लँब विंदालू ही गोमंतकीय-पोर्तुगीज पाककृती आहे. सहसा ही पाककृती पोर्क वापरून केली जाते, पण इथे मी लँब वापरून केलेली आहे.
१.५ पौंड लँब (बारीक अथवा मोठे तुकडे)
१५-२० तांबड्या मिरच्या
१/३ कप विनेगर
१/२ टीस्पून जिरे
१०-१२ लवंग
१०-१२ मिरी
२ वेलची
१/२ टीस्पून मोहरी
५-६ पाकळे लसुण
इन्चभर आले
१ मध्यम आकाराची दालचिनी
१/४ कप किसलेला नारळ अथवा खोबरे
२ टीस्पून टोमाटो पेस्ट
१/२ मध्यम आकाराचा कांदा
१/२ टीस्पून हळद
२ तमालपत्र
३ टीस्पून तेल
१/३ कप फेणि किंव्हा रेड वाईन.
चवीनुसार मीठ
१. लँबचे छोठे अथवा मोठे तुकडे करून घेवून त्यांना मीठ आणि हळद लावून घेणे. हे मिश्रण फ्रीज मध्ये अर्धा तास ठेवून देणे.
२. मिरच्या, लवंग, मिरी, वेलची, मोहरी, जिरे, दालचिनि, आले, लसुण आणि नारळ, विनेगर मध्ये भिजवून, मिक्सर मध्ये वाटून घेणे. अधिक विनेगर घालू नये. गरज लागल्यास वाटताना थोडे गरम पाणी वापरावे.
३. वाटण चांगले ल्यांबच्या तुकड्याना लावून घेणे, ३-४ तास फ्रीज मध्ये ठेवून देणे.
४. एका पसरट किव्हा तत्सम मंद आन्चेवर्ती शिज्वण्यायुक्त भांडे घ्यावे आणि त्यात तेल गरम करावे आणि तमालपत्र, बारीक चिरलेला कांद्याची फोडणी टाकावी (थोडा तांबूस रंग येई पर्यंत).
५. म्यारीनेत केलेला ल्यांब त्याच्यात टाकावा, हे मिश्रण ल्यांबला पाणी सुटेपर्यंत शिजवावे.
६. एक कप गरम पाणी घालावे.
७. गरम आन्चेवर्ती १० मिनिटे शिजवावे, उकळी आल्यानंतर मंद आचेवर्ती ३० मिनिटे झाकण ठेवून शिजवावे. मध्ये मध्ये ढवळत राहावे.
८. लँब जरा मंदच शिजवावा, घाई करू नये.
९. फेणि किंव्हा रेड वाईन आणि टोमाटो पेस्ट घालणे.
१०. मिश्रण आणखी २५ मिनिटे शिजवून घ्यावे, हलकेच ढवळत राहणे.
११.लँब शिजल्यावर, मीठ घालावे.
१२. ग्रेवी थोडी दाटच असावी , पाणीदार नसावी.
१३. शेवटी पाहिजे असल्यास चिमुटभर साखर टाकावी.
विंदालू , नान, भात किंव्हा पाव (रोल्स) सोबत खावू शकतो.
छान आहे रेसिपी. करुन बघणार.
छान आहे रेसिपी. करुन बघणार. 'तिकी' म्हणजे काय?
अन्कॅनी, माफ करा ह., 'तिकी
अन्कॅनी, माफ करा ह., 'तिकी म्हणजे दालचिनी ( गोव्यात आम्ही 'तिकी म्हणतो :-))
धन्यवाद. फोटो छान आलाय.
धन्यवाद.
फोटो छान आलाय. रेसिपीबरोबर टाकायचा असेल तर पोस्ट 'संपादन' मध्ये जाऊन ती लिंक कॉपी करुन रेसिपी लेखनामध्ये टाका.
लँब असे लिहायचे - lEMb किंवा लॅम्ब lEmb
मस्त फोटो आणि रेसिपी.
मस्त फोटो आणि रेसिपी.
अगदी ओरीजीनल रेसिपी !
अगदी ओरीजीनल रेसिपी !
simply wow....तोंडाला पाणि
simply wow....तोंडाला पाणि सुटल...
सही पाकृ आहे. नक्की करून
सही पाकृ आहे. नक्की करून बघणार.
लँब विंदालू केल्यावर, बाजूला काढून ठेवलेल्या वाटणात बटाटे घालून खाईन.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
स्लर्प रेसिपी!!!
स्लर्प रेसिपी!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.