हिंदुस्थानातील लोकसंख्या
जगात सात अब्जावे मूल जन्मास आले. त्याचा उत्सव हिंदुस्थानातच सर्वात जास्त सुरू आहे. वाढती लोकसंख्या दारिद्य्र, धर्मांधता, उपासमार व हिंसाचाराची देणगी घेऊन येते. हिंदुस्थान त्याचा धनी झालाच आहे. गरीब राष्ट्रांच्या लोकसंख्येवर युरोपीय राष्ट्रांची व अमेरिकेची चैन सुरू आहे हे आपल्याला कधी समजणार?
जगाची लोकसंख्या 7 अब्जांवर जाऊन पोहोचली. जगाचा भार वाढला. त्याचा उत्सव सध्या अनेक गरीब देशांत सुरू आहे. हिंदुस्थान हा नेहमीच उत्सवांत रमणारा देश असल्याने सात अब्जावी मुलगी नर्गीस उत्तर प्रदेशात जन्मास आली याचे कोडकौतुक सुरूच आहे. विनिता आणि अजय या दांपत्यास ही नर्गीस नावाची मुलगी झाली व ती जगातील सात अब्जावी ‘संतान’ असल्याचे म्हटले जाते. उत्तर प्रदेशात जन्मास आलेल्या या मुलीचे भविष्य काय? उत्तर प्रदेश हिंदुस्थानातील एक मोठे राज्य आहे व त्या राज्याची लोकसंख्या 20 कोटींच्या घरात पोहोचली आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या याच राज्यात फुगली आहे. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी अशा युरोपांतील तीन प्रमुख देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षाही उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे. फरक इतकाच आहे की, युरोपातील या देशांत गरिबी, कुपोषण आणि बेरोजगारीने कुणाचे बळी जात नाहीत, उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत ते जातात. लोकसंख्या वाढते, त्या लोकसंख्येचे पोट मात्र उपाशी आहे.
सविस्तर इथे वाचा
त्रागा समजू शकतो. खरे तर तिचा
त्रागा समजू शकतो. खरे तर तिचा नंबर इतका, हे इतक्या ठामपणे कसे सांगू शकले ? (जणू काही भारतातल्या प्रत्येक नवजात अर्भकाची नोंद, जन्मल्याबरोबर लगेच होते.)
संततीनियमन आता कुठल्याच राजकीय पक्ष्याच्या जाहिरनाम्यात दिसत नाही. प्रसार माध्यमातही नाही.
उलट मोठ्या अर्थतज्ञांचा हवाला देत, मोठी लोकसंख्या म्हणजे भारताचे बलस्थान असेच सांगितले जाते.
आनंद आहे.
याबाबतीत माझा एक प्रत्यक्ष अनुभव, मी अश्याच एका कँपच्या प्रमुख असणार्या डॉक्टर बाईंसमोर बसलो होतो. त्या अहवाल तयार करत होता. आदल्या दिवशी शस्त्रक्रिया झालेला माणूस तक्रार घेऊन आला, कि त्याला पैसे कमी मिळाले. डॉक्टरबाई म्हणाल्या, अरे सरकार एवढेच देते.
तो माणुस म्हणाला, मागच्यावेळी तर जास्त मिळाले होते !!
मार्क ट्वेनचा मृत्यू की
मार्क ट्वेनचा मृत्यू की आत्महत्या की हत्या ?
=============================
मार्क ट्वेन या लेखकाच्या मृत्यूबद्दल अलिकडेच असा वाद निर्माण होण्याची काही कारणे आहेत.
"The reports of my death have been greatly exaggerated"
हे विधान मार्क ट्वेनचं आहे. मार्क ट्वेनने असं का म्हणावं हा प्रश्न काहींना पडला. ते साहजिकच नाही का ? काही लोक विचारवंत असतात त्यांना प्रश्न पडतात म्हणून तर जग चाललेले आहे. अशा विचारवंतांबद्दल खुद्द मार्क ट्वेनचं मत मात्र काहीसं निराळं होतं.
एका विचारवंताने मार्क ट्वेनची ओळख करून देताना
मार्क ट्वेन म्हणजे ...
