महिपतचा पोरगा गणपत कृषी पदवीधर झाला
फर्स्ट्क्लासमधे पास होउन गावाकडं आला
मनात होती हुरहूर
गाववाले होतील चूर
कानातून एकेकाच्या निघेल धूर
जेंव्हा बघतील माझं सर्टिफ़िकिट
गावच्या पुढारीपणाचच ते तिकिट
मनात मांडे खात होता
आपल्यावरच खूष होत होता
*
गाववाल्यांनी ठरवला सत्कारसोहळा
कार्यस्थळ भैरूचं रान
सगळे शेतकरी झाले गोळा
ऐकायला ’ग्रॆड्युएटचं भाषान’
*
पयली चक्कर मारली रानाची
रोपं पाहिली हिरवी
त्यांच्यावरती डोलत होती
फुलंही इवलीइवली
*
शेत दाखवताना भैरूचा
भरून आला ऊर
पण जाग्यावर आल्यावर
ग्रॆड्युएटनं लावला वेगळाच सूर
*
म्हणाला, "गावकरी, किती तुम्ही अडाणी
जास्त होतंय रोपांना पाणी
खत, युरिआ पडतंय कमी
आता तरी करा सुधार
माझ्या ज्ञानाचा करा विचार
नाहीतर रोपास्नी एक मिरचीबी न्हाई लागनार"
*
पाहून गणपतचा रुद्रावतार
गाववाले पडले चाट
समारंभ आटोपून एकेकानं
धरली घरची वाट
*
सकाळी न्याहारीच्या वेळी
पदवीधर विचारतात बापाला
कसा वाटला सत्कार
बाप म्हणाला "लय भारी
पर इचारू का एक इचार?"
*
गणपत म्हणतो बापाला,
"इचार जरूर इचार"
"आरं पोरा, आमी अडाणी, तू हुशार
पर ह्ये तर सांग,
रोप वांग्याचं असताना
त्येला मिरची कशी लागनार?"
गैरसमज नसावा, निव्वळ विनोदासाठी,"पदवीधर"
Submitted by pradyumnasantu on 3 January, 2012 - 21:53
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सोज्वळ विनोद. आवडला.
सोज्वळ विनोद.
आवडला.
गणपत म्हणतो बापाला, "इचार
गणपत म्हणतो बापाला,
"इचार जरूर इचार"
"आरं पोरा, आमी अडाणी, तू हुशार
पर ह्ये तर सांग,
रोप वांग्याचं असताना
त्येला मिरची कशी लागनार?"
पोरागा हूशार दिसतोय.....आवडली कविता
विनोद आवडला. बालपणी ऐकल्याचे
विनोद आवडला. बालपणी ऐकल्याचे आठवते.
विनोद छान होता. माझी प्रोफाईल
विनोद छान होता.
माझी प्रोफाईल बदलू की काय?
नव्या आकर्षक बाटलीतल्या
नव्या आकर्षक बाटलीतल्या जुन्या, चांगल्या प्रूफ दारूसारखी छान आहे.
विनोद छान! पण पदवीधर पोराचा
या विनोदाची द.मा.मिरासदार
या विनोदाची द.मा.मिरासदार स्टाईल कथाही होईल,पण तुमची कविताही गंमतीदार आहे.
अतिशय मस्त