युगलगीत: गार गार वारा अंगाला झोंबला

Submitted by पाषाणभेद on 25 November, 2011 - 19:16

युगलगीत: गार गार वारा अंगाला झोंबला

तो:
गार गार वारा अंगाला झोंबला
तुझी साथ हाय माझ्या उबार्‍याला

ती:
नका जावू पुढं थांबा की थोडं
आसं शोभत नाय तुम्हाला

तो:
आगं तू येडी का खुळी
काय बोलतीया अवेळी
आगं काय म्हनू मी तुला?

ती:
काल रातीला एकटीच व्हते
घरात नव्हतं कुनी
तुमी यावं आसं वाटलं
पन आला नाय तुमी
आज आला तर थांबा थोडं
गुलुगुलु बोलू गोड गोड
गुलाबी थंडीचा मोसम ह्यो आला

तो:
आंगाश्शी..गार गार वारा अंगाला झोंबला
तुझी साथ हाय माझ्या उबार्‍याला

तो:
देव देव कराया नवस बोलाया
आईबाप गेलं तुझं पंढरीला
तु अन मी मी अन तु
दोघंच हाय आपन घरला
तू नाही म्हनू नको; आज आताच दे ग
एक गरमागरम चहा कपातला
पेटव तुझी तु चुल; फुकनीनं फुक जाळ
आग लागली ग माझ्या जीवाला

ती:
इस्स्स्स... नका जावू पुढं थांबा की थोडं
आसं शोभत नाय तुम्हाला

ती:
लगीन आपलं ठरल्यालं
नाय अजून काय झाल्यालं
उगा नका चढू तुमी झाडावर
पाय घसरलं पडलं झडलं
सारे म्हनतील तुमी लय आगावं
सोबतीला थांबा पर करू नका वांधा
मी इनंती करते तुम्हाला

तो:
आरं बाब्बौ....गार गार वारा अंगाला झोंबला
तुझी साथ हाय माझ्या उबार्‍याला

तो:
हे हे हे हे ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला

दोघं:
हं हं हं हं हं उं उं उं उं
उं उं उं उं उं उं उं उं
ढिंक च्याक ढिंक च्याक ढिंक च्याक ढिंक

गुलमोहर: 

लगीन आपलं ठरल्यालं
नाय अजून काय झाल्यालं
उगा नका चढू तुमी झाडावर
पाय घसरलं पडलं झडलं
सारे म्हनतील तुमी लय आगावं
सोबतीला थांबा पर करू नका वांधा
मी इनंती करते तुम्हाला>>>>>ईनंती बराबार हाई बघा,लग्ना आधि लफडि बरि नाहित बाबा.