पुण्यामधे माझ्या मावशीच्या दुकानात, एक विधवा ताई महीना ४००० रु. पगारावर काम करतात, त्यांचा सहा वर्षाचा मुलगा आहे. त्यांना माहेरचा आणि सासरचा काहीच आधार नाही, सकाळी ११ ते ८ असे कामाचे तास आहेत, त्यामुळे मुलाकडे पुर्ण दुर्लक्ष होते, मुलगा पहिलीत असुन १० ते ५ शाळेत जातो.. त्याच्यासाठी त्यांना शेजारी किल्ली ठेवावी लागते, घरात कोणीच नसल्याने घरातील सामान चोरीला जातेय, घरमालक देखील खडूस आहेत त्यांची काहीच मदत होत नाही..
मुलगा रात्री कुठेही जाऊन बसतो, दोन दोन दिवस सापडत नाही..
त्याला काही वाईट सवयी लागतील अशीही भिती आहेच..
घर ते दुकान अंतर १५ किमी आहे, त्यामुळे मुलाला सोबत ठेवणे शक्य नाही..
पुणे अथवा आसपास त्यांच्या मुलासाठी एखादे कमी दरातील पाळणाघर, अथवा अनाथाश्रम, होस्टेल, किंवा कामगार महीलांच्या मुलांना सांभाळणारी एखादी स्वयंसेवी संस्था माहीत आहे का..?
माझ्या माहीतीतील संस्थांमधे मुले पाचवीपासुन पुढे घेतली जातात, पहिली ते पाचवी मुलांसाठी अशा प्रकारच्या संस्था आहेत का..?
कृपया मार्गदर्शन करा...
अल्प उत्पन्न गटातील महीला पालकासाठी कमी दरातील पाळणाघर, अनाथाश्रम किंवा स्वयंसेवी संस्थेबद्दल माहीती हवी आहे
Submitted by सारीका on 28 December, 2011 - 00:54
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सारीका तुझी मावशी कुठे राहते
सारीका तुझी मावशी कुठे राहते ? यवतमाळमध्येच आहे का ?
जागू, मावशी पुण्यात राहते..
जागू, मावशी पुण्यात राहते.. बदल केला आहे लेखनात धन्स..
सॉरी मला काहीच कल्पना नाही.
सॉरी मला काहीच कल्पना नाही.
अग ह्या लिखाणाची लिंक
अग ह्या लिखाणाची लिंक पुण्याच्या धाग्यावर दे. पुणेकरांना माहीत असेल. मला माझ्या एरीयातील अनाथ शाळा माहीत आहेत. पण त्या बाईसाठि ती खुपच लांब होईल.
जागू पहीलीपासून घेतात का
जागू पहीलीपासून घेतात का तिथे..? उरणही चालेल, त्या ताई मुलाला वनवासी कल्याण आश्रम दापोलीत ठेवायला तयार होत्या, पण तिथेही पाचवीनंतर घेतात.. त्यातून त्या मराठा आहेत त्यामुळे अनेक आश्रमांमधे प्रवेश नाकारला जातो..
sarika marathwadyat
sarika marathwadyat (parbhanila) baryach aashram shala aahet
रतन सरकारी आश्रमशाळांमधे,
रतन सरकारी आश्रमशाळांमधे, पाचवी नंतरच मुले घेतात, त्यातून कास्ट क्रायटेरीया आहेच..
anybody knows good speech
anybody knows good speech therapist or special educator in pune or navi mumbai for speech delay childrens
सारीका ओके मी फोन करून
सारीका ओके मी फोन करून विचारते. ही बघ ही मी मागे लिंक दिली होती ती आश्रम शाळा.
http://www.maayboli.com/node/31015
@sarika , cast cha problem
@sarika , cast cha problem nahi yenaar, parantu mulga pahilit mhanje khupch alahan zala.
Mehkar (Buldhana) javal ek vivekanand hivra aashram aahe, tithe kadachit aasel, parantu fees baghave lagel
सारिका त्या सरांना फोन लागत
सारिका त्या सरांना फोन लागत नाहीये. परत प्रयत्न करुन सांगते तुला.
