१. ७/८ (किंवा तिखटाप्रमाणे जास्त वा कमी) हिरव्या मिरच्या
२. एक ते दीड वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
३. कच्चं तेल
४. मीठ
१. मिरच्या धूवून घ्याव्यात.
२. गॅस वर किंवा असल्यास निखार्यांवर मिरच्या भाजून घ्याव्यात, तेल लावू नये.
३. आता या मिरच्यांचं मिक्सरमधे जाड कूट करा.
४. हे एका बाऊल मधे घ्या
५. त्यात कोथिंबीर घाला, मीठ घाला
६. आता कच्च्या तेलाची त्यात धार धरा आणि चांगलं एकत्र करा.
७. खुडा तयार आहे. गरम ज्वारीच्या भाकरी + भरताबरोबर मस्त लागतं.
१. खरंतर यात मिरच्या भाजल्यानंतर खुडायच्या असतात, अगदी बारीक अश्या. पण तसं केलं तर हाताची बोटं चांगलीच झोंबतात. त्यातही, मिरच्या थंड झाल्या तर त्या खुडता येत नाही. मिक्सरला लावणे अगदी सोपं... त्यातही कुणाला प्रयोग करायचाच असेल तर करावा नंतर ओरडू नये!
२. तिखटपणानुसार कोथिंबीर, मिरची चे प्रमाण ठरवावे. तेलासाठी कंजूसी अजिबात करू नये!
३. वर दिलेल्या भरताची रेसीपी देइन लवकरच (विदर्भातलं कच्चं भरीत)
४. हिवाळ्यात जरूर खावा, कोथिंबीर भरपूर असते आणि त्यातून लोह पण मिळतं!
फटु?
फटु?
फोटो??
फोटो??
मस्त.
मस्त.
तोंपासु.
तोंपासु.
तोंपासु. फोटो???
तोंपासु. फोटो???
कुळकर्णी आणि खुडा. म्हणजे
कुळकर्णी आणि खुडा. म्हणजे सरदाराच्या आळीत न्हाव्याचे दुकान.
आम्ही देशस्थ... त्यातून
आम्ही देशस्थ... त्यातून विदर्भातले... त्यामुळे तिखट... नो इश्युज!