एग रोल - अंड्याचे रोल

Submitted by आरती on 14 November, 2011 - 10:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ अंडी
१/२ वाटी कॉर्न फ्लोअर
१/२ चमचा जिरेपूड
१/२ चमचा मिरेपूड
१/२ चमचा लाल तिखट
४ चमचे तेल
चवीप्रमाणे मीठ.

क्रमवार पाककृती: 

कॉर्न फ्लोअर,जिरेपूड,मिरेपूड,तिखट,मीठ एकत्र करून घ्यावे. .
अंडी फोडून, पांढरे पिवळे भाग एकत्र करून घ्यावे. फेटू नये. पॅनला तेल लावून अंड्याचा अगदी पातळ थर द्यावा. तेल पूर्ण पॅनला लागले पाहिजे तरच ते पूर्ण omelet ला लागेल.
प्रवाहीपणा कमी झाला की लगेच उलटावे. रंग बदलेपर्यंत वाट बघू नये Happy
आता हि अंड्याची पोळी ताटात घेऊन तिचे सुरीने उभे भाग पाडावे. साधारण एका पोळीचे सहा होतात.
एक एक भाग पिठात घोळवून पुन्हा पॅनमधे ठेवावा. [omelet ला जे तेल असते त्यामुळे पिठ व्यवस्थीत चिकटते], वरून थोडेसे तेल टाकावे.थोडासा फुलला की उलट करून परत थोडेसे तेल टाकावे.
छान खरपूस झाले की त्याचा पॅनमधे असतानाच रोल वळावा.

Egg Roll.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना
अधिक टिपा: 

२ अंड्यांचे साधारण १२ रोल होतात.
Starter म्हणून चांगले आहे. पोटभरीचे वगैरे अजिबात नाही Happy

माहितीचा स्रोत: 
आठवत नाही :(
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान रेसिपि.
माहितीचा स्रोत:
आठवत नाही Sad <<< इथले ब्लॉग पोलिस मागे लगतिल कुठल्या ब्लॉगवरचि असेल तर Happy

मला हल्ली अंडं विशेष आवडत नाही त्यामुळे करुन बघेन की नाही माहित नाही पण ह्यात काही स्टफिंग घातलं तर?

ब्लॉगवरची अजिबातच नाही. ब्लॉग कय असते हे मला माहीती नव्हते तेंव्हापसुन करते मी. कदचीत टीव्हीवर बघीतलेली असु शकते किंवा मासिकात वाचलेली. पण आठवत नाही.

अंडी फोडून, पांढरे पिवळे भाग एकत्र करून घ्यावे. फेटू नये. पॅनला तेल लावून अंड्याचा अगदी पातळ थर द्यावा. तेल पूर्ण पॅनला लागले पाहिजे तरच ते पूर्ण omelet ला लागेल.
प्रवाहीपणा कमी झाला की लगेच उलटावे. रंग बदलेपर्यंत वाट बघू नये

----------------------------

आम्लेट भाजायचे की नाही?

छान सोपी रेसिपी Happy

स्टफिंग साठी कोथिंबीर्+पातीचा कांदा+ओले खोबरे मस्त लागेल असं वाटतय.
किंवा टॉमेटो सालसा पण छान लागेल Happy

टोमेटो सालसा? ते काय अस्ते?
:अडाणी बाहुली:

रेसिपी मस्त आहे, हमखास करून बघणार, प्रयोग म्हणून त्यात प्रत्येक वेळी नवे साहित्य वापरून स्टफ करता येइल नै??