शोले मराठीत येतोsssय, 'अरे ए सांबा, कित्ती माणसं होती?'
अमिताभ आणि धर्मेंद्नने अजरामर केलेली जय-वीरूची जोडी, बसंती टांगेवाली झालेली हेमा मालिनी, संजीव कुमारने साकारलेला हात नसलेला ठाकूर आणि राधा झालेली जया बच्चन या सा-या ' चिरंजीव ' भूमिका जशाच्या तशा मराठीत येणार आहेत. फक्त गंमत म्हणजे हा मराठी सिनेमा पूर्णपणे विनोदी असेल.
मधुर भांडारकच्या ' चांदनी बार ' चे सहायक दिग्दर्शक विकी खरात हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. अमिताभ-धर्मेंद्नचा जय-वीरू भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवच्या अभिनयाने पडद्यावर धुमशान घालणार आहेत. तर ' हे हाथ मुझे दे दे ठाकूर ' म्हणणारा गब्बरसिंग मकरंद अनासपुरे पडद्यावर आणणार आहे. सर्वात धमाल म्हणजे हात नसलेला हा ठाकूर साक्षात अशोक सराफ साकारणार आहेत.
आता या अजरामर कलाकृतीची हिंदीत आलेली नक्कल (रा.गो.व. की आग) हा सिनेमा आपण(?) पाहीलाच आहे. आता पुन्हा मराठीत याची नक्कल बनतेय.
>>फक्त गंमत म्हणजे हा मराठी
>>फक्त गंमत म्हणजे हा मराठी सिनेमा पूर्णपणे विनोदी असेल.<<
मकरंद अनासपुरे गब्बरसिंगचा रोल करणार आहे. हे वाचूनच हा सिनेमा विनोदि आहे यात वादच नाही ::हाहा:
जय ( अमिताभ)- भरत जाधव.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
वीरू (धर्मेंद्नचा) - सिद्धार्थ जाधव
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भयंकर!!!
भयंकर!!!![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अन बसंती??
अन बसंती??
बसंती अलका कुबल असतील.
बसंती अलका कुबल असतील.
संजीवकुमार बहुधा सचिन (महागुरू) असावा.
मा प्रा कोण आहे?
बसंती, अमृता खानविलकर असेल,
बसंती, अमृता खानविलकर असेल, मौसी - उषा नाडकर्णी, हेलनच्या - भुमिकेत राखी सावंत का ?
>>संजीवकुमार बहुधा सचिन
>>संजीवकुमार बहुधा सचिन (महागुरू) असावा.<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हात नसलेला हा ठाकूर साक्षात अशोक सराफ साकारणार आहेत.
वेताळ, सचिन स्वतःचीच भुमिका
वेताळ,
सचिन स्वतःचीच भुमिका करणार असेल बहुतेक.. फॉर द ओल्ड टाईम सेक...
संजीवकुमार बहुधा सचिन
संजीवकुमार बहुधा सचिन (महागुरू) असावा.>>>>>
बेफ़ि हा अन्याय आहे हो. सचिन फ़क्त इकबालच्याच रोलमध्ये सुट होतो (असे तोही छातीठोकपणे सांगेल)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सचिन स्वतःचीच भुमिका करणार
सचिन स्वतःचीच भुमिका करणार असेल बहुतेक.. फॉर द ओल्ड टाईम सेक...>>>>>>
तसे असेल तर अनासपुरे त्याला मराठीतील शोलेमध्ये मारणार नाही दिनेशराव, सत्कार करेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कारण सचिन ही मराठीतील आदरणीय व्यक्ती आहे असे समजायचेच असते
जलाल आगा ची भूमिका राजपाल
जलाल आगा ची भूमिका राजपाल यादवला देतील बहुतेक !
ठाकुर = महागुरु, मौसी = उषा
असरानीच्या जेलरच्या भुमिकेत कोण?
मटा मधील हा लेख तुम्हीच
मटा मधील हा लेख तुम्हीच लिहिला आहे का ? http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11385202.cms
अन केश्तो? त्याला नका विसरू
अन केश्तो? त्याला नका विसरू बोवा! त्याचे जागी कोण?
