One fine spring day... a disciple looked at some branches blowing in the wind. He asked his master...
"Master, are the branches moving or is it the wind?"
Not even glancing to where his pupil was pointing... the master smiled and said...
"That which moves is neither the branches nor the wind...
....It's your heart and mind!!"
या डायलॉगने सुरु होऊन सुरुवातीलाच पकड घेणारा हा जबरदस्त कोरियन अॅक्शनपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो!
ही कथा आहे एका कोरियन गँगमधील एका hitman ची. तो त्याचा बॉस जे सांगेल ते काम करतो मग ते काहीही असो. त्याचा बॉस त्याला एक 'खाजगी' काम सांगतो. तो ते पूर्ण करतोही पण त्यात थोडी चूक करतो. त्याने केलेली चूक तितकीशी मोठी नसते, पण गँगमध्ये बॉस म्हणतो तेच बरोबर असतं. तिथे नियम असतात आणि ते मोडणाराला एकच शिक्षा असते.
"You can do a hundred things right, but it takes only one mistake to destroy everything."
कोरियन मॉब, त्यांचे कोड्स दिग्दर्शक आपल्यापुढे ज्या प्रकारे मांडतो ते पाहण्यासारखं आहे. सुरुवातीच्या काही सीन मधेच दिग्दर्शक नायकाच्या पात्राची, त्याच्या राहणीमानाची व जीवनशैलीची ओळख करून देतो. त्याच्याभोवती इतर characters उलगडत जातात. त्यात गँगचा बॉस, गँगमधीलच त्याचा प्रतिस्पर्धी, प्रतिस्पर्धी गँगचा बॉस वगैरे characters ठळकपणे समोर येतात. चित्रपटाची पटकथा खूपच strong असल्याने आणि दिग्दर्शकाने त्याची उत्कृष्टपणे हाताळणी केल्यामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही वा रेंगाळत नाही. पहिल्यापासूनच कथानक एक वेग घेतं जो कधीच मंदावत नाही.
पिक्चरच्या ओपनिंग फ्रेम पासूनच आपल्याला हे जाणवत राहते की पिक्चर स्टाईलिश आहे. संपूर्णपणे शहरात घडणारा एकदम डार्क सिनेमा असल्याने आउटडोअर वगैरे सीन नाहीत, दिवसाचे अथवा सुर्याप्रकाशातले पण काही सीन नाहीत, तरीपण चित्रपटाचा लूक एकदम फ्रेश आहे. सुरुवातीलाच हॉटेलमधल्या सीनमधले लाईट इफेक्टस, अॅक्शन सिक्वेन्सेस पाहून चित्रपटाच्या तांत्रिक बाबींची आइडिया येते. रक्तपात बराच आहे आणि जरी थोडीशी अंगावर येणारी हिंसा असली तरी ती कथानकाचा भाग म्हणूनच येते. सिनेमेटोग्राफी आणि इफेक्ट्स अप्रतिम आहेत, त्यामुळे साहस दृश्ये जास्त परिणामकारक ठरतात व रक्तपात तितकासा बीभत्स* वाटत नाही.
अभिनयाच्या बाबतीत पण चित्रपट सरस ठरतो, सर्वानीच आपली कामे चांगली केली आहेत. त्यात ही नायकाचा रोल अप्रतिम झालेला आहे. त्या अॅक्टरचं नाव आहे Lee Byung-hun - आता याचा उच्चार कसा करायचा हे मला काय माहित नाही. पण त्याने खूपच सुंदर काम केलेलं आहे. त्याच्या वाट्याला जास्त डायलॉग आलेले नाहीत (पिक्चर मध्ये जास्त डायलॉगच नाहीत), पण त्याचा चेहेराच सगळं बोलतो. तसंही आपल्याला भाषा समजत नसल्याने आपण फक्त हावभावच समजू शकतो आणि डायलॉग वाचतो. त्याचा राग, त्याची अगतिकता त्याच्या चेहेऱ्यावरून दिसते आणि पूर्ण पिक्चरमध्ये तो एकदाच हसतो ते ही शेवटी.
चित्रपटाची आणखी एक चांगली बाजू म्हणजे संगीत. अशा अॅक्शनपटाला ज्या प्रकारचं संगीत नेहमी दिलं जातं त्यापेक्षा खूपच वेगळं संगीत दिलेलं आहे. जरी अॅक्शनपट असला तरी चित्रपटाला एक emotional side आहे आणि संगीत ती व्यवस्थितपणे मांडतं. main themes, romance, fairness, irreversible time हे tracks चांगले आहेत.
खूप मारधाड असलेला पण तितकाच emotionally, morally आणि technically strong असलेला हा सिनेमा आयुष्याच्या bitter आणि sweet अशा दोन्ही बाजू मांडतो.
One late autumn night, the disciple woke up crying. So the master asked the disciple...
"Did you have a nightmare?"
- "No."
"Did you have a sad dream?"
"No," said the disciple. "I had a sweet dream."
"Then why are you crying so sadly?"
The disciple answered quietly, while wiping his tears...
"Because the dream I had can't come true."