काही तिरळे

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

तळ्याकाठच्या झाडावर
पाखरांची घरटी
फांदीफांदीला पालवी

    मुसळधार पाऊस
    दृष्टीसमोर ओघळते
    संन्यासी हिरवे

      मुसळधार पाऊस
      तळे अस्वस्थ
      बेडूक ध्यानस्थ

        स्तब्ध पाण्यावर
        पानांचे टपटप रंग
        आवाजाचे तरंग

          निरव स्तब्धता सुदूर...
          मी पाहिला तळ्याकाठी
          खंड्याचा एकतान सूर

            गारव्याची टाप
            शुभ्र धुक्यात वाजतीये
            वाफाळत्या कपात शिरतीये

            प्रकार: 

            Happy

            नविन प्रयत्न कौतुकास्पद आहे Happy

            >>मुसळधार पाऊस
            दृष्टीसमोर ओघळते
            संन्यासी हिरवे

            गारव्याची टाप
            शुभ्र धुक्यात वाजतीये
            वाफाळत्या कपात शिरतीये

            अतिशय सुंदर! खंड्याची तान.. पानांचे टप टप रंग.. गारव्याची टाप आणि त्याहून संन्यासी हिरवे.. केवळ उच्च! पुन्हा पुन्हा वाचत्येय तिरळे..

            खुप चान उच्चार जुल्व्ले

            वाह! सहीच आहेत हेही.
            आधी का नाही पाहिले?? Sad

            मुसळधार पाऊस
            तळे अस्वस्थ
            बेडूक ध्यानस्थ

            गारव्याची टाप
            शुभ्र धुक्यात वाजतीये
            वाफाळत्या कपात शिरतीये

            - हे विशेष आवडले. वर ठेव ते स्लार्ती Happy

            अरे वा ! हे पण छान आहेत Happy
            ************
            ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

            गार गार वाटलं वाचूनच. फार सुंदर.

            सुंदर !!

            वाफाळत्या कपाचा शेवट खूप आवडला ! Happy

            सही आहेस स्ला. Happy

            फक्त सांग सुदूर ह्या शब्दाचा अर्थ काय? (सर्वत्र, चहूकडे का?)

            *********************

            My true love hath my heart and I have his,
            By just exchange one for another given:
            I hold his dear, and mine he cannot miss
            There never was a better bargain driven
            My true love hath my heart and I have his.