असरानी म्हणून माबोवरचा एखादा
असरानी म्हणून माबोवरचा एखादा ड्यु आय घ्यावा असे सुचवतो. कारण त्याला कैदी कधी मिळतच नाहीत.
केश्टो म्हणून मी तयार आहे, ते
केश्टो म्हणून मी तयार आहे, ते अॅक्टिंग नक्की जमेल![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आणि हो इक्बालच्या (सचिन)
आणि हो इक्बालच्या (सचिन) वडीलांचीही भूमिका तेच एवरग्रीन ए.के. हंगलच करतील.
सचिनला मारण्याआधी एका
सचिनला मारण्याआधी एका सुतळीच्या खाटेवर आडवा पडलेला गब्बर एका मुंगळ्याला चिरडतो. तो मुंगळा कोण असावा?
राधा कोण? नवी सोनाली कुलकर्णी
राधा कोण?
नवी सोनाली कुलकर्णी का? की जुनी चालेल?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>मटा मधील हा लेख तुम्हीच
>>मटा मधील हा लेख तुम्हीच लिहिला आहे का ?<<
@श्री![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
त्या लेखाची लिंक वर सर्वात खाली दिलेली आहे. काळजी नसावी
तो मुंगळा कोण असावा?>>> खवीस
तो मुंगळा कोण असावा?>>> खवीस किंवा सुखनवर चालेल का?
गब्बरची तंबाखू म्हणून एखादी
गब्बरची तंबाखू म्हणून एखादी स्त्री डु आयडी मायबोलीतर्फे द्यायला हरकत नाही
वीरु: बसंती ...ह्या
वीरु: बसंती ...ह्या कुत्र्यांच्या समोर नाचु नकोस .
गब्बर (मकरंद स्ठाईट्ल मधे): कुत्रांचा प्राब्लेम हाय व्हय ...ए सांब्या कुत्री हकल ले जरा ..हॅहॅहॅहॅ
माऊथ ऑर्गन ऐवजी 'पिपाणी'
माऊथ ऑर्गन ऐवजी 'पिपाणी' वाजवायची आयडीया कशी आहे?
पंत लय भारी.
पंत लय भारी.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कालिया : सरकार, म्या मीठ
कालिया : सरकार, म्या मीठ खाल्लोय तुमचं?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
गब्बर : ए तुज्या मायला तुज्या, मंग पैसं कोण देणार? गोळ्या आणायच्याती बंदुकीच्या, लो बजेट पिच्चर हाये येड्या हे हे हे हे.....(पेशल मक्याब्बर सिंग टाइप हास्य)
गब्बर (मकरंद ) : अरे ये
गब्बर (मकरंद ) : अरे ये साम्ब्या, किती लोकं व्हती म्हन्तो मी?
सांबा : (हा रोल कोण करणार आहे?) : दोन मायबाप.
गब्बर (मकरंद ) : हातीच्य्यामारी. त्ये दोन आन तुम्ही हीतके तरीबी ढुं**ला पाय लावुन पळुन आले. थुत तुम्च्या मारि. ये हेम्ल्या, आन ती बन्दुक हीतं. आज मी हीशेबच करीतो. बराबर करीतो. हॅहॅहॅहॅ
(No subject)
नन्ना हिट्ट आहेस एकदम.
नन्ना
हिट्ट आहेस एकदम.
>>> आणि हो इक्बालच्या (सचिन)
>>> आणि हो इक्बालच्या (सचिन) वडीलांचीही भूमिका तेच एवरग्रीन ए.के. हंगलच करतील. <<<
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कोण जाईल बोलवायला?
आगरी शोले. गब्बर : कती मानसा
आगरी शोले.
गब्बर : कती मानसा व्हती?
सांबा : दोनुच व्हती
गब्बर : ती दोन तुमी तीन. तरीबी हलवित आलात ! कुटं हाय माजी एके फोर्टी शेवन. कुट्टं? त्याज्याआयला करगोट्यान आराकली वाट्टं. आयशीनी ल्हानपनी करगोटा बांदला व्हता तो जवानीन कवरा टाईट झाला बग.
Pages