नमस्कार,
वायरलेस ब्रॉडबँड बद्दल काही प्रश्नः (मी गूगलवर शोधणे आणि दुकानात प्रत्यक्ष जाउन विचारणार आहेच पण इथे कोणाला माहिती असेल तर विचारावे म्हणुन विचारत आहे).
१. पुण्यात (बाणेर-बालेवाडी) भागात चांगली सर्विस कुणाची आहे?
२. युएस्बी डीवाईस कुठल्याही लॅपटॉप वर लावल्यास चालते का?(का त्याचे रीलेटेड सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागेल ज्या लॅपटॉपवर वापरायचे त्यात) ?
३.रीलायन्स नेटकनेक्टचा एक अनलिमिटेड प्लॅन आहे (९५० रु). त्यात पहिले ५ जीबी ३ एम बी पी एस ने आणि नंतरचे १५० केबीपीएस ने डाउनलोड अॅवेलेबल आहे).
मी वीपीएन ला कनेक्ट करुन काम करतो. दिवसाचे किमान १० तास वापर होणार आहे.
डाउनलोड मधे हा "युसेज" कसा कॅल्क्युलेट होतो?
अशा दिवसभर वापरासाठी "अनलिमिटेड प्लॅनच" चांगला पडेल का?
४. ही सर्विस घेतली की देशात (जिथे ती उपलब्ध असेल) कुठेही वापरता येते का?
५. समजा राउटर वापरुन दोन लॅपटॉप वर वापरायचे असेल तर त्याच कंपनीचा राउटर घ्यायला हवा का? (का मार्केटमधुन एखादा आणला तर त्यावरही चालु शकेल?)
धन्यवाद.
मनस्मी, १. त्या स्पेसिफिक
मनस्मी,
१. त्या स्पेसिफिक भागाचे माहीत नाही पण एकूणच पुण्यात सर्वसाधारणपणे बीएसएनएल चीच सर्वात चांगली आहे. येथे सर्विस म्हणजे इंटरनेट कनेक्शन ची क्षमता. सेवा या अर्थाने सर्विस चा अनुभव अजून फार नाही
२. टाटा फोटॉन कोणत्याही लॅपटॉप वर चालते - पण बहुधा सॉफ्टवेअर आधी लोड करावे लागते, लक्षात नाही. मी २ लॅपटॉप्स वर वापरतो.
३. दिवसाचे १० तास असेल तर ५ जीबी कदाचित कमी पडेल. पण ते किती डाउनलोडिंग व अपलोडिंग आहे त्यावर अवलंबून आहे. If you have to copy lots of files everyday from some central server to your machine you need more. टाटा फोटॉन चा प्लस प्लॅन आहे १२०० चा त्यात १०जीबी पर्यंत लिमीट आहे, आणि बहुधा २ एमबीपीएस स्पीड आहे.
घरून काम करणार्यांसाठी अनलिमीटेड प्लॅनच चांगला पण "खरा अनलिमीटेड" प्लॅन फक्त बीएसएनएल चाच चांगला वाटला, त्यातल्या त्यात.
४. टाटा फोटॉन देशभरात कोठेही वापरता येते.
५. राउटर चे स्पेक महत्त्वाचे म्हणजे ८०२.११ जी टाईप आहे की ८०२.११ एन टाईप वगैरे. कंपनी कोणतीही चालते. पण त्यातही एन टाईपचा राउटर जी वाल्या मशीन्स बरोबरही चालतो.
अशा दिवसभर वापरासाठी
अशा दिवसभर वापरासाठी "अनलिमिटेड प्लॅनच" चांगला पडेल का? >>>>>>>>
TUMACHAA VAAPAR PAHAATAA
--अनलिमिटेड प्लॅनच" YAA SHIVAAY PARYAAY NAAHEE WIRED VAPARAAL TAR tata INDI. BRO. UTTAM,
WIRELESS tata DOCOMO 3G UNLIMITED PLAAN AAHE PAN KHUP MAHAAG.
TATA IS BEST.
धन्यवाद फारेंड आणि
धन्यवाद फारेंड आणि दादाश्री..
