२ अंडी
१/२ वाटी कॉर्न फ्लोअर
१/२ चमचा जिरेपूड
१/२ चमचा मिरेपूड
१/२ चमचा लाल तिखट
४ चमचे तेल
चवीप्रमाणे मीठ.
कॉर्न फ्लोअर,जिरेपूड,मिरेपूड,तिखट,मीठ एकत्र करून घ्यावे. .
अंडी फोडून, पांढरे पिवळे भाग एकत्र करून घ्यावे. फेटू नये. पॅनला तेल लावून अंड्याचा अगदी पातळ थर द्यावा. तेल पूर्ण पॅनला लागले पाहिजे तरच ते पूर्ण omelet ला लागेल.
प्रवाहीपणा कमी झाला की लगेच उलटावे. रंग बदलेपर्यंत वाट बघू नये
आता हि अंड्याची पोळी ताटात घेऊन तिचे सुरीने उभे भाग पाडावे. साधारण एका पोळीचे सहा होतात.
एक एक भाग पिठात घोळवून पुन्हा पॅनमधे ठेवावा. [omelet ला जे तेल असते त्यामुळे पिठ व्यवस्थीत चिकटते], वरून थोडेसे तेल टाकावे.थोडासा फुलला की उलट करून परत थोडेसे तेल टाकावे.
छान खरपूस झाले की त्याचा पॅनमधे असतानाच रोल वळावा.
२ अंड्यांचे साधारण १२ रोल होतात.
Starter म्हणून चांगले आहे. पोटभरीचे वगैरे अजिबात नाही
छान रेसिपि. माहितीचा
छान रेसिपि.
माहितीचा स्रोत:
आठवत नाही <<< इथले ब्लॉग पोलिस मागे लगतिल कुठल्या ब्लॉगवरचि असेल तर
असे एग रोल्स होय ! अंड्याच्या
असे एग रोल्स होय ! अंड्याच्या सुरळीच्या वड्या. छान आहे आयडिया. करुन बघितले पाहिजेत
मला हल्ली अंडं विशेष आवडत
मला हल्ली अंडं विशेष आवडत नाही त्यामुळे करुन बघेन की नाही माहित नाही पण ह्यात काही स्टफिंग घातलं तर?
ब्लॉगवरची अजिबातच नाही. ब्लॉग
ब्लॉगवरची अजिबातच नाही. ब्लॉग कय असते हे मला माहीती नव्हते तेंव्हापसुन करते मी. कदचीत टीव्हीवर बघीतलेली असु शकते किंवा मासिकात वाचलेली. पण आठवत नाही.
अंडी फोडून, पांढरे पिवळे भाग
अंडी फोडून, पांढरे पिवळे भाग एकत्र करून घ्यावे. फेटू नये. पॅनला तेल लावून अंड्याचा अगदी पातळ थर द्यावा. तेल पूर्ण पॅनला लागले पाहिजे तरच ते पूर्ण omelet ला लागेल.
प्रवाहीपणा कमी झाला की लगेच उलटावे. रंग बदलेपर्यंत वाट बघू नये
----------------------------
आम्लेट भाजायचे की नाही?
स्टफिंग घातलं तर? >> चांगली
स्टफिंग घातलं तर? >> चांगली आहे कल्पना. पातळ थर चालेल.
सोप्पी रेसिपी,करुन बघेन
सोप्पी रेसिपी,करुन बघेन
थोडेसे भाजायचे. म्हणजे कच्चे
थोडेसे भाजायचे. म्हणजे कच्चे नसावे पण कुरकुरीत पण नसावे. पीठ चिकटणार नाही.
फोटोत बघा.
आवडली रेसीपी,करून बघेल...
आवडली रेसीपी,करून बघेल...
छान सोपी रेसिपी स्टफिंग साठी
छान सोपी रेसिपी
स्टफिंग साठी कोथिंबीर्+पातीचा कांदा+ओले खोबरे मस्त लागेल असं वाटतय.
किंवा टॉमेटो सालसा पण छान लागेल
माझ्या डोळ्यासमोर पण टोमॅटो
माझ्या डोळ्यासमोर पण टोमॅटो सालसाच आले होते
टोमेटो सालसा? ते काय
टोमेटो सालसा? ते काय अस्ते?
:अडाणी बाहुली:
रेसिपी मस्त आहे, हमखास करून बघणार, प्रयोग म्हणून त्यात प्रत्येक वेळी नवे साहित्य वापरून स्टफ करता येइल नै??