भाकस मासा एका बाजुने चपटा असतो. चपटी बाजू पांढरी असते तर वरची बाजू फुगीर व खवलांनी भरलेली काळी असते. साधारण हलव्यासारखी. ह्याची खवले काढावीत व तुकड्या करून घ्याव्यात. जर रस्सा आणि तळायचेही असतील तर मधल्या चांगल्या तुकड्या तळण्यासाठी घ्यावात व डोके आणि शेपटाकडील तुकड्या रश्यासाठी वापराव्यात. रस्सा इतर रश्यांसारखाच ओल्या खोबर्याच्या वाटणाने करतात.
तळण्यासाठी तुकड्यांना मिठ, मसाला, हळद हवे असल्यास वाटण लावावे. जर धिर किंवा वेळ असेल तर थोडा वेळ मुरवावे. नाही मुरवले तरी हरकत नाही (माश्यांचीही आणि माझीही :स्मित:).
मग तवा चांगला गरम करावा व गॅस मध्यम ठेवून तेल सोडून तुकड्या शॅलोफ्राय करायला ठेवाव्यात. एक बाजू ४- ते ५ मिनिटे शिजवून झाली की परववावी व दुसरी बाजूही तितकीच शिजवावी. पलटल्यावर पुन्हा थोडे तेल कडेने सोडावे. जर तुकड्या जाड्या असतील तर पुन्हा अलटी पलटी कराव्यात २-३ मिनीटे व नंतर गॅस बंद करावा.
ह्या आहेत तयार तुकड्या. फिज मध्ये मासे असल्याने कापताना त्यांना व्यवस्थित शेप नाही आला.
हे मासे समुद्रात मिळतात.
वाटणाबरोबरच लिंबूही पिळला तरी चांगली चव लागते.
लिंबू किंवा वाटण ताज्या माश्यांना लावण्याची तशी आवश्यकता नसते. जर मासे बर्फातील असतील तर त्यांचा वईसपणा घालवण्यासाठी वापरतात.
आधी मला वाटले काला और गोरा
आधी मला वाटले काला और गोरा असे दोन मासे आहेत.. आणि याचे डोळे कुठे गडपले???
वाटणाबरोबरच लिंबूही पिळला तरी चांगली चव लागते.
वाटणात पिळा किंवा पिळू नका पण खाताना मात्र माशावर लिंबु जरुर पिळा. मांसाहार करताना सोबत लिंबुरस असणे प्रथिने आणि जीवनसत्वे शरीरात नीट शोषली जाण्यासाठी आवश्यक आहे. लिंबुरस नसेल तर प्रथिने आणि जीवनसत्वांचे फायदे शरीर मिळवू शकत नाही (संदर्भ - 'स्वयंपाकघरातले विज्ञान' हे पुस्तक)
चला, जागूतै कार्यरत
चला, जागूतै कार्यरत झाल्या.
हा मासा आडवाच पोहतो. इकडे पण आवडीने खातात.
मस्त आहे रेसिपी... पुण्यात
मस्त आहे रेसिपी... पुण्यात मला वाटते भाकस मासा मिळत नाही .
आला आला नवीन मासा आला. मी
आला आला नवीन मासा आला.
मी पहिल्यांदाच पाहिला हा मासा.
बाकि मासे बनवण्याची पध्दत अगदी सेमच आहे आमचीपण.
साधना चांगली टिप दिलीस.
साधना चांगली टिप दिलीस. डोळ्याचे संशोधन मला करावे लागेल.
दिनेशदा, प्रिती धन्स
जागुताई आता आठवले. ह्यालच एक
जागुताई
आता आठवले. ह्यालच एक डोळा बाकस म्हणतात का?
नन्ना आमच्याकडे भाकस म्हणतात.
नन्ना आमच्याकडे भाकस म्हणतात. तुमच्याकडे तस म्हणत असावेत.
जागु खुप दिवसांनी तुझे दर्शन
जागु खुप दिवसांनी तुझे दर्शन झाले , कुठे होतीस ?
प्रचि पाहून तोंपासू
भाकसाला आम्ही एक्डोल्या
भाकसाला आम्ही एक्डोल्या म्हणतो.
मस्त डिश. तोंपासू
खर्पुस्स्स
खर्पुस्स्स
हा मासा पाहिला आहे पण अजून
हा मासा पाहिला आहे पण अजून खाल्ला नाही. आतां खाल्याशिवय चालणारच नाही !
माझ्या एका मित्राचं गांव वडखळ व पेणच्या मधे धरमतर खाडीलगत आहे. मासे तळताना तो सुकं खोबरं भाजून वाटपात वापरतो. एक वेगळाच खमंगपणा येतो, विशेषतः मासे उग्र वासाचे असतील तर . अर्थात, सर्वसाधारणपणे आम्ही << तळण्यासाठी तुकड्यांना मिठ, मसाला, हळद >> हीच पद्धत वापरतो व लिंबाऐवजी चिंचेचा कोळही वापरतो.
जागूजी, खाद्यसंस्कृतिला तुम्ही देत असलेल्या उजाळ्याबद्दल धन्यवाद.
व्वा! एकडोळा बाकस! आमच्या कडे
व्वा! एकडोळा बाकस! आमच्या कडे कधी हा मासा आणत नाहीत पण माझ्या मित्राच्या आईच्या हातचा खाल्ला होता एकदा.
डॉ आग्री भाषेतल नाव
डॉ आग्री भाषेतल नाव दिसतय.
चातक, भाऊ, स्वाती धन्स.
जागो हे माझ्या नजरेतून सुटलं
जागो हे माझ्या नजरेतून सुटलं होतं..
पण ही पाकृ इतकी काही इंटरेस्टींग नाही वाटली.
दक्षे चव घेतलीस की काय ?
दक्षे चव घेतलीस की काय ?
मस्त आहे एकदम!
मस्त आहे एकदम!