मराठी विकीपीडिया वापरणार्‍यांकडून माहिती हवी आहे!

Submitted by मीनाक्षी कुलकर्णी on 20 November, 2011 - 07:17

मुंबईत १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान पहिली विकी कॉन्फरन्स झाली त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित होते. त्या निमित्ताने एक सदर करण्यासाठी ही माहिती हवी आहे -

मराठी विकीपीडिया माहीत, वापरत (रेग्युलर) असलेले मायबोलीकर आहेत का?

विकीपीडिया वापरण्यात काही अडचणी येतात का?

संपर्क करा -
मीनाक्षी कुलकर्णी

kulkarni.minakshi.r@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जान्हवी , शीर्षकात मराठी विकीपीडिया वापरणार्‍यांकडून माहिती हवी आहे असे लिहिलेत तर बरे होईल. तसेच त्या कॉन्फरंससंबंधाने लिहिलेत तर फारच छान.

धन्यवाद भरत.
कॉन्फरन्स बाबत सविस्तर लिहिनच तोवर आपल्या मायबोलीकरांकडून ( विकी वापरण्यार्‍या) काही माहिती मिळाली तर पहाते आहे.

मध्यंतरी जेव्हा विकीथॉन झाले होते तेव्हा मायबोलीवरचे काही जण त्यात सहभागी होते.. संकल्प द्रवीडने त्यासाठी काम केले होते आणि करत असतो.. तो नक्कीच मदत करु शकेल.

एखादा लेख समजा इंग्रजीतून शोधला आणि त्याचे भाषांतर मराठीत उपलब्ध आहे का ते बघितल्यास बर्‍याच वेळेस नसते आणि जर असेल तर त्यातील मजकूर फारच कमी असतो...

धन्यवाद हिमांशू. (आपणही विकीत भर टाकता काय?)

संकल्प ह्यांना ह्या संदर्भात मेल केली आहे.

हा धागा वर काढत आहे.

मी काही फोटो विकिकॉमन्सवर अपलोड केले आहेत. पण ते ( किंवा दुसरे कोणतेही) सर्चमध्ये दिसले जाऊन उपयोग व्हावा तर टाईटल, डिस्क्रिप्शन,ट्याग, इतर भाषेत पुन्हा हेच करण्याबद्दल मार्गदर्शन हवे आहे. शिवाय आपण अपलोड केलेल्या फाईलचेही एडिटिंग करता येईल का? ( मराठी विवरण इत्यादी?)