पण ते किती डाउनलोडिंग व अपलोडिंग आहे त्यावर अवलंबून आहे. If you have to copy lots of files everyday from some central server to your machine you need more.>>>>
मला फाइल्स कॉपी एवढ्या नसतात, पण तिथल्या(अमेरिक) सर्वरवर रीमोट डेस्कटॉप किंवा डेमवेअर वापरुन मी कनेक्ट करतो.
सध्या खरेतर माझ्याकडे टाटा इंडिकॉम आहे ज्यावर ७६८के अनलिमिटेड प्लॅन आहे आणि त्याचा स्पीड माझ्यासाठी पुरेसा आहे. (रु.९९२ सध्या पडतात).
विचार करत होतो की जर टाटा फोटॉन घेतले आणि जर (वायरलेस) राउटर वापरुन दोन लॅपटॉप जोडता आले तर टाटा इंडिकॉम कॅन्सल करता येइल. पण या वायरलेस ब्रॉडबँड ची रीलाएबिलिटीची कल्पना नाही. जर नीट नसेल तर गडबड होइल.
१. जर दिवसाचे २/३ तास वेब सर्फिंग साठी उपयोग होणार असेल तर किती डेटा युसेज होईल?
२. (स्ट्रीमींग हे डाउनलोड मधे मोडेल का? समजा ऑनलाईन चित्रपट पाहिले/गेम्स खेळले).
तो डेटा युसेज किती होइल.
३. कुठल्या साईटवर अमुक अॅक्टीवीटीसाठी अमुक डेटा युसेज अशी माहिती आहे का? (मी शोधेन आणि मिळाली तर अॅड करेन.. तुम्हाला माहित असेल तर द्या प्लीज.)
धन्यवाद.
तुम्ही इंडिकाँम वापरत आहात
तुम्ही इंडिकाँम वापरत आहात असे दिसते.
युएस्बी डीवाईस कुठल्याही लॅपटॉप वर लावल्यास चालते का?(का त्याचे रीलेटेड सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागेल ज्या लॅपटॉपवर वापरायचे त्यात) >> हो. त्या रिलेटेड सॉफ्टवेअर हे त्या डिव्हाईस मध्येच असते. त्यामुळे ते लावल्यावर ओस ते इन्स्टॉल करते.
अशा दिवसभर वापरासाठी "अनलिमिटेड प्लॅनच" चांगला पडेल का? >> हो.
४. हो.
५. कोणताही राउटर चालेल. माझ्या कडील दोन्ही राऊटर मी देशात आणले. सध्या त्यातील एक वापरत आहे. फक्त एकच प्रॉब्लेम की आपल्या भिंती ह्या सिमेंटच्या असल्यामुळे खूप लांब गेले तर रेंज कमी येते. (खूप लांब महण्जे मी वरच्या मजल्यावर ट्राय केला तर, पण तिथेही नेट चालते, थोडे हळू) (कधी नव्हेते लाकडाच्या भिंती असाव्यात असे वाटले. )
कुठल्या साईटवर अमुक
कुठल्या साईटवर अमुक अॅक्टीवीटीसाठी अमुक डेटा युसेज अशी माहिती आहे का? (मी शोधेन आणि मिळाली तर अॅड करेन.. तुम्हाला माहित असेल तर द्या प्लीज.)
>> टाटा फोटॉनच्या साइटवर कुठल्या अॅक्टिविटीला किती डेटा युसेज हे कॅल्क्युलेट करता येते. त्यानुसार प्लॅन सिलेक्ट करता येइल.
वायरलेस नेटवर्क मध्ये स्पीड कमीजास्त होत राहाते. म्हणजे जरी ३ mbps चा प्लॅन घेतला तरी continuous ३ mbps ची स्पीड मिळत नाही. fluctuate होत राहाते. ऐन कामाच्या वेळेत ते फार इरिटेट होतं. त्यामुळे शक्यतो वायर्ड ब्रॉडबँड घ्या. रिलायन्स ब्रॉडबँडचा माझा अनुभव बेस्ट होता. अनलिमिटेड युसेज प्लॅन ९००रु.
