तारीख माहीती नसते तिच ट्रेन) ,,तंत्रज्ञान, वेशभुषा, चलाखी व इतर अनेक बाबतीत तल्लख असणाऱ्या जगातल्या काही हुशार चोरांची टोळी एकत्र येते आणि या अगम्य चोरीचा सफाईदार बेत आखला जातो..., प्लान यशस्वी होणारच असतो त्याच वेळेला निल दगा देतो आणि सोने घेउन जातो.. यामधे बॉबी मरतो ( मध्यंतरा आधीच बॉबी मेला हेच काय ते पहिले आणि शेवटचे सुख) आणि जाताना निल विनोद खन्नाला भारतात मारुन टाकतो ..फुल प्रुफ प्लान ( Happy ). ...सुडाने पेटलेला अभिशेक निल चा पत्ता मिळवतो आणि त्याला संपव्ण्याचा प्लान परत एकदा आखतो.. आणि यशस्वी होतो...कसा ते आपण जाउनच बघा..(.मीच एकटा का डोके फोडु )
..........................................................................................................................................
विशिष्टे :- वेगवान पटकथा आणि त्यात टाकलेले ट्विस्ट..

वैतागपणा:- चुकलेली स्टार कास्ट.. सगळेच ठोकळे घेतलेले आहेत.. ते ही एकसे बढकर एक...
अबिशेक (अजुन धुम मधला इस्पेक्टर असल्यासारखीच अ‍ॅक्टिंग करतोय.)
बिपाशा (सेक्सी दिसणे हाच एक अभिनयाचा भाग आहे दुसरे भाग या बाई ला माहितीच नाही)
सोनम ( Charlize Theron ही च्या जागी ही आहे..देवा हे बघण्या आधी माझे कान का नाही फाटले) ही ला अभिनय म्हणजे काय हेच माहीती नाही आहे... प्रेमात पडताना सुध्दा मक्खपणा, बाप मरताना सुध्दा मक्खपणा, एक हेर म्हणुन जाताना सुध्दा तोच चेहर्‍यावर,, त्यात ती छान सुध्दा दिसत नाही Sad )
निल ( खलनायक म्हणुन ठिक आहे ...याच्याच चेहर्‍यावर बरे वाईट काय ते एक्स्प्रेशन्स आहेत..:) पण जे आहेत ते सुध्दा असहनिय आहे.)
बॉबी ( याच्या बद्दल न लिहिलेलेच बरे Happy )
सिकंदर आणि ओमीवैद्य ( एक ठोकळा आणि दुसरा थोडा नरम ठोकळा...थोडाफार विनोद करायची जवाबदारी या दोघांवर आहे..त्यातल्या त्यात जॉनी लिव्हर मधे मधे येतो...तोच काय तो चित्रपटाचा उत्तम अभिनयाचा भाग आहे )
=====================================================================

मुळ कथेची वल्हेवाट लावुन त्यात असे काही अशक्य भाग घुसवण्यात आले आहेत जे डोके मी का घेउन आलो याचा पश्च्याताप करायला लावतात.. एका देशाचा खजाना चोरी ला जातो पण पोलीस त्या देशाचे गुप्तहेर काहीच करत नाहीत.. एक हॅकर अचानक ५०० करोड चा बंगला न्युझिलंड मधे खरेदी करतो कुणालाच काहीच संशय होत नाही..? हे कसे शक्य आहे .......मुर्खपणा एक से एक भरलेला आहे........ एक सोन्याची विट घेउन अभिशेक त्याला हुडकु शकतो...पण पुर्ण देशाचे पोलीस साधा प्रयत्न सुध्दा करताना दाखवले नाहीत Happy जणु काही अभिशेक यालाच काय ती अक्कल आहे Happy
शेवटच्या चोरी मधे सोनम सोन्याच्या १०-१५ विटा अश्याकाही सहजतेने उचलते जसे कापुस उचलत आहे. (तिच्या एकुण वजना एवढी २ विटा आहेत हा भाग वेगळा . Happy )
भरीसभर... सोने घेउन आल्यावर इतक्या जलद गती ने सोन्याची गाडी जॉनी लिव्हर बनवतो बहुदा १५-१६ तासातच ३ गाड्या बनवतो सोन्याचा हा एक जागतिक विक्रम मानला जाईल Happy .काहीही मुर्खपणा दाखवला आहे.......अश्या गतीने गाड्या बनु लागल्यात तर देशात काय जगात ट्रफिक जाम होईल... Happy
चित्रपटात गाणी आहेत.....कोणती आहेत ,का आहेत, कशासाठी आहेत हे माहीती नाही.......त्यामुळे त्याबद्द्ल बोलु नये अशिच आहेत.....
सिनेमाचा सवोर्च्च उत्कृष्ट बिंदू म्हणजे ट्रेनमधल्या सोन्याच्या चोरीचं दृश्य! प्रेक्षकाला पडद्यावर जे सुरू आहे ते अगम्य, शक्यते-बाहेरचं आहे याची जाणीव होत असली, तरी ते साधारण १५-२० मिनिटांचं दृश्य खऱ्या अर्थाने रोमांचकारी झालाय. अप्रतिम तंत्र वापरत अब्बास-मस्तानने चलनी नाणं या दृश्यासाठी पणाला लावलंय....हाच काय तो अप्रतिम आणि सुंदर चित्रिकरण.............