" नाठाळाच्या माथी हाणावी काठी, तुका म्हणे " ही ओळ ज्यांची आहे ते नव्हेत.
"When a stupid man is doing something he is ashamed of, he always declares that it is his duty." हे कोट ज्यांचं आहे ते ही नव्हेत.
"A good man can be stupid and still be good. But a bad man must have brains." हे कोट ज्यांचं आहे ते तर हे नव्हेतच.
" तो एक मूर्ख जाणावा " हे मूर्खांची लक्षणे असणारे श्लोक ज्यांचे आहेत ते तर मार्क ट्वेन नव्हेतच नव्हेत.
मार्क ट्वेन आपली ही ओळख ऐकत होते. वक्त्यांनी मार्क ट्वेनचे कोट कुठले कुठले नाहीत ही ओळख करून देताना आत्ता इथे ज्या कोट्सचा उल्लेख झाला ते सोडून उर्वरीत कोट ज्यांचे आहेत ते म्हणजे आजचे आपले पाहुणे मार्क ट्वेन.
या ओळखीनंतर ट्वेन या विचारवंतांपासून दूर राहू लागला. पण या विचारवंताशी गाठ पडेल या अनामिक भीतीने त्याला ग्रासले होते. त्यामुळे त्याची तब्येत बिघडली. यावर उपाय म्हणजे आपले विचार त्यांच्या संदर्भात काय आहेत हे त्यांना कळावे म्हणजे ते आपल्या वाट्याला जाणार नाहीत असे सहका-यांनी सुचवले.
त्यामुळे एका समारंभात संबंधित विद्वानाशी गाठ पडताच मार्क ट्वेनने मागील ओळखीची सव्याज परतफेड करताना एक वक्तव्य केले. ते म्हणजे
'Never argue with stupid people, they will drag you down to their level and then beat you with experience.'
जाहीरपणे केलेल्या या वक्तव्याने सभागृह अवाक झालं.
खरं तर मार्क ट्वेनने सत्य सांगितले होते. संबंधित विचारवंतांबदद्लच्या त्याच्या भावना या इतक्या ख-या होत्या की दुस-या दिवसापासून त्यांचं खूप कौतुक झालं. हळूहळू हे वाक्य लोकप्रिय बनू लागलं. या प्रकारानंतर संबंधित विद्वानाशी गाठ पडेल ही भीती कमी होत गेली. पण..
एक दिवस ते विचारवंत मार्क ट्वेनकडे आले आणि म्हणाले
तुमचं कोट मला अत्यंत आवडलेलं आहे. त्यामुळे ते मी माझ्या भिंतीवर रंगवून घेतलेले आहे. इथून पुढे मी तुमच्याशी कुठलाही वाद घालणार नाही हे वचन देतो.
हे ऐकताच मार्क ट्वेनच्या मेंदूत गोळा आला. त्याचं वाक्य ज्यांच्याबद्दल आहे त्यांनी ते मिरवावं ही त्याची अजिबात इच्छा नव्हती. त्या बसलेल्या धक्क्यातून त्याचा मृत्यू झाला. जर संबंधित विद्वान त्याला भेटले नसते तर तो आणखी जगला असता. त्यामुळे त्याचा मृत्यू हा नैसर्गिक की अनैसर्गिक असा नवाच वाद सुरू झालेला आहे. मार्क ट्वेनने आपल्या मृत्यूबद्दल जे मत व्यक्त केलं आहे ते उपरोधिक आहे की सूचक आहे यावरही खल चालू आहे.
सांप्रतकाळी मार्क ट्वेनचा म्रुत्यू पुन्हा होऊ नये असं वाटत नसेल तर ते विद्वान आपण तर नव्हेत ना हे मार्क ट्वेनने ज्यांचाबद्दल ते वक्तव्य केलं आहे त्यांनी ध्यानात घेण्याची गरज आहे.
एक दिवस
तात्पर्य : "नर्गीस" कशी काय
तात्पर्य : "नर्गीस" कशी काय त्या क्रमांकाची असू शकते ? हा मंदश्या जोशात अँगी होऊन विचारलेला प्रश्न एका विद्वानाकडून आलेला आहे.
(No subject)