वायरींचा कंटाळा आल्यामुळे आयडीया डाँगल घेतलं पण ते फा...र बोर, स्लो आहे.
पण टाटा फोटॉनचं कनेक्षन चांगलंय. स्पीड ३.१ mbps, unlimited usage- rs. 950/month. चित्रपट वगैरे बघता येतात. स्काइप नीट चालतं.
केदार. नताशा.. धन्यवाद.
केदार. नताशा..
धन्यवाद.
>>मला फाइल्स कॉपी एवढ्या
>>मला फाइल्स कॉपी एवढ्या नसतात, पण तिथल्या(अमेरिक) सर्वरवर रीमोट डेस्कटॉप किंवा डेमवेअर वापरुन मी कनेक्ट करतो.
१. जर दिवसाचे २/३ तास वेब सर्फिंग साठी उपयोग होणार असेल तर किती डेटा युसेज होईल?
२. (स्ट्रीमींग हे डाउनलोड मधे मोडेल का? समजा ऑनलाईन चित्रपट पाहिले/गेम्स खेळले).
तो डेटा युसेज किती होइल.<<
अबबबबबबब युसेज होईल.
तुमच्या स्क्रीनवर दिसले की तितके वापरले गेले. तुम्ही सेव्ह करा की नका करू. स्ट्रीमींग, गेम्स, रिमोट डेस्कटॉप इ. भयंकर डेटा युसेज इंटेन्सिव्ह आहेत.
अनलिमिटेडच प्लॅन घ्या. माझ्यामते बीएसेनेल सगळ्यात स्वस्त अन मस्त आहे. (४९९ मधे अनलिमिटेड होम पॅक आहे पण तो लँडलाईन सोबत)
पुण्यात लोकल ब्रॉडबँड ची सेवा
पुण्यात लोकल ब्रॉडबँड ची सेवा असेल तर, तो ऑप्शन पण चांगला आहे. मी सध्या लोकल ब्रॉडबँड वापरतोय, ६००/- १० GB करता, 4MBPS स्पीड... हे कनेक्शन बेल्कीन राऊटर वरून iPad, BlackBery and VAIO वर वापरतोय. लोकल ब्रॉडबँड चा एकच प्रोब्लेम आहे- त्याच्याकडे बॅक अप असं काही नाहीये, त्यामूळे, पॉवर नसेल तर प्रोब्लेम! पण BlackBery मुळे तेव्हडा होत नाही. नाहीतर कॉन्स्टंट 4MBPS स्पीड ही मिळ्तेच
दुसरा ऑप्शन- लोकल ब्रॉडबँड + Reliance NetConnect, 3.1MBPS वालं प्रीपेड वाप्रायचं.गरज लाग्लीच तर पैसे भराय्चे!
बीएसेनेल सगळ्यात स्वस्त अन मस्त आहे. (४९९ मधे अनलिमिटेड होम पॅक आहे पण तो लँडलाईन सोबत) >> यामधे स्पीड फक्त 256KBPS आहे
मी हॅथवेच्या केबल ब्रॉबॅ वर
मी हॅथवेच्या केबल ब्रॉबॅ वर नेटगिअर चा वायरलेस राउटर सेट करायचा प्रयत्न केला होता. तो एकदा लागायचा, पण पॉवर गेली की पुन्हा पहिल्यापासून सेटिंग करावे लागायचे.
काहीतरी प्रोब्लेम असावा. मला
काहीतरी प्रोब्लेम असावा. मला कधीही नाही आला. स्टॅटीक आयपी घेऊन पहा, बहुतेक सॉल्व होईल. किंवा राऊटर ला पूर्ण्पणे मॅन्युअली सेटअप करा...
बीएसेनेल सगळ्यात स्वस्त अन
बीएसेनेल सगळ्यात स्वस्त अन मस्त आहे. (४९९ मधे अनलिमिटेड होम पॅक आहे पण तो लँडलाईन सोबत) >> यामधे स्पीड फक्त 256KBPS आहे >>>
भाडेकरू:- अहो मालक, काय ही खोली, इथे सारखे उंदीर घुशी नाचताहेत.