तसा चित्रपट अ‍ॅक्शन आणि वेगवान कथा यासाठी बघण्यायोग्य आहे....याची नोंद घ्यावी

१०० रुपयाच्या आत टिकिट मिळत असेल तर जाउन बघा...जास्त टाकल्यास नंतरच्या परिणामाला कुणालाही जवाबदार धरु नये अन्यथा टिव्हीवर येईलच...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रोमोज बघूनच वाटलंच हा भंगार सिनेमा असणार. तुम्हाला सलाम Happy
ह्याच चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी सोनम ने गाडी ठोकलीये (बॉलिवूड न्युज) अनिल कपूर म्हणे तिला ड्रायविंग येत नाही (अ‍ॅक्टिंग तरी कुठे येतेय? :फिदी)

उदय Rofl मस्त पोस्टमॉर्टेम केलंय रे

अंजली Proud सोनमबद्दल

>>भरीसभर... सोने घेउन आल्यावर इतक्या जलद गती ने सोन्याची गाडी जॉनी लिव्हर बनवतो बहुदा १५-१६ तासातच ३ गाड्या बनवतो सोन्याचा हा एक जागतिक विक्रम मानला जाईल

ह्या हिंदीवाल्या अकलेच्या कांद्यांना काहीच ऑरिजिनल बनवता येत नाही का? सोन्यापासून गाडी/गाडीचे पार्ट्स ही क्लुप्ती जेम्स बाँडच्या Goldfinger मधून ढापली आहे. ह्यांच्या कल्पनाशक्तीची फाटलेली ही अशी अनेक ठिगळं लाऊन शिवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. Angry

मुळ ईटालियन जॉबसुद्धा अत्यर्क वाटतो.L A च्या पोलिसांची वेबसाईट हॅक करणे ,ट्रक पुलाखाली पाडणे ई. प्रसंग खोटे वाटतात. मग हिंदीतल्या भुसनळ्यांचे काय घेऊन बसलात.

येऊकामी +१
अगदी हेच आपण ईंग्रजी सिनेमा मधे छान म्हणुन बघतो..अशक्य वाटले तरिहि. आणि हिंदीमधे आले कि नावे ठेवतो. Happy

येउकामी...ITALIAN JOB मधे 10-13तासात सोन्याच्या गाड्या बनताना नाही दाखवले.. आणि सोने कुठेच हलके असल्यासारखे उचले गेले नाही... Happy

Nasa webside हॅक होते मग L.A Police ची का होउ शकत नाही......

मस्त परिक्षण.

सगळेच ठोकळे घेतलेले आहेत.. ते ही एकसे बढकर एक...

केवळ स्टारकास्ट पाहिल्यामुळेच मी या शिणुमाच्या वाटेला जायचे नाही असे ठरवले होते. आरार आबांनी एकदा (बहुधा रिडालोसच्या वेळी) म्हटले होते कितीही शून्यांची बेरीज केली तरी शेवटी शून्यच येते, ते अब्बास मस्तानला कळायला हवे होते.

असो.

छान परिक्षण केलेय सिनेमाचे. उदय!
टिव्ही लागेल तेव्हां बघू. नाहीतरी 'बॉबी देओल' चे सिनेमे बघणे, त्याचा "बिच्चू" नावाचा सिनेमा बघितल्यानंतर बंदच केले आहेत. Happy

मस्त परीक्षण उदयभाउ..

>>>>>आरार आबांनी एकदा (बहुधा रिडालोसच्या वेळी) म्हटले होते कितीही शून्यांची बेरीज केली तरी शेवटी शून्यच येते, ते अब्बास मस्तानला कळायला हवे होते.>>>>>>>

Biggrin

धन्स उदय्..आमचे वेळ आणि पैसे वाचवले म्हनुन Happy
कसा ते आपण जाउनच बघा..(.मीच एकटा का डोके फोडु )<<< आता आम्ही कशाला जातोय डोके फोडायला Happy

बिपाशा (सेक्सी दिसणे हाच एक अभिनयाचा भाग आहे दुसरे भाग या बाई ला माहितीच नाही)>>>.एवढयासाठी च तिला चित्रपटात घेतली आहे आणि तीने तिची जबाबदारी इमानेइतबारे पार पाड्ली आहे ..:)

d.

जादू >> आठशे कोटींचा हॉलीवुडपट तीस कोटीत बसवून त्यात पुन्हा अर्धाडझन गाणी भरणे असली भुरटेगिरी केल्यावर लोक नावे ठेवणारच.
UDAY>>एक चोर एका रात्रीत l a police,l a railway सगळ्यांची system hack करतो हे जरा अतीच वाटते. बाकी hindi चित्रपट बघणे आम्ही केव्हाच सोडले आहे.

कशाला असले मुवी बनवतात देव जाणे??
स्टार(?) कास्ट पाहुनच बघणार कोण?
त्या अभिषेकला आवरा रे आता. लईच ब्येकार फिल्म करुन राहिला आता.

उदय, ट्रेलर बघून, सिनेमा बघायचा मोह झाला होता खरा.
छान लिहिलय.

स्टारकास्ट म्हणजे सगळे सुशिक्षित बेकार, गटातले आहेत.