Submitted by pradyumnasantu on 7 December, 2011 - 13:52
आकाशाचं ताट
दोन्ही तान्ह्याना बाई गं
भुकेलेच जोजावले
लगी मनाच्या भांड्यात
दोन सूर्वे उगि्वले
सुर्वे पाहोन की माहे
सारे भान हरपले
माह्या भाकरीच्या तव्या
दोन तारे करपले
चमचमीत वठली चांदण्यांची गं उसळ
आकाशाच्या अंधाराची खर्डा-चटणी खट्याळ
मीन राशीची सुरमई
तळली पिठूर लावून
पूर्वे फुटलं तांबडं
त्याचं केलं कालवन
सांज रंगांची जिलेबी
केसरात गं घोळली
चव घेता घेता कशी
माही जीभ ती पोळली
असं भरलं भरलं
माजं आकाशाचं ताट
पंचपक्वान खाताना
माही झाली पुरेवाट
हात धुता धुता माझा घरधनी की हो आला
मी म्हनाले की बाबा तुहे उसीर का जाला
आकाशाचे ताटातले अन्न सपले हे सारे
तुह्यासाठी उरले ते दोन करपले तारे
***
जसं संपलं सपान
आन उगडले डोले
तशे रिकाम्या पोटावे
दोन आसू ओगळले
---
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कित्तेक कुटुंबे अस हलाकिच
कित्तेक कुटुंबे अस हलाकिच जिवन जगतात राव्,छान जमलय.छान मांडलय.
शुक्रीया विभाग्रजजी
शुक्रीया विभाग्रजजी
गरीबांनी या सार्याची
गरीबांनी या सार्याची स्वप्नंच बघायची
आणि कठोर वास्तवाला सामोरं जायचं
(कवितेतल्या शेवटच्या ४ ओळी)
हा हृदयस्पर्शी भाव चांगला मांडलाय.
सुंदर कविता
सुंदर कविता
व्वा यार. बहुत बढिया. वेगळाच
व्वा यार. बहुत बढिया. वेगळाच विषय आणि आगळी मांडणी. सुंदर !!
हृद्य..! आणि आकाशाच्या
हृद्य..! आणि आकाशाच्या ताटातील पदार्थांच्या कल्पनापण छान..!
वा वा!!!
वा वा!!!
प्रद्युम्न, तुमच्या कविता
प्रद्युम्न, तुमच्या कविता नेहमीच वाचनीय असतात. खूप परिणामकारकपणे तुम्ही गरिबांच्या व्यथा कवितांमधून मांडता. असेच लिहीत रहा.
कविता खुपच छान आहे.
कविता खुपच छान आहे.
खूप छान. तळमळीनं लिहिलंय.
खूप छान. तळमळीनं लिहिलंय. असंच लिहित राहा.
सुंदर कविता.. आवडली..
सुंदर कविता.. आवडली..
सर्व प्रतिसादकांनी दिलेले
सर्व प्रतिसादकांनी दिलेले उत्तेजन मनोभावे व विनम्रतेने स्वीकारतो. फार फार आभारी आहे.
अफाट!!!! शब्दच नाहीत या
अफाट!!!! शब्दच नाहीत या कवितेसाठी.
धन्यवाद प्राजू
धन्यवाद प्राजू
सुंदर. आवडली.
सुंदर. आवडली.
"चांदण्यांची उसळ, जिलेबी,
"चांदण्यांची उसळ, जिलेबी, चटणी, भाकरी, पंचपक्वान्न या सर्वांनी भरलेलं ताट बघत असतानाच,
"जसं संपलं सपान
आन उगडले डोले
तशे रिकाम्या पोटावे
दोन आसू ओगळले "
खाड्कन या ओळी आल्या आणी भरल्यापोटीही अश्रु ओघळले. खूप हृदयस्पर्शी कविता. तुमच्या कविता फार वाचनीय आहेत.
सुरेखाजी: आपला आसूभरला
सुरेखाजी: आपला आसूभरला प्रतिसाद फार मोलाचा वाटला. आभार.
पाषाणभेदजी: आभारी आहे.
पाषाणभेदजी: आभारी आहे.