अर्धी वाटी तूर + अर्धी वाटी मूग डाळ
एखादी हीरवी मिरची
कोथिंबीर
कडिपत्ता
२ सुक्या लाल मिरच्या
हळद
लाल तिखट
४ पाकळ्या लसूण
२ मध्यम टोमॅटो
हवा असल्यास १ कांदा
जीरं
तेल
मीठ
तूर + मूग जरा कमी पाण्यात शिजवून घ्यावी. हळद घालावी वा राहू द्यावी. शिजलेली डाळ घोटू नये.
हीरवी मिरची, कोथिंबीर, टमाटो, घेतला असेल तर कांदा; बारीक चिरून घ्यावा.
सुक्या लाल मिरचीचे तुकडे करावेत.
लसूण सोलून ठेचावा. जरासं आलं सुद्धा किसावं चव आवडत असल्यास...
आता अगदी १ चमचा तेल तापवावं.
त्यात, फक्त २ जिर्याचे दाणे घालावेत.
आता क्रमानी हिरवी मीरची, लसूण, आलं घालावं. जरा परतून घ्यावं.
घेतला असेल तर आता कांदा घालून परतावं (जरा ब्राउन होवू द्यावा). शिजतांना हळद घातली नसेल तर ती आता घालावी.
टोमॅटो घालावेत. परतावं. हे सगळं नीट शिजलं की शिजलेली डाळ घालावी. पाणी घालावं. पळीवाढं असू द्यावं. मीठ घालून चांगली उकळी येऊ द्यावी. ही डाळ तयार आहे. ही हवी असल्यास सर्विग बाउलमध्ये काढावी. नाहीतर लगेच वाढायची असेल तर अगदी सिमर वर ठेवावी.
आता तडका करावा-
छोट्या कढईमध्ये ७/८ चमचे तेल तापत ठेवावं. गरम तेलात आता भरपूर जिरं घालावं. जिरं तडतडल्या बरोब्बर लाल मिरच्या घालाव्यात. तिखटपणा जसा हवा असेल तसं लाल तिखट घालावं. फोडणी जरासुद्धा जळता कामा नये!!! हा तडका तयार डाळीवर ओतावा.
दाल तडका तयार आहे. कोथीबीर घालून सजवावं.
अगदी हॉटेल च्या चवीचा होतो पण घरच्या तेलामुळे त्रास होत नाही.
गरम फुलका, जिरा राईस बरोबर छान लागतो. भाताबरोबर खायचा असेल तर जरा पाणी जास्त असू द्यावं.
आज केला होता पण ऑफिस मध्ये आल्याबरोबर लोकांनी फडशा पाडलाय; त्यामुळे फोटो नाही काढता आला...
कालच करुन पाहीला दाल तडका,
कालच करुन पाहीला दाल तडका, मस्त झाला होता. एकदम सही पाककृती
मी काल केला होता हा दाल तडका.
मी काल केला होता हा दाल तडका. अगदी मस्त चव
पाकृबद्दल धन्स 
मस्त कृती. मी केलेली, एकदम
मस्त कृती. मी केलेली, एकदम ढाब्यावरची चव! टोमॅटो नव्हता घरात म्हणून विकतची टोमॅटो पेस्ट घातली. त्यामुळे मस्त रंग आलेला.
छान व उपयुक्त रेसिपी . आम्ही
छान व उपयुक्त रेसिपी .
आम्ही बव्हंशी अशीच करतों फक्त तडक्यासाठी तिखटाऐवजी किंचित गरम मसाला वापरतो.
मस्त !!!
मस्त !!!
मीच बरेच दिवसात केलेला
मीच बरेच दिवसात केलेला नाही... आता करीने एक दिवस! :प
करुन पाहिली. मस्त झाली होती.
करुन पाहिली. मस्त झाली होती. रेसिपीबद्दल धन्यवाद
तेलापेक्षा साजुक तुपात अगदी
तेलापेक्षा साजुक तुपात अगदी २-३ चमचे ...करून पहा
साजुक तुपात जसा दाल तडका होतो तसा कशातच नाही होत !!!!! तशातही जिरं जरा सैल हातानं घालावं अतीशय सही होतो मग तर दाल तडका
आज या रेसिपीने तडकलेली डाळ
आज या रेसिपीने तडकलेली डाळ केली होती. जर्रा झणझणीत पण मस्त होती चव. दिल खुश हो गया! थँक्स योकु.
अकु, आवर्जून करून पाहून, इथे
अकु, आवर्जून करून पाहून, इथे कळवल्याबद्दल धन्यवाद.
योकु, हुकुमी आणि मस्त रेसिपी
योकु, हुकुमी आणि मस्त रेसिपी आहे ही. मी आता कायम याच रेसिपीने करते आणि आवडतोच घरच्यांना.
ही तर प्रॉपर पाककृती आहे
ही तर प्रॉपर पाककृती आहे की... मला वाटलं...
नक्की करून बघेन.
योकुज धाबा..... हिट है बॉस
योकुज धाबा..... हिट है बॉस
आजच दुपारच्या जेवणात बनवला
आजच दुपारच्या जेवणात बनवला होता दाल तडका. सेम धाब्यावरील दाल ची चव होती. घरी सगळ्यांना आवडला..!
धन्यवाद योकू.. सोपी आणि चविष्ट रेसिपी!!
आज केली होती . छान झाली होती
आज केली होती . छान झाली होती चविला. कोथिंबीर संपल्याच् ऐन्वेळी आठवल . पण खाली जाऊन आणायचा कंटाळा केला .
Pages