तीन देवता

Submitted by pradyumnasantu on 15 December, 2011 - 19:54

तीन देवता

आपल्या गावातील देव्/देवता, व नदी सर्वांसाठीच श्रद्धास्थान असते, आणि तिसरे श्रद्धास्थान म्हणजे 'आई'. पहिल्या दोन देवतांहूनही आई का बरं श्रेष्ठ?

एक देवता वाहे
एक मंदीरी राहे
एक मम ह्रदयी वसते
तीन देवता, जणू दीप तेवता

वाहणारी गंगा
मंदिरात अंबा
हृदयातली माता
तीन देवता जणू दीप तेवता

एक पूर्ती
एक मूर्ती
एक साक्षात स्फूर्ती
तीन देवता जणू दीप तेवता

गंगा जर क्षुब्ध तरी मी अस्वस्थ
अंबा जर रुष्ट तरी हो अनर्थ
आम्हा न हो दु:ख हेच म्हणे माता
तीन देवता जणू दीप तेवता

गुलमोहर: 

टाकिच्या घावे
देवपण येई
देवाहुनही थोर
आहे माझी आई,आहे माझी आई.

आईची महती वर्णावी तितकी थोडी.

श्री महालक्ष्मै नमो नमः!