चांगले दृकश्राव्य कार्यक्रम

Submitted by रैना on 10 December, 2011 - 02:28

काय लिहीणे अपेक्षित आहे
- आंतरजालावर असलेले उत्तम दृकश्राव्य, किंवा श्राव्य कार्यक्रमांचे दुवे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दळण ही दमा मिरासदारांची कथा वाचली नव्हती. युट्यूबवर आहे.
शंकर पाटील आणि दमांच्या बर्‍याच कथा आहेत. पण त्या त्यांच्या स्वतःच्या दादरीकरणातल्या नाहीयेत. किंचितसा रसभंग होऊ शकतो.
ताजमहालमधे सरपंच ही वाचली होती. व्यंकटेश माडगूळकरांची गावात वान्हेर आलं ही कथा त्यांच्या तोंडून ऐकली होती. त्या थोड्या काळासाठी युट्यूबर दिसून गेल्या. नंतर दिसल्या नाहीत.
सध्याच्या क्वारंटाईन मधे हे भन्नाट मनोरंजन आहे.

भोकरवाडीतील श्रमदान
https://www.youtube.com/watch?v=Rpm4XYUGJdg

नाना चेंगट, बाबू पैलवान, गणा मास्तर, शिवा जमदाडे, रामा खरात ही मंडळी इतकी ओळखीची झालीत कि आपल्याच गावात कुठेतरी भेटली होती असे वाटत राहते.

दर्द मिन्नत कशे दवा ना हुआं
गालीबच्या या गझलेचं अली रझाचं हे रूप मोहम्मद रफी यांनी गायलेल्या गझलेच्या रूपड्यापेक्षा आवडलं.
https://www.youtube.com/watch?v=-NWq-GqpLO4

रफींनी खूपच छान गायलं आहे. पण त्याची चाल सहजसोपी नाही. त्यांनी गायलेली हीच जुनी गझल
https://www.youtube.com/watch?v=8c213rkrQfA

हीच गझल - बेगम अख्तर . ही चाल रफींच्या गाण्याशी मिळतीजुळती आहे. पण बेगमा अख्तर यांची स्वतःची छाप आहे.
https://www.youtube.com/watch?v=9E7z3GGhR54

Pages