सारीका मी आत्ताच फोन केला
सारीका मी आत्ताच फोन केला होता शाळेत. त्या आश्रम शाळेत १ ली पासुन घेतात पण जातीची अट आहेच. फक्त एस.सी. कॅटेगरीतली मुले घेतात. काय विचित्र प्रकार आहे ना ? फक्त जातीच्याच मुलांना आश्रय ?
१.स्नेहालय अहमदनगरमधे फोन
१.स्नेहालय अहमदनगरमधे फोन करुन बघा
http://www.snehalaya.org/rehabilation-center.html
२.स्नेहालय सोलापुरमधे पण बघा
Organization Name Snehalaya
Charity Type Education & Literacy, Women's Development & Empowerment
Email Address
Website URL http://www.snehalayaindia.org
Address Snehalaya At Post. Karamba Tq. North Solapur Dist. Soalpur Pin - 413 222.
City Solapur
Phone 1 0217-2281305
Phone 2 09822018182
दोन्ही संस्था वेगळ्या आहेत पण चांगल्या आहेत. दोन्ही ठिकानी रहाण्याची आणि शिकण्याची सोय आहे.सोलापोरमधे तर कित्येक उसतोडणी कामगाराम्ची मुलेपण शिकतात.
एआर्सी, मी अहमदनगर स्नेहालयात
एआर्सी, मी अहमदनगर स्नेहालयात चौकशी केली, तिथे फक्त वारांगनांची मुले आणि एचआयव्ही पॉझीटीव्ह मुले यांनाच घेतात..
सारीका, कोरेगाव पार्क
सारीका, कोरेगाव पार्क एरियातील भारतीय समाज सेवा केंद्रात चौकशी करून पाहिलीत का? त्यांचे शैक्षणिक प्रायोजकत्व, गरीब कुटुंबांना मुलांच्या शिक्षण व इतर देखभालीचे उपक्रम आहेत. तिथे जातीचा अडसर नाही. परंतु पालकांनी सोडलेल्या, संस्थेच्या हवाली केलेल्या किंवा अनाथ मुलांना प्रवेश मिळतो. तुम्हाला जास्त चौकशी करावी लागेल.
त्यांची वेबसाईट आहे तिथे सर्व फोन, इमेल्स इत्यादी संपर्क दिले आहेत : http://www.bsskindia.org/programmes_cws_family_support.html
http://www.bsskindia.org/programmes_cc_institutional.html
http://www.bsskindia.org/contact.html
http://www.bsskindia.org/FAQ.html#17
http://www.annapurnapariwar.o
http://www.annapurnapariwar.org/?page_id=22
http://www.annapurnapariwar.org/?page_id=46 हे ही पहा.
मुंबईत कुर्ल्याला एक बोर्डिंग
मुंबईत कुर्ल्याला एक बोर्डिंग आहे. माझ्या आईसाठी एक अटेंडंट ठेवली आहे तिचा मुलगा तिथे असतो. तो सद्ध्या ६वीत आहे. रहाण्याचे व जेवण्याचे पैसे द्यावे लागत नाहीत पण शिक्षणाचे पैसे द्यावे लागतात. कुर्ल्याला चालणार असेल तर, पहिलीपासून घेतात का ते तिला विचारते
अश्विनी, जमल्यास त्या
अश्विनी, जमल्यास त्या संस्थेचा फोन, पत्ता इ. इथेही देऊन ठेव.
http://www.rayatshikshan.edu/
http://www.rayatshikshan.edu/Content.aspx?ID=969&PID=5
हे पहा
पुण्यात काहिच उणे नाही
पुण्यात काहिच उणे नाही म्हणतात ....... मग समाज सेवेच्या कर्याला जात पात का पहावी
उत्तरमहाराष्टात कुठल्याही आश्रम शाळेत मुलाला टाकलत तर जात आणि वय विचारलं जात नाही ! जमलं तर बघा !
सारीका पुढे काही झाले का?
सारीका पुढे काही झाले का? सोलापुरला चवकशी केली का? जातीवर इथेपण????? फार वाईट.
सारीका पुढे काय झाले? इथे
सारीका पुढे काय झाले? इथे अपडेट कराल का?