तांदळाच्या पीठाची कायलोळी/ घावन

Submitted by प्रिति १ on 15 December, 2011 - 12:12

साहित्य :

१ वाटी तांदळाचे पीठ,
१/२ वाटी बारीक रवा,
१ कांदा, १ मिरची,
३ कप दुध, अथवा दिड कप दुध आणि दिड कप पाणी
थोडे मीठ, चवीला चिमुटभर साखर.

चटणीसाठी :-
१/२ नारळाचा चव, ( किस )
३-४ मिरच्या ,
थोडी कोथिंबीर,
थोडे मीठ, व चवीला साखर.

क्रूती :-
एका पातेल्यात तांदळाचे पीठ आणि रवा दुधात किंवा दुध्-पाण्यात भिजवुन १५ मिनिटे ते अर्धा तास ते भिजत ठेवावे. नंतर त्यात १ कांदा व १ मिरची बारीक चिरुन घालावी. व नेहमीप्रमाणे निर्लेपच्या तव्यावर
डोसे करतो त्या प्रमाणे ते घालावेत. दुधात भिजवल्यामुळे एक प्रकारची सुंदर चव येते.

आधीच वर सांगितल्याप्रमाणे चटणी करावी. चट्णीसाठी वेळ नसेल तर नुसते तुपाबरोबर पण कायलोळी
मस्त लागते. Happy

वरील प्रमाणात ७ ते ८ कायलोळ्या/ घावन होतात.

माहितीचा स्तोत :- माझी सुग्रण आई .

चटणीची तयारी .
PC090426.JPG

पीठः-
PC090427.JPG

तयार चटणी.
PC090428.JPG

कायलोळी तव्यावर घातली.
PC090430.JPG

झाकण ठेवल्यावर :-
PC090433.JPG

घावन परतल्यावर
PC090431.JPG

चला, गरमागरम खायला.:)
PC090434.JPG

गुलमोहर: 

दूध वापरायची आयडीया छानच. संध्याकाळीच प्रयोग करीन म्हणतोय.

(त्या ग्रुपचे सभासदत्व घेतलेय ना ? मग कुठलीही पाककृती उघडायची. कोपर्‍यात नवीन पाककृती अशी अक्षरे दिसतील. तिथे क्लीक केले कि झाले. )