मालकः- मग? १० रु. भाड्यात काय गोपीकृष्ण नाचतील की काय ?
बी एस एन एल ची ८५० अनलिमिटेड
बी एस एन एल ची ८५० अनलिमिटेड हीही स्कीम चांगली आहे... १ एम बी पी एस स्पीड आहे.. आणि ३५० कॉल मोफत आहेत.
बी एस एन एल च्या काही स्कीमा
बी एस एन एल च्या काही स्कीमा आहेत... १० महिन्याचे पैसे भरले की १ वर्ष नेट मिळनार इ.
bsnl सर्वात बेस्ट आणि स्वस्त
bsnl सर्वात बेस्ट आणि स्वस्त आहे . मी महिना २७५ रुपयात महिनाभर unlimited नेट वापरतो . स्पीड १५० kbps.
दररोज १५ तास नेट चालू असते . दोन महिन्यातून एक दिवस मेंटेनस साठी नेट बंद ठेवतात एवढाच काय तो प्रोब्लेम .( wireless NIC card)
TIKONAA BAGHA TRY....
TIKONAA BAGHA TRY....
मुंबईत तर टिकोना ची सर्वीस
मुंबईत तर टिकोना ची सर्वीस एकदम डाउन असते. आणि ते पूर्णपणे वायरलेस नाही. सम सॉर्ट ऑफ WiMax!
माझ्याकडे बी एस एन एल ७५०
माझ्याकडे बी एस एन एल ७५० अनलिमिटेड आहे ५१२ केबीपीएस २४ तास चालूच असते त्यावर एक पी सी, एक लॅप्टॉप , दोन मोबाईल , एक टॅब अव्याहत चालू असतात वाय फाय वर...
तोच बी एस एन एल चा प्लॅन ८५०
तोच बी एस एन एल चा प्लॅन ८५० चा घेतला तर स्पीड १ एम्बी मिळेल.. अन लिमिटेड. आणि ३५० कॉल्स महिना फ्री... कॉल फ्री चा हिशोब घेतला तर हा प्लॅन ५०० ला पडतो.
जामोप्या कशाचाही स्पीद १
जामोप्या कशाचाही स्पीद १ एम्बी पडत नाही . अनलिमिटेड प्लान असेल तर मुळीच नाही.ते म्हणजे ही मोटार सायकल १४० चा मक्सिमम स्पीड देऊ शकते असे स्पीडोमोटरने सांगणासारखे आहे. याचा अर्थ ' धिस कनेक्षन कॅन हॅन्डल १ एम्बीपीएस स्पीड इफ प्रोव्हाडेड' असाच आहे. ५१२ किलोबिट्स चे कनेक्शन ते देतात ते ५१२ किलोबिट्स भागिले ८= ६४ किलोबाईट्स म्हनजे .६४ एम्बीपीएस ला ते लॉक केलेले असते.मात्र प्रिपेडला यापेक्षा खूप म्हणजे ३०० ते ४०० किलोबाट्स स्पीड मिळतो पण तो प्लान डाऊन्लोडेड जीबी च्या बेसवर असतो त्यामुळे समजा तुम्ही १५ जीबीचा प्रेपेड प्लान घेतला तर तो एक दिवसात सम्पवला काय किंवा ३० दिवसात सम्पवला काय निगमला फरक नाही. बीएसेनेलचा ५१२ केबीपीएसचा प्लान २४*३० दिवस चालू ठेवला तर किती डाऊन लोडिंग होते हा हिशोब काढूनच तो प्लान तयार केलेला आहे....
३ जी ही गोष्ट अत्यन्त भम्पक आहे. भारतातील कोणतीही वायरलेस तेक्नॉलॉजी व्यवस्थित चालत नाही कारण भारताची भौगोलिक स्थिती व विरळ टॉवर्स....
माझं पूर्वी आयडिया होतं..
माझं पूर्वी आयडिया होतं.. शेअर मार्केटचं सॉफ्टवेअर त्यावर चालत नव्हतं.. म्हनून बी एस एन एल घेतलं.. आता चांगलं